सविता हलपनवार

Submitted by Mandar Katre on 16 November, 2012 - 11:56

सविता हलपनवार नावाची आयर्लंड मधे राहणारी भारतीय गर्भवती महिला डॉक्टरांनी गर्भपात करायला नकार दिल्यामुळे जग सोडून गेली . अर्थात तुम्हीसुद्धा ही बातमी वाचलीच असेल. आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर गर्भपात करू शकत नाही. त्या दुर्दैवी बाईच्या नवर्‍याने हरतर्‍हेने डॉक्टरांशी बोलून पाहीलं असणार पण तीन दिवस असह्य वेदना सहन करून शेवटी तीने प्राण ठेवला. थोडक्यात म्हणजे धर्माने (की धर्माच्या नावाखाली अंधश्रद्ध लोकांनी ?) आणखी एक बळी घेतला.

अतिशय दुर्दैवी घटना . अंधश्रद्धाळू फक्त हिंदूच असतात असे कोकलणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक !

या बाबतीत सविताच्या समर्थनार्थ आणि असे पुन्हा जगभरात कुठेही होऊ नये म्हणून एक व्यापक चळवळ (निदान फेसबुक/इंटरनेट वर तरी )चालवून करोडो भारतीयांच्या सह्या असलेले निषेधपत्र संबंधित चर्च/ देशांच्या सरकारांना पाठवणे आवश्यक.

आपण तेवढे तरी निदान केलेच पाहिजे असे वाटते..................!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंधश्रद्धाळू फक्त हिंदूच असतात असे कोकलणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक !<<

धर्मांध सग्ळेच मूर्ख असतात, त्यात हिंदू, मुसल्मान, ख्रिश्चन असा फरक करताच येत नाही. जितका जास्त धर्मांध तितका जास्त मूर्ख.

धर्माधिष्ठीत राज्यव्यवस्था हव्या असणार्‍या सर्वच धर्माच्या मूर्खांच्या डोळ्यात थोडे अंजन या निमित्ताने पडले तर बरे होईल. तिथल्या डॉक्टरांनी गर्भपात केला नाही, कारण त्या देशीचे गर्भपातविषयीचे कायदे धर्माच्या आधारे बनवले गेलेत. कायदे मोडणार्‍या डॉक्टरला शिक्षा होते. (अन व्हायलाच हवी. कायदा मूर्ख आहे, डॉक्टर नव्हे) हे कथेतले मूळ सार बाजूला ठेवून सेन्सेशनल बातम्या टीआरपीसाठी टीव्हीवाले दाखवत आहेत, तसेच काहीसे तुम्हीही मांडले आहेत. (तरी तुमच्या इतर लिखाणापेक्षा तुलनेने बरेच माइल्ड वाटले)

दुसरा प्रश्न मला समजत नाही, की तो गृहस्थ बेळगावातून मुलाखती देतो आहे. सविताला आयर्लंडबाहेर नेणे शक्य नव्हते काय? कैदेत वगैरे ठेवले होते? असो. माहितगारांनी अधिक माहिती द्यावी.

दुसरा प्रश्न मला समजत नाही, की तो गृहस्थ बेळगावातून मुलाखती देतो आहे. सविताला आयर्लंडबाहेर नेणे शक्य नव्हते काय? कैदेत वगैरे ठेवले होते? असो. माहितगारांनी अधिक माहिती द्यावी. >> miscarriage झाले आहे असे वाटल्यामुळे अ‍ॅडमीट केलेले होते. अशा वेळी प्रवास शक्य नव्ह्ता असे वाचलेले.

खुप वाईट वाटले न्युज वाचुन. २-३ दिवस सलत होते मनात, बिचारि किति असह्य वेदना सहन केल्या असतिल तिने या दिवसांमधे इमॅजिन करवत नाहि.
बाकि आयर्लंडच्या डॉक्टरांनी एक जीव जो गेलेला होता त्याच्यासाठि अजुन एक जीव गमावला. त्या पोटातल्या जीवासाठि ज्याचे existance देणारी होणारि आई/ मुलगी/बहिण्/बायको -तिचा जीव या लो़कांना महत्वाचा वाटला नाहि. त्या होणार्‍या आईच्या मताची/जीवाचि कायद्यापुढे काहिच किंमत नाहि?
थोडे विषयांतर - माझी एक गोरि म्हातारि कलिग होति जुन्या कंपनिमधे , ती गर्भपात विरोधि लोकांच्या विरुद्ध होति,नेहेमी म्हणायचि या लोकांना (माणसांना) आयुष्यात एकदातरि किडनीस्टोन व्हावा तेंव्हा त्यांना बायकांच्या डिलिव्हरि पेन चि थोडि तरि कल्पना येईल.

