शून्य

शून्य म्हणाला एकाला
मला सोडून जाशील कुठे?
तु़झी नि माझी जन्माची गाठ
दोन म्हणाला पाचाला
तुझे नि माझे गणितच आडवे
तीन म्हणाला सहाला
तू माझ्या विरोधातच का?
तुझी नि माझी दिशा निराळी
चार म्हणाला आठाला
तू माझ्या दुप्पट असता
मला का एक शिंग जास्त?
सात म्हणाला नवाला
तुला नि मला
कसा पडला शून्याचा घाला?


कविता छान आहे. बालकवितेमध्ये ठेवायला जास्त योग्य.



नाही ताई. यात मांडणी वेगळी आहे. पण ज्यो भुमितीवरून गणितावर आलाय. बहूतेक सगळ्या विषयांचे वर्ग घेणार. (हा विनोद बर्का !!! ज्योभाऊ)



तुला गणित व भूमिती एवढा फरक कळला हेच फार झाले.
गणित हे जीवनाशी किती निगडीत आहे हे सांगणण्याची........
मूळ कवितेचा आशय: स्री व पुरुष हे दोघेही सृष्टीचक्राचे घटक परंतु समाजाने स्रिला नेहमीच दुय्यम स्थान दिले. स्रियांची किंमत शून्य असे समजणारा समाज हे विसरतो की शून्यातूनच हे विश्व निर्माण झाले आहे. पुरुष स्वतःला स्रीपेक्षा श्रेष्ठ समजतो म्हणून त्याची किंमत शून्यापेक्षा जास्त म्हणजेच एक्.आता एकच का? तर पुरुषांना नेहमी पढेच असणे आवडते याचाच अर्थ प्रथम क्रमांक. हे झाले शून्य व एकचे गणित.
शून्याच्या पुढे एक असतो तेव्हा एकची किंमत स्थिर राहते. त्याच एकच्या पुढे शून्य ठेवल्यास एकची किंमत दहा होते यावरुन काय समजायचे ते समज....
तसेच एक काढ्ण्याकरिता आधी शून्याचीच मदत घ्यावी लागते.संपूर्ण कवितेचे स्पष्टीकरण देणे शक्य नाही.
जीवनातील सात सूर,नऊ रस्,षड्ररिपू नि अजून बरेच काही याचा अर्थ प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार शोधावा.



ज्यो, मी म्हणून म्हणालो, यात मांडणी वेगळी आहे. आता राहीला अर्थाचा प्रश्न. कवितेची मांडणी गुढ असली की वाचणार्‍याने हवा तसा अर्थ काढावा हे स्वातंत्र त्याला मिळ्तेच. किंबहूना तो रसिकाचा हक्कच. म्हणून अलकाताईना ती बालकविता वाटली पण मला नाही. रसग्रहणाबद्द्ल आभार.
गणित वा भुमिती असो..प्रत्येक विषय हा जीवनाशी निगडीत आहे व कविला कोणत्याही विषयाचे बंधन नाही. तेव्हा आपण आपली लेखणी चालवा. आम्ही आनंद घेऊच.



ज्यो, तू जसे रसग्रहण केलेस तसा अर्थ अजिबात लागत नाही या कवितेचा. मलाही ही बालकविता किंवा एक विनोदी कविताच वाटली. कुठेच स्त्री पुरुष यांचा विचार देखील मनात येत नाही.



अलका,बी आणि श्री. शिरोडकर,
धन्यवाद.
अनेक प्रेमगीते ही भक्तिगीते म्हणूनही आळवली जातात्.तसेच बालकविताही गूढकविता असू शकते.बी तुझी शंका बरोबर आहे. कारण आजपर्यंत साहित्यात फक्त निसर्ग प्रतिमांचाच अधिकाधिक वापर करण्यात आला आहे.त्यामुळे गणिती प्रतिमांचा अर्थ लावणे तसे अवघड आहे.याची जाणिव आहे.या कवितेत स्री पुरुष हा अर्थ 'तुझी नि माझी जन्माची गाठ' या ओळीतून सूचित होतो.