विलासी महाराष्ट्र

Submitted by SHANKAR_DEO on 11 October, 2008 - 04:27

या देशमुखी वाडयाचा नुसताच आव हा मोठा
संपन्न महाराष्ट्राचा यांनीच बनवला गोठा

बेफाम बिल्डरांना भुखंड मोकळे वाटा
हातात तोलला यांनी न्यायाचा जुलमी काटा
मतलबी कायदे झाले उल्हास दावति खोटा
संपन्न महाराष्ट्राचा यांनीच बनवला गोठा... १

पाण्यात बुडाली जनता कोरडी सफारी यांची
देताना उजवे डावे नेमकी हुशारी यांची
त्या मिठीत वाहुनी गेल्या सरकारी सार्‍या नोटा
संपन्न महाराष्ट्राचा यांनीच बनवला गोठा... २

धरणाचे पाणी गेले द्राक्ष्याच्या बागेकाठी
तो ऊस तरारुन आला सत्तेच्या खुर्चीसाठी
वारुणी घेऊनी सारे फिरवती हात हे पोटा
संपन्न महाराष्ट्राचा यांनीच बनवला गोठा... ३

बळीराजा पिचलाखचला मरणाचा घेती ठेका
सरणात जळाला कोणी नोटांची पूडकी फेका
या विरोधकांच्या माथी मारती पोलीसी सोटा
संपन्न महाराष्ट्राचा यांनीच बनवला गोठा... ४

दिल्लीच्या तख्तापुढाती लाचार वेचती दाणा
ते मुजरे करता करता विसरले मराठी बाणा
उपर्यांची पोटे भरती जनतेचा झाला गोटा
संपन्न महाराष्ट्राचा यांनीच बनवला गोठा... ५

गुलमोहर: 

सत्यवचन देवा !!!!

वा छान लिहिलीस रे..

नेहमीप्रमाणेच उच्च! Happy

प्रत्येक कडवे सुंदर!

शेवट्चे कडवे अत्यंत वास्तवदर्शी.

###########################
Friendship is always a sweet responsibilty, never an oppourtunity."

व्वा! मस्त लिहिली आहे...

'उपर्याची' म्हणजे काय? 'उपर्‍याची' हवं होतं का ते?