राधा हि बावरी

Submitted by मी मधुरा on 3 February, 2013 - 09:26

किती दिवसांनी एक मराठी मालिका पहावीशी वाटतीये. झी मराठी वरची 'राधा हि बावरी'.....कशी वाटली ती मालिका? चला इथे चर्चा करूयात!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला.....स्वप्ना_राज आणि फारेन्डांच्या "काही चित्रपट विषयक नियम व पोटनियम" यांना एकमेव अपवाद म्हणून राधाला नुसतं अतिश्रम, जागरण आणि अ‍ॅसिडिटी यांमुळेच चक्कर आली की क्कॉय? ..... म्हंजे झी मराठी क्रिएटिव्ह टीम पैकी अ‍ॅटलिस्ट एकजण मायबोली वाचत असणार हो.......
मग अरे लेको, नाही त्या वेळेला धर्माधिकार्यांकडे मुक्कामाला असलेली सौरभची गॅंग (अवली, केसर, इ.) कुठेय ?
' केदार ' दादाचं लग्नं आहेनॉ ? मॉग? विसरलात का त्यांना? का ते सगळे अ‍ॅक्टर सीरियल सोडून जरा बरी कामं शोधायला गेले ? तसं असेल तर GOOD FOR THEM हो........;)

मी ही सिरीयल सुरु झाली तेव्हा पाहिली होती...तो केदार पण डॉक्टरच आहे ना??? आणि नसेल तर त्याच्या उपजिवीकेचं साधन काय??? हा बाफ वाचुन कोण कोण काय काय करतयं ते कळ्ळंय पण केदारचं काही माहित नाही.... Happy

हो केदार डॉक्टर आहे आणि त्याच स्वतःच क्लिनिक पण आहे. सीमा वहिनी कुठल्यातरी बँकेत होती पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे (केदार लहान, सासुबाई गेलेल्या) तिने नोकरी सोडली. रंजुचा नवरा काहीतरी छोटा मोठा उद्योग करतो (बहुदा देवळासमोर हार नारळाचे दुकान) सौरभ, दादा, रंजु आणि घारुअण्णा काहीच करत नाहित.
दादा आयुर्वेदाचे अभ्यासक आहेत.

हो केदार डॉक्टर आहे आणि त्याच स्वतःच क्लिनिक पण आहे.>>>>>>.. पण आधी चांगला असतानाही तो कधी कामावर गेल्याचे ऐकिवात नाही....असो इथे वाचुन मला सिरीयल न पाहिल्याचे समाधान मिळते.....आणि सर्वांचे कमेंट्स वाचुन मस्त करमणुक होते........मालिकेचे यश दडले आहे त्यात Wink

सीमावहिनी केमिस्ट्रीची प्रोफेसर होतीना, सासू आजारी म्हणून तिने नोकरी सोडली असा उल्लेख तिने केला होता पूर्वी बहुतेक, मी तेव्हा हि मालिका बघत होते.

अंजु असेल तस. ती नोकरी करत होती आणि घरची जबाबदारी आल्यावर नोकरी सोडली आता पुन्हा सुरु करायची अस ती तिच्या पुण्याच्या मैत्रिणींना सांगत होती. मी चुकुन बँक ऐकले असेल मग.

कालचा एपि अगदी कै च्या कैच होता राव Sad राधाला चक्कर येते म्हणुन तिला सगळ्याजणी खोलीत नेउन बसवतात, तिच्या बरोबर तिचा लाडका शोन्या बसतो सोबत म्हणुन, मग तिला भटजींच्या आवाजाने घर छान वाटायला लागत आणि आपण हे सगळ मिस केल अस वाटत, मग हे दोघे परत सप्तपदी, अंतरपाट वगैरे एन्जॉय करतात.... गंमत म्हणजे तिथे गुलाबाचे हार पण तयार असतात. जर राधाला बर वाटत असत तर मग हे दोघे बाहेर जाउन लग्नात सहभागी का होत नाहित?
राधाला चक्कर आल्यावर सीमावैनी नुसत म्हणत रहाते की खूप दगदग केली राधाने वगैरे, अग मग बये तिला चार घास खायला घाल की नुसत बडबड करुन काय होणारे? तिची सावत्र आईपण नुसतीच बडबडली राधा २४ तास उपाशी राहिली म्हणुन :रागः कैच्याकैच बाबा शी Sad

>>सीमावहिनी केमिस्ट्रीची प्रोफेसर होतीना

म्हणून तिच्या डोक्यात केमिकल लोच्या झाला असावा.

कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं तर रंजू आणि यश खोलीत झोपलेले. ते पण लाईट चालू ठेवून. आणि सीमावहिनी त्या बाळाला घेऊन त्यांच्या पायाशी येरझार्‍या घालतेय. ह्यांच्या घरात दार बंद करून झोपत नाहित काय? आणि ही बया पण लोकांच्या खोलीत घुसते डायरेक्ट.

आणि हो, मालिकेच्या प्रोमोजमध्ये किंवा पहिल्या भागात नायिकेची एन्ट्री होताना तिचे केस कसे वार्‍याने भुरूभुरू भुरूभुरू उडताना दाखवतात तस्से सीमाचे केस उडताना दाखवलेत. वारा कुठून येत होता त्यांनाच माहित.

