तू

Submitted by विशाल कुलकर्णी on 10 October, 2008 - 02:47

तुझं अलगद येणं
माझ्या जाणिवांनी
टिपलं होतं.
तुझं नकळत जाणं
माझ्या डोळ्यांनाही
जाणवलं होतं.
तू आलीस
तेव्हा अंगणातला
प्राजक्त
बहरला होता.
जाई-जुई
कुजबुजायला
लागल्या होत्या.
आता
तू नाहीस...
बघ..
मोगर्‍याने सुद्धा
मान टाकलीय.

गुलमोहर: 

लय खास विशाल.

ठांकु सायबा !

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

जाई-जुई
कुजबुजायला
लागल्या होत्या...
छान रे विशाल

vishalya, hyat ajun yeudet thoda sakha sarkha. Tujhya kavitetlya ti baddal evadhasa lihun shant zalas, shya vishal ti sadhi saral asel pan 2jhyasathi kay hoti te dav ki jara..

Happy

खुप जूनी कविता आहे, जवळ जवळ दहा वर्षांपूर्वी केलेली आणि दिड वर्षापुर्वी माबोवर टाकलेली. पुन्हा वाचताना सगळा भुतकाळ जागा झाला.

पर्‍या, मलाच समजत नाहीये, मी स्वतःच दिवसातुन कितीतरी वेळा बदलतोय, कवितेचं काय घेवुन बसलास? Wink
बासुरी, धन्स गं !

विशाल : तुमची भटकंती या असल्या कविता लिहीण्यानंतरच सुरु झालेली दिसतेय.. Happy
कविता छानच... तिला माझ्या सर्टीफिकेटची गरज नाहीच ...:-)

परत आलोय.... वेळच झाला नाही...मैफील जमवायचीय पण लवकरच...
देअर इज ऑलवेज नेक्स्ट टाईम इन लाईफ.. Happy

तू आलीस
तेव्हा अंगणातला
प्राजक्त
बहरला होता.
जाई-जुई
कुजबुजायला
लागल्या होत्या.

खूप छान!!!!