Submitted by अज्ञात on 13 October, 2008 - 01:59
ओळखीचे कसे हे न पाहिले कधी
रासवेड्या कथा ऐकलेल्या किती,....
संवेदनांच्या कळा आगळ्या अन
विचारांस स्वप्नांची बेगडी गती
हळुवार आनंद सल वेदनांचा
उराशी सयी धावणारी मती,......
वेसण मनाला न कासराही हाती
चौखूर वारा उधळली स्थिती
उत्सवाचा वसा कल्पनेचा पिसारा
पसारा फुलांचा सुगंधी अती,....
सुखाच्या जमाती; पक्षी वराती
जळाच्या तळाशी मातीच माती !!
..........अज्ञात
१३८८,नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
जळाच्या
जळाच्या तळाशी मातीच माती !!
बोलू नकोस काही
हे एवढेच हाती..
हम्म्म....
हम्म्म....