कोवळीक

Submitted by विशाल कुलकर्णी on 15 October, 2008 - 05:36

आकाशाच्या खिडकीतुन
सुर्य अलगद डोकवायचा,
गर्भरेशमी त्याची किरणं
आळसावलेल्या डोळ्यांनी मी टिपायचा.

त्याच्या येण्याने आभाळाला
लालसर झालर चढायची
तीच पांघरुन माझी जाग
ऊन्हे डोक्यावर येइतो झोपायची.

ऊन्हं वितळायला लागली
तेव्हा नकळत जाणवलं
अरे..सकाळची कोवळीक
आपण कधी अनुभवलीच नाही.

विशाल

गुलमोहर: 

अशीच एक कोवळी झुळूक
आपल्या मनात येऊदे. .
तसेच मायबोली वर काव्य लिहुन
येऊदे .
शर्मीला.........

पहिल्या दोन कडव्यात मस्त विरघळले होते, एकदम रूट बदलला माझा . . .
Happy Happy Happy

धन्यवाद, मला नेमकं हेच हवं होतं.
कुणीतरी मुड पकडला माझा.

मनापासुन आभारी आहे.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.