ती गार्गी तर महान आहे. म्हणे माझ्या ह्या अवस्थेला राधाच जबाबदार आहे. हे म्हणजे पडलं तरी नाक वरच! हा असला अस्तनीतला निखारा राधाने घरात आणलाय. आता सीमा, केदार आणि गार्गी एक होणार आणि राधाची तंतरवणार. मग आहेच शोन्या डोळे पुसायला. त्याला तरी दुसरं काय काम आहे म्हणा!

त्याने मितालीला सगळ खर खर सांगुन टाकल आणि तिच्या बाबांना तिच्या हवाली केलं >>> काय आहे हे खरं-खरं ? आणि सीमावहिनीचा नवरा कुठे आहे ?
मी हल्लीच ह्या सिरियलचे काही भाग पाहिले. त्याआधी कधीच पाहिलेली नाही. जेवढे पाहिले त्यात मला सीमावहिनीचे कॅरॅक्टर वास्तववादी वाटले. म्हणजे नुसतेच गोडगोड किंवा नुसतेच कट रचणारे असे नाही. नॉर्मल माणसांसारखे ! अर्थात आधी ह्या सिरियलमध्ये काय काय घडून गेलंय ह्याची काहीच कल्पना नाही.

अरे, कालच्या एपिसोडमध्ये काय दाखवत होते? रंजू त्या गार्गी आणि केदारच्या रूममध्ये सकाळी येऊन झोपलेल्या गार्गीकडे निरखून पहात होती. म्हणे लग्नाच्या गडबडीत तुम्हाला नीट बघता आलं नाही. अरे, ती काय रूमच्या बाहेर येताना 'मिशन इम्पॉसिबल' सारखा चेहेरा बदलून येणार आहे काय? नंतर बघ की. आणि नंतर त्या जोडप्याच्या बेडवरच्या गुलाबाच्या पाकळ्या यश त्या रंजूवर उधळत होता.

ह्या घरातले सगळेच लोक वेडे आहेत का? Uhoh

मी ही अतर्क्य सिरीयल पहात नाही.(तुतिमी पहातांनाच अर्धे डोके गायब झालेले असते, त्यामुळे हा पुढचा येड्यांचा बाजार काय बघण्याची शक्ती उरत नाही) स्वप्ना म्हणतेय ते बरोबर .

गार्गीच्या अवस्थेला राधा जबाबदार्?:हाहा: काय हे.:फिदी:

मितालीला नुसत बघुन प्रेग्नंट आहे हे ओळखणारे दादा गार्गी कडे बघतही नाहीयेत का?

सीमावहीनीचे मुड स्विंग्स डोक्यात जाताहेत. गार्गीला ती पसार्‍यावरुन ओरडते आणि मग तिच्या बेड रूम मधे तिच्याशी गोड गोड बोलते. लगेच बाहेर येउन सौरभ राधावर कीचन मधे खेकसते. ईरीटेटींग

आजच्या भागात मोजायला हव होत की केदारने किती वेळा सगळ्यांना विचारल की "मी डॉक्टर आहे हे विसरलात का?"
काश्मिरला जाउन काय दिवे लावणारेत कोणास ठाउक

कालच्या एपिसोडमधली केदार-गार्गीला उद्देशून रंजूची २ वाक्यं पहा:

१. कितीही मोह झाला तरी बाहेरचं अन्न खाऊ नका. सीमाने खायचं बरंच दिलंय
२. जिथे जाल तिथे ताजं आणि गरम अन्न खा.

त्यांनी नक्की काय करायचं???

>>आजच्या भागात मोजायला हव होत की केदारने किती वेळा सगळ्यांना विचारल की "मी डॉक्टर आहे हे विसरलात का?"

रंजू 'आधी तिची तब्येत नहिये बरी' का असंच काहीतरी वाक्य ३ वेळा म्हणाली.

>>काश्मिरला जाउन काय दिवे लावणारेत कोणास ठाउक

त्या केदारला अतिरेक्यांच्या अंगावर सोडा म्हणावं. परत भारताकडे वाकडा डोळा करून बघायची हिंमत करणार नाहीत. आणि म्हणतील आम्हाला काश्मिर नको, तुम्हीच हवं तर पाकिस्तान घ्या.

केदार-गार्गीने हनिमूनला जायचं की नाही ह्यावर जेव्हढी चर्चा झाली तेव्हढी सिरियावर हल्ला करायचा की नाही ह्यावरसुध्दा व्हाईट हाऊस मध्ये झाली नसेल. धर्माधिकारी कुटूंबातले लोक नाकाचा उपयोग वास आणि श्वास घेण्यासाठी न करता दुसर्‍यांच्या भानगडीत खुपसायला जास्त करतात.

>> रंजू 'आधी तिची तब्येत नहिये बरी' का असंच काहीतरी वाक्य ३ वेळा म्हणाली.
हेही खरं आहे.. Happy

>> त्या केदारला अतिरेक्यांच्या अंगावर सोडा म्हणावं. परत भारताकडे वाकडा डोळा करून बघायची हिंमत करणार नाहीत. आणि म्हणतील आम्हाला काश्मिर नको, तुम्हीच हवं तर पाकिस्तान घ्या.
Rofl

Pages