या बाबतीत सविताच्या समर्थनार्थ आणि असे पुन्हा जगभरात कुठेही होऊ नये म्हणून एक व्यापक चळवळ (निदान फेसबुक/इंटरनेट वर तरी )चालवून करोडो भारतीयांच्या सह्या असलेले निषेधपत्र संबंधित चर्च/ देशांच्या सरकारांना पाठवणे आवश्यक.

आपण तेवढे तरी निदान केलेच पाहिजे असे वाटते..................!

मान्य.

आणि अगदी अशीच चळवळ आपल्याकडील अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करणारांविरुद्ध करून, तो कायदाही संमत करून घेतला पाहिजे.

अतिशय वाईट घटना!
प्रिया७>>> +१

सविताला आयर्लंडबाहेर नेणे शक्य नव्हते काय? कैदेत वगैरे ठेवले होते? असो. माहितगारांनी अधिक माहिती द्यावी.>>>>> इब्लिस तुम्ही डॉक्टर आहात त्यामुळे अशा केसेस मध्ये येणार्‍या कॉप्लिकेशन्सची तुम्हाला कल्पना आहेच. एकच सांगु शकते की बर्‍याचशा प्रगत देशांत २-३ दिवसाच्या कालावधीत सेकंड ओपिनियन घेणे किंवा सवितासारख्या केसमध्ये देशाबाहेर पडणे शक्य होत नाही! बाकी तिचा नवरा आता परत बेळगांवात आला असावा असा एक अंदाज.

घटना अत्यंत दुर्दैवी आहे.

अंधश्रद्धाळू फक्त हिंदूच असतात असे कोकलणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक !
------ हे मत अस्थानी तसेच असंबंधित आहे असे वाटते. अंधविश्वास प्रत्येकच धर्मात आहे... येथे एका व्यक्तीचा जिव गेलेला आहे हे ध्यानात घ्यावे.

धर्मांध सग्ळेच मूर्ख असतात, त्यात हिंदू, मुसल्मान, ख्रिश्चन असा फरक करताच येत नाही. जितका जास्त धर्मांध तितका जास्त मूर्ख.<<<
+१००

बाकी इब्लिस, वत्सला म्हणते तसं अनेक ठिकाणची सिस्टीम आणि पेशंटची परिस्थिती ह्या समस्या असू शकतात. ते बहुतेक तुम्हालाच जास्त चांगले समजावे.

बातमीनुसार आयर्लन्डच्या बाहेर गर्भपात करायचा असेल तरी तिथल्या कायद्याप्रमाणे परवानगी लागते. ह्या मंडळीनी आयर्लण्डचे नागरिकत्व घेतले असावे.

बातमी अर्धवट कळलीय. खरंच प्रसारमाध्यमे आणि त्या बाईंचा नवरा जे दावे करतायत ते पूर्णपणे खरे वाटत नाहीयेत. बाळाचे हार्टबिट चालू असताना केवळ एबॉर्शन वेळेवर केले नाही म्हणून तीन दिवसात अ‍ॅडमिट पेशंट्चा जीव गेल्याची घटना मी तरी इतक्या वर्षात अनुभवली नाहीये. ते पण वेल इक्विप्ड सेंटरमध्ये.
बाकी अ‍ॅबॉर्शनसारख्या या गोष्टी धार्मिक किंवा इतर भावनांपेक्षा मातेचा जिव वाचविणे या एकाच गोष्टीवर आधारित असाव्यात या सगळ्यांच्या भावनेशी सहमत.

