Submitted by अज्ञात on 13 October, 2008 - 02:27
मी न बोलवीले तुला न तूहि मजला
तरी पाश गुंतला नि येळकोट झाला
स्वरांच्या महालात शब्द गात आला
लयीच्या सवे वृत्त बंधनात रमला
किती रागमालेत संवेदना ह्या
वेदना कुणाच्या कुणी जाणल्या
रंगवेड्या फुलांचा सुगंध दाटला
सावलीला धुक्याचा सुमार लागला
भृंग चाहूल दूरस्थ येता क्षणी
रोमरोमात सृजनाचा काळ उमलला
कांहि कळलेच ना रोष घेऊ कशी
दोष देऊ कसा रे सांग ना मला
.............अज्ञात
१३८९,नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
तरी पाश
तरी पाश गुंतला नि येळकोट झाला
असे जास्त गुंते वाढवू नका. आमचे शेंडे हरवात अशाने. तरीही पुन्हा...
दोष देऊ कसा रे सांग ना मला
तुमच्या
तुमच्या कवितेत एक पक्केपणा, मराठी भाषेवरचं प्रभुत्व सतत जाणवतं.
भावनांचे, अनुभुतीचे नवनवे पदर उलगडत जातात.
अशी कविता मला करता आली तर आवडेल!
येळकोट? नेह
येळकोट?
नेहमीप्रमाणेच काळजात . . .
येळकोट? नेह
येळकोट?
नेहमीप्रमाणेच काळजात . . .
पल्ली
पल्ली मॅड्म,
धन्यवाद. आभार. इ. इ. ................ 
दोन दोन प्रतिसाद !! चुकून की मुद्दामून ?? चुकून असेल तर ठीक. मुद्दाम असेल तर सलाम !!