चिडीचूप चिडीचूप, तु ही चूप मी ही चूप
ना बोललो काही कुणा
कुजबूज कुजबूज, इथे गु़ज तिथे गुज
कशा कळल्या त्यांना खुणा
चहाडी करती कोणाचे अधर
अपुले हे गुपित, कोणी केली बखर
नक्की तो भ्रमर, त्याने दिली खबर
फुलपाखरू ते, होती त्याची नजर
कळ्यांचा ही नसे मज भरवसा
पानाआड डाव त्या साधी असा
वारा ही फितूर सामिल जसा
कस्तुरीगंध जनी वाटे पिसा
खरे सांग, असे घडले नाही
गिरविलेस का माझे नाव तूही ?
अडखळलीस का उल्लेखात ही ?
मोहरलीस का आठवून काही ?
नकळत नयन, तुझे माझे चुकून
एकांती सहज, बोलले का हसून ?
अपुल्याच जगी जाता हरवून
चेहरेच बहुधा गेले सांगून
सहजपणा खुप भावला मित्रा
पक्के मिटुन ओठ
तु दार बंद केले
डोळे परी तुझे ते
फितुरी करुन गेले
घायाळ शब्दकैदी
निसटुन मात्र गेले.
छान रे, कौतुक, मस्तच आहे.
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.