काय रे हा अथांग डोह तुझा
त्यावरी हा तरंग हाय माझा
कशा लाटा अश्या काठांवर
जसे शब्द माझ्या ओठांवर
काय कातील तुझे तराणे
हाय रुतती इथे शब्द गाणे
तुझ्यातुन माझे थेंब थेंब वाहणे
माझ्यातुन तुझे गात्र गात्र थांबणे
अता रे कशाला मज सुटका हवी
अशी पावसाची सदा धार यावी
हे तर स्वातंत्र्य मम स्वप्नांना
अवगुंठन नाजुक खुलेपणाला
काय तळाशी लपले आहे खोल
काठांवर भिजल्या मातीला ओल
सृष्टीचं कोंदण सजलं हिरवं
थांबूच नये मग वहात जावं . . . .
थांबूच नये मग वहात जावं . . . .
जाता जाता किनार्यावरील वाचकांना अमृतघन द्यावे.
सुरेख.
थँक्स कौतुका... तु आणि मी फारसे भेटत नाही, नाही? का बरं? तुझ्या कविता तुझ्या सारख्या दिलखुलास असतात.
थांबूच नये मग वहात जावं . . . .
खरच, सुरेख कविता आहे,
असं मोकळेपणे वाहाणंच खरं,
उरलेलं आयुष्य म्हणजे ह्या मोकळेपणाची आस घेउन जगणं!
लगे रहो.
काय रे हा अथांग डोह तुझा
त्यावरी हा तरंग हाय माझा
तुझ्यातुन माझे थेंब थेंब वाहणे
माझ्यातुन तुझे गात्र गात्र थांबणे
काय तळाशी लपले आहे खोल
काठांवर भिजल्या मातीला ओल
एकदम मस्त !! अत्यंत आशयघन !!!
"काठांवर 'सुकल्या' मातीला ओल" असं जास्त छान वाटलं असतं काय ??
डोहाच्या काठाशी राहुन माती सुकी राहु शकणार नाही, ती वरुन भिजलेली आहेच पण आत खोलवर ओलही आहे.....
सर्वांचे आभार. अज्ञाता, विचार करते तु सुचवलेल्या बदलावर