सविता भारतीय /हिंदू होती यापेक्षा काही देशांत अजूनही गर्भपाताला मान्यता नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

श्री.मंदार कात्रे यानी विषय मांडताना लिहिले आहे ~ "आयरीश कायद्यानुसार, जोपर्यंत पोटातल्या बाळाचे हृदय चालू आहे तोवर गर्भपात करू शकत नाही...." ~ हे सत्य असले तरी आयरिश मेडिकल कौन्सिलने आपल्या व्यावसायिकांना दिलेल्या गाईडलाईन्समध्ये असेही सूचित केले आहे की, कोणत्याही कारणास्तव बाळंतिणीचा जीव धोक्यात येत आहे असे दिसत असल्यास 'गर्भपात' करण्याची संबंधित डॉक्टरांना परवानगी आहे.

आता इथे प्रश्न असा उदभवतो की श्री.प्रविण हलपनवार यानी सविताला ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते तेथील डॉक्टरांच्या टीमने आयरिश मेडिकल कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्वाला टाळून चर्चचा गर्भपातासंदर्भातील आदेश का पाळला असावा ?

या घटनेच्या निमित्ताने आयर्लन्डमध्ये जे काही वादळ उठले आहे त्याच्या वाचनातून असेही समजले की, तिथल्या डॉक्टरांची गर्भपातविषयातील अंधश्रद्धाच्या साखळीला जखडणारी मते माहीत असल्यामुळे मूळच्या आयरिश स्त्रिया स्वत:च्या गर्भपातासाठी आयर्लन्डमध्ये न राहता शेजारी इंग्लंड वा वेल्शमध्ये मुक्कामास जातात आणि तिथे गर्भपाताला कायदेशीर परवानगी असल्याने आपला कार्यभाग तिथेच आटोपतात.

अशोकजी,
मेडिकल काऊन्सिल च्या 'गाईडलाईन्स' असतात. कायदा कायदा असतो.तिकडे कायद्याची अंमलबजावणीही कडक असते बहुतेक.

(आयरिश टाईम्स.कॉम:
“The doctor told us the cervix was fully dilated, amniotic fluid was leaking and unfortunately the baby wouldn’t survive.” The doctor, he says, said it should be over in a few hours. There followed three days, he says, of the foetal heartbeat being checked several times a day.

“Savita was really in agony. She was very upset, but she accepted she was losing the baby. When the consultant came on the ward rounds on Monday morning Savita asked if they could not save the baby could they induce to end the pregnancy. The consultant said, ‘As long as there is a foetal heartbeat we can’t do anything’.

“Again on Tuesday morning, the ward rounds and the same discussion. The consultant said it was the law, that this is a Catholic country. Savita [a Hindu] said: ‘I am neither Irish nor Catholic’ but they said there was nothing they could do.

“That evening she developed shakes and shivering and she was vomiting. She went to use the toilet and she collapsed. There were big alarms and a doctor took bloods and started her on antibiotics.

“The next morning I said she was so sick and asked again that they just end it, but they said they couldn’t.”

अशा प्रकारचा धर्माधिष्ठित व मूर्ख कायद्यात बदल केलाच गेला पाहिजे हे माझे मत आहे.)

>>तिथल्या डॉक्टरांची गर्भपातविषयातील अंधश्रद्धाच्या साखळीला जखडणारी मते<<
हे वाक्य तुम्ही कसे मांडलेत ते समजले नाही, कारण तुमच्याच प्रतिसादात वरती काऊन्सिलने कायदा न पाळता टर्मिनेट करा असे सांगितलेले आहे असे आपण म्हणता.

अजूनही नीटसं समजलेलं नाही. इब्लीस यांच्या पोष्टीतून जे समोर येतंय त्यात तथ्य असल्यास त्यांच्याशी सहमत. (मात्र मूर्ख या शब्दावर आक्षेप येऊ शकतात तेव्हां सांभाळून )

डॉक्टर....

