मी चंद्र तू चांदणी

Submitted by देवनिनाद on 10 October, 2008 - 03:10

मी चंद्र तू चांदणी
चांदणी का मज पाहूनी लाजते

चंद्राचे प्रेम पाहुनी
गाली खुदकन हासते

सखे ! तुझी प्रीत भासे
जणू शिंपल्यातील मोती

सख्या ! पहा चांदणे
जुळवी मनाची ही नाती

- देवनिनाद

गुलमोहर: 

देवानु लई झ्याक.

फकस्त येक करा, अर्धवट सोडु नका राव.
सुरेखच लिहितोयस मित्रा, थांबु नकोस.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.