चौकट

Submitted by pkarandikar50 on 7 October, 2008 - 13:15

चौकट

त्याचा रंधा अचूक फिरत होता
खिळे घट्ट लागले होते
एक चौकट भक्कम
अधांतरी लटकली....

"काय आहे हे? कुठल्या चित्राची चौकट?"

"ह्या चौकटीत बंदिस्त करतोय, काळ..
गोठवून ठेवायचंय त्याला."
माझ्याकडे ढुंकून न पहाता तो म्हणाला.

" आणि माझ्या मुलीच्या डोळ्यातली शेवटची
उजेडाची तिरीप, त्याची सोबतीण.
नाहीतर एकटं वाटेल त्याला."

"कुठे ठेवणार आहेस हे चित्र.. म्हणजे चौकट?"

"नदीच्या पाण्यात."

"काय होणार पुढे तिचं?"

"कुणास ठाऊक? कदाचित . .
माझ्या चिमुरडीचं झालं तेच?
झोपडीच्या राखेतून
माझ्या वाटेकडे तीचे डोळे लागले होते.
तिच्या अश्रुंचा एक पूर
ह्याच नदीकडे धावला होता.
तिच्या गळ्यातला क्रूस
याच लोंढ्यात वहावला होता ...
त्याच पाण्यात समाधिस्थ करणार आहे
मी काळाला, या चौकटीत कोंडून."

"किती,दिवस, महीने, वर्षे, राहील तसा तो?"

तो खिन्नपणे हसला.
"मला त्याची फिकीर कशाला?
त्याला खणून काढायला येतील
कुणी संशोधक, छिन्नी-हातोडे घेऊन...
म्हणतील, हा घ्या पुरावा.
पुढच्या निवडणूकीत
उपयोगाला ये ईल, कदाचित."

-बापू करन्दिकर

गुलमोहर: 

शंभर टक्के जरी कळलं नसलं तरी लागलेल्या संदर्भातून मी कंधमालला पोहोचलो.

आवडली.

    ***
    Cole's Law : Thinly sliced cabbage salad rules.

    कौतुक्,स्लर्ति,
    धन्यवाद.
    कौतुकचा तर्क अगदी अचूक ! कन्धमाल हेच या कवितेचं निमित्त होतं . हे लक्षात आल्यावर, त्या कवितेत न कळण्यासारखं काही शिल्लकच रहात नाही. कन्धमालच नव्हे, हे जागोजाग घडतय, घडणार आहे. हे एक कटु सत्य आहे.
    बापू करन्दिकर