Submitted by दाद on 8 October, 2008 - 01:14
मन माझे घनराई
आले फुलून जाई-जाई
ही वेळ नव्हे फुलण्याची
ना दरवळण्याचा ऋतू
का मजला समजत नाही?
मन माझे घनराई...
किती किती, कसे समजाऊ
की, नकोस उजळत जाऊ
पर्ण-पाचुचे दीप तू ठाई ठाई
मन माझे घनराई...
रेलून कदंबा, उभा घेऊनी पावा
का छेडी व्याकुळ, गर्द-गर्द मारवा
मग पर्ण-पर्ण हे कर्ण-कर्ण लवलाही
मी माझी राहत नाही
मन माझे घनराई...
गुलमोहर:
शेअर करा
मी माझी
मी माझी राहत नाही
मन माझे घनराई...
मन माझे ही घनराई... आज दिवस चांगला जाईल एवढं छान वाटलं या कवितेने.
>>रेलून
>>रेलून कदंबा, उभा घेऊनी पावा
का छेडी व्याकुळ, गर्द-गर्द मारवा>>
क्या बात है!
मग
मग पर्ण-पर्ण हे कर्ण-कर्ण लवलाही>>>>>हाय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!:)
मन माझे घनराई>>>चोरावि वाटतेय ही ओळ अगदी
मग
मग पर्ण-पर्ण हे कर्ण-कर्ण लवलाही
मी माझी राहत नाही
मन माझे घनराई...
मस्त! हजारो कानांनी ऐकत रहावा असा मारवा!
सुंदर कविता
अहा! पर्ण
अहा! पर्ण पाचूचे दीप - सुंदर!!
क्या बात
क्या बात है.....!!
श्यामली........अगदी अगदी
मन माझे घनराई....... जबरी !!
वाह! खासच ..
वाह! खासच .. !
परागकण
आशाताईंनी
आशाताईंनी गायलेली घनराणी आठवली ...
व्वा दाद.. मस्तच... तो घननीळ येतोच नाही कुठुनसा..
सुंदर !
सुंदर !
व्वा
व्वा शलाका....मस्त कविता...एकदम फ्रेश वाटलं वाचुन
किती किती, कसे समजाऊ
की, नकोस उजळत जाऊ
पर्ण-पाचुचे दीप तू ठाई ठाई
सुंदर!!!!! खुप छान उतरल्यात सगळ्या भावना कवितेत...नेहमीप्रमाणे
वाह दाद !
वाह दाद ! मस्तच !!
फक्त
फक्त पहिल्या ६ ओळी आवडल्यात. बाकीच्या नाही..
दाद गं
दाद गं दाद,
कानात हिरवी सृष्टी गुणगुणतेय असं वाटलं....
काय सुरेख
काय सुरेख लय आहे दाद
>> रेलून कदंबा, उभा घेऊनी पावा
सकाळी सकाळी त्या निळ्या जादूगाराचे दर्शन घडवलेत !
आभार
आभार सगळ्यांचे (बी सकट).
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया
व्वा! छान
व्वा! छान आहे कविता.....
<<आशाताईंनी गायलेली घनराणी आठवली >>
मलापण. उपास, ते 'घनराणी' नसून 'घन रानी' आहे...
छान! शरद
छान!
शरद
सुंदर
सुंदर
सुंदर,एकदम
सुंदर,एकदम चित्रदर्शी. गार,गार वाटले
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल
तुम्ही
तुम्ही कवितांपेक्शा लघुकथाच जास्त करून लिहिता आणि त्या अतिशय सुंदर असतात. पण क्वचित जेंव्हा कविताही लिहिता, त्या मनाला भिडणार्या आणि अर्थघन असतात. घनराईच्या पहिल्या दोन ओळी [की मुखडा?] मला तरी अनावश्यक 'परिचय' वाटला. पुढची कविता नितांत सुंदर आहे!
-बापू करंदीकर
क्या बात
क्या बात है!
मग पर्ण-पर्ण हे कर्ण-कर्ण लवलाही
मी माझी राहत नाही..
केवळ!
रेलून कदंबा, उभा घेऊनी
रेलून कदंबा, उभा घेऊनी पावा
का छेडी व्याकुळ, गर्द-गर्द मारवा
मग पर्ण-पर्ण हे कर्ण-कर्ण लवलाही
मी माझी राहत नाही
मन माझे घनराई...>>>
हाय हाय.... मार डाला....