Submitted by चाऊ on 11 October, 2008 - 06:55
सोड म्हणुन असं
सुटत का रे नातं?
मन माझं तरीही
गीत तुझंच गातं,
कसे सुटतिल गुंतलेले
काळजाचे धागे
जखमा ओल्या आणी कळा
राहतीलच मागे,
तेच होतं जगणं
तुझ्या सोबतिनं,
सुटलं गणित, बाकी,
उरलं की रे शुन्य,
साठलेलं तरीही,
खुप खोल, आत,
दिलेस भरभरुन
लोकांत, एकांतात
सर्व काही असुनही
जग माझं रितं
मन माझं तरीही
गीत तुझंच गातं,
गुलमोहर:
शेअर करा
व्यथा
व्यथा आपापल्या.
आवडलं चाऊ.
छाया शेवट्
छाया
शेवट्च्या चार ओळी छान
छाया शेवट्
छाया
शेवट्च्या चार ओळी छान
मनःपुर्वक
मनःपुर्वक धन्यवाद.
सुटलं
सुटलं गणित, बाकी,
उरलं की रे शुन्य,
हे नेहेमी असंच का होतं. कुठला आनंद निर्भेळपणे मिळुच नये?
सुंदर !!
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.