चारोळी / चारोळ्या

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 October, 2008 - 09:43

ओठावर सुर होते
बोटावर ताल होते
एक तु नव्हतीस
जगणे कसे बेताल होते.

तिने कधी वळुन
पाहिलेच नाही,
तिच्याकडे पाहण्याच्या नादात
हे कधी कळलेच नाही.

डोळ्यांची भाषा मुळी
ओठांना कळत नाही,
म्हणुन मौनाची तीव्रता
शब्दांत असत नाही.

तेजाळणार्‍या ज्योतीला
तिची जात विचारायची नसते,
ती देवापुढे पणती
तर सरणापुढे दिवटी असते.

क्षितीजापाशी
सुर्याची पिल्ले रेंगाळली,
सागराच्या डोळ्यातही
अनोखी ममता जागली.

शेवटची.....

माणसाचं असणं
दिसण्यात दिसत नाही,
म्हणुनच असण्याला
दिसण्याइतकं महत्व नाही.

विशाल.

गुलमोहर: 

धन्यवाद, कौतुक कडुन कौतुक करुन घेण्यात एक वेगळेच कौतुक आहे, नाही?

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

दिप्ती, गंगाधरदादा, धन्यवाद...
सगळ्या जुन्या आठवणी जागवताय तुम्ही माझ्या Wink

लय भारी !!

चायला बरेच दिवसांनी निदान कळलं तरी नेमक काय म्हणायचय लिहिणार्‍याला ते.. हुश्श्श्श्श्श्श्स

माणसाचं असणं
दिसण्यात दिसत नाही,
म्हणुनच असण्याला
दिसण्याइतकं महत्व नाही.>>>>
ही चारोळी म बो वरच्या डु आयडीं साठी आहे का रे?

विशाल, छान Happy

>>विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

हे काय आणखी
एक प्रतिभावंत कवी फोन नंबर देतो, तू पत्ता दे!! आणि तो ही अर्धवट. पूर्ण तरी दे, पोस्ट्कार्ड टाकेन Wink Biggrin

विशल्या, सराईत नव्हतास हे कशावरून रे... सराईत होतास पण भुमिगत का राहिलास याचा खेद.. Wink आता अंकुरला आहेस अन चांगले शेंडे सुद्धा फुटले आहे Proud

चारोळ्या भन्नाट.. Happy

मस्तच रे विशाल Happy

तेजाळणार्‍या ज्योतीला
तिची जात विचारायची नसते,
ती देवापुढे पणती
तर सरणापुढे दिवटी असते.<<< ही खास आवडली Happy

सगळ्यांचे आभार, खासकरुन गंगाधरदादांचे, या चारोळ्या पुन्हा पहिल्या पानावर आणल्याकारणे... Happy

सुक्या..., इथे सराईतचा अर्थ वेगळा आहे Wink

धन्स Happy

तेजाळणार्‍या ज्योतीला
तिची जात विचारायची नसते,
ती देवापुढे पणती
तर सरणापुढे दिवटी असते.

ही आवडली खुप!! बाकीही मस्तच!!!