घर

Submitted by विशाल कुलकर्णी on 10 October, 2008 - 02:32

तुझ्या
एका हंसण्यानं
आपल्यातलं
सारे अंतर
पार केलंय.
मधल्या...
सगळ्या...
भिंती पाडुन
मी
तिथे एक
दार केलंय.
स्वप्नात
पाहण्यासाठी
छोटंसंच..
एक घर
शोधलंय
तु
लवकर ये
तुझ्या माझ्या
घरासाठी
मी एक
नावही
ठरवलंय.
येशील ना ?

गुलमोहर: 

"नक्कीच. लबाड आहेस पक्का. " असं म्हणेल का रे ती ????

विशाल .... मस्तच जमलंय...