तुला महितीय ?
माझी तुझ्याशी गट्टी जमलीय !
तुझं 'अय्या'.. तुझं 'ई..श्य''
मधेच एखादं ''काहितरीच काय ! ''
ती अखंड बडबड..ते असंख्य विनोद..त्यातले पी.जे ही
ते मधेच आलेलं '' सॉ...री''
कितीकदा ते ''टिपीकल'' हसणं
असं वाटत तू टाळीसाठी दिलेला हात
थोडावेळ ''एरवीच (!)'' धरुन ठेवावा....
अन तुला कळुही नये तो मी आहे ते
एखादा श्वास होउन तुझ्या उरात भरुन उरावं
किंवा एखादा दवबिंदू होउन
तुझ्या गालावरुन हलकेच घसरावं...
किंवा ह्यातलं काहिही नाही !
एखाद्या वेळेस वाफ होउन ढगात जावं
अन मुसळ्धार पाउस बनुन कोसळावं तुझ्यावर..
किंवा तुझ्या पर्समधला आरसा होउन
तुझ्याकडे पहात बसावं....
किंवा ह्यातलं काहिही नाही
अरे व्वा. मस्त. तिचा हेवा वाटेल अशी कविता...
बराच लबाड आहेस रे !!!
कसं प्रेमवीरांच्या मनातलं बोललासं. चालू दे !!!!
खुप मस्त..... खुप आवडली.. प्रेमात सुरवातीला प्रेमवीराला अगदी असेच वाटत असतं...
जाता जाता गर्रकन
तुझी मान मागे वळावी,
अन गार झालेल्या चहात..
मी सिगारेट बुडवुन खावी !
जाम वाईट अवस्था होते रे प्रेमात पडल्यावर! पण छान, जुने दिवस आठवले.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
"किंवा ह्यातलं काहिही नाही"... आवडलं.
***
सर्वे जन्तु रुटिना: | सर्वे जन्तु निराशया: |
सर्वे छिद्राणि पंचन्तु | मा कश्चित् दु:ख-लॉग् भरेत् |
सुंदर लिहील आहेस मित्रा ... मस्त.. "किंवा ह्यातलं काहिही नाही"...