Submitted by चाऊ on 7 October, 2008 - 09:39
आज तुझ्या शरीराला
वेदनेचा स्पर्श नाही
आज तुझ्या मनाला
जुनी कोणती खंत नाही
गुणगुणत्या गीताला
सूर एक आर्त नाही
खळाळत्या हास्यासवे
कधी पापणी सर्द नाही
झाकोळणारी नभाला
एक छाया गर्द नाही
कुणा खुळ्या जीवासाठी
विरहाची हूरहूर नाही
हळूवार सतावणारा
खोडकर राग नाही
फीरुनी समजूत पटता
मुग्ध तो अनुराग नाही
कारण
चिमुकल्या जीवास अजुनी
यॊवनाचा गंध नाही
ह्या तुझ्या ह्रुदयास अजुनी
प्रीतीचा तो छंद नाही
गुलमोहर:
शेअर करा
फिरूनी तिच
फिरूनी तिच कहाणी. छान चाऊ.
khup chan kavita . Avadli .
khup chan kavita . Avadli . Keep it up