भान

Submitted by विशाल कुलकर्णी on 13 October, 2008 - 06:55

लाजुनी अशा या वेळी
का पाहतेस गं खाली,
मज वाटे चुंबुन घ्यावी
या डोळ्यामधली लाली,
खुणावते मज खट्याळ
बट रेंगाळे तव भाळी,
ओठामागुनी साद घाली
तव गालावरची खळी,
सोडुनी मोह स्वप्नांचा
मी तुझे लाविले ध्यान,
विसरुनी बसलो सारे
मी अवघे देह-भान!

विशाल; १३/१०/२००८

गुलमोहर: 

अरे व्वा... बर्‍याच दिवसांनी हलकी फुलकी मस्त रोमँटीक कविता वाचायला मिळाली. मस्त रे....

अण्णा, मुलगा प्रेमात पडला बर का !!!
पडला की उठला ?????
लगे रहो !!!!!!

नाही रे बाबा, आता ती सोय राहीली नाही.
दोन वर्षांपुर्वीच चतुर्भुज झालोय.आता फक्त उसासे टाकणं !

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

विशाल, तू ही कविता पण २ वर्षांपुर्वी लिहिली आहेस ना? Happy

आता फक्त उसासे टाकणं !
अरे रे !!! मग ते लव्ह मॅरॅज नव्हतं का ??? ( अति खाजगी चौकशा ??)

माझी बायकोदेखील तितकीच गोड आहे, तेव्हा कविता नवीनच आहे.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

अहं, लव्ह आफ्टर ....... ! समजलं !

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

अरे कशाला एवढं खाजगीत जाताय? आवडली ना कविता, घ्या ना मग त्याचा पेगभरुन आनंद Wink ब्रँड कशाला बघताय? विशाला, कुणावरही करावं पण प्रेम करावं आणि अश्या छान छान कवितांमधुन आम्हाला वाचायला पाठवावं Happy

सगळ्यांचे आभार.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.