चारोळी

Submitted by ZindagiRocks on 7 October, 2008 - 09:30

डोळे तुझे आठवल्यावर...
शब्द सहज स्फुरतात...
ओठांची पाळी येताच मात्र..
दगा-फटका करतात...

तु सोबत असताना...
मी माझा उरत नाही...
आणि तु सोबत नसताना...
मीच उरत नाही......

गुलमोहर: 

आणि तु सोबत नसताना...
मीच उरत नाही......

किती छान कल्पना आहे!!!

वा ! क्या बात है !
अप्रतिम !

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.