"हे वाक्य तुम्ही कसे मांडलेत ते समजले नाही.... " ~ म्हणजे माझा रोख गॅल्वे युनि.हॉस्पिटलमधील त्या विशिष्ठ डॉक्टरांकडे, ज्यानी तेथील मेडिकल कौन्सिलच्या गाईडलाईन्सला दुर्लक्षून चर्चसंमत कायद्याला महत्व दिले त्याकडे होता. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास 'गाईडलाईन्स आहेत, त्या आम्ही पाळल्याच पाहिजेत असे काही नाही...' असेच त्या चर्चनिष्ठ डॉक्टर्सना अभिप्रेत असल्याने त्यांची विद्वता अंधश्रध्देला किती जखडली गेली आहे याचे प्रत्यंतर त्यांच्या वर्तणुकीवरून स्पष्ट दिसून आले.

बाकी तुम्ही म्हणता तसा तेथील या संदर्भातील कायदा तातडीने बदलला पाहिजे यावर खुद्द आयर्लंडमध्येच मोठ्या प्रमाणावर जनमत तयार झाल्याचे चित्र दिसत आहे.

हेही नसे थोडके !

झणझणीत साहेब,
कायदा गाढव असतो असे आपण म्हणतो. इंग्रजीतही त्याला अ‍ॅस वगैरे म्हणत असावेत बहुतेक. पण धर्माचा (पोथीचा) आधार घेऊन बनवलेला कायदा, हा मूर्खपणाचा आहे असे म्हणावेसे वाटते. तो सूज्ञपणाचा असता, तर हा इतका आंतरराष्ट्रीय गदारोळ उठला नसता असे वाटते.

पाटील सर,
>>दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास 'गाईडलाईन्स आहेत, त्या आम्ही पाळल्याच पाहिजेत असे काही नाही...' असेच त्या चर्चनिष्ठ डॉक्टर्सना अभिप्रेत असल्याने.. <<
"..मात्र कायदा पाळलाच पाहिजे" हे तुम्ही अर्धवट सोडलेल्या अवतरणातील उरलेले वाक्य आहे.

महोदय, कोर्टात गाईडलाईन्स नाही तर कायदा गृहित धरला जातो, हे मी आपणास सांगवे असे नक्कीच नाही.
अवांतर : कायद्यात अमुक करू नका असे लिहिले तरीही ते करून मोकळे व्हायला तिकडे आपल्याकडच्यासारखे धीट डॉक्टर नसावेत बहुतेक. Happy

डॉ पेक्षा इथे लोकांनी कायद्याच्या विरुद्ध बोलायला हवे ना? गर्भपाताचा हक्क बायकांना हवाच म्हणुन.

अतिशय दुर्दैवी घटना . अंधश्रद्धाळू फक्त हिंदूच असतात असे कोकलणाऱ्या महाभागांना सणसणीत चपराक >>
अगदीच अस्थानी वाक्य आहे. याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?

सविताच्या समर्थनार्थ चळवळ करायची म्हण्जे नक्की कशाबद्दल चळवळ अपेक्षित आहे? तिथे बायकांना गर्भपाताचा हक्क मिळावा अशी की धर्माला कायद्यामधे स्थान देऊ नये अशी. ?? ही चळवळ त्या देशाच्या नागरीकांनी केली पाहिजे.
सुनीत यांनी म्हण्ल्याप्रमाणे आपण आपल्याच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासाथी चळवळ करणे गरजेचे आहे.

सविता ही स्वता: एक डेंटिस्ट होती,

तीचा मृत्यू २० ऑक्टोबरलाच झाला , आयरीश सरकारने ईतके दिवस

हे प्रकरण दाबून ठेवले होते,

आयरीश सरकारने त्या प्रकरणा वर चौकशी समिती नेमली आहे व त्याचा अहवाल अजुनही प्रतीक्षित आहे.

कळस म्हणजे ह्या चौकशी समिती ने सविताच्या नवर्याची बाजू विचारातन घेतलीच नाही,

त्याची मुलाखत घेतलीच नाही.

कालच झी बातम्या वर ह्या विषयी प्रोग्राम झाला त्यावरून !!

काय हो डॉक्टरसाहेब, नाव सोडून विशेषण वापरण्याची गरज पडली ते ? Wink
मी एका ठिकाणी नॉनसेन्स अ‍ॅक्शनला समानार्थी म्हणून मूर्ख हा शब्द वापरला आहे, त्याला आक्षेप घेतला गेल्याने इथे इशारा दिलाय फक्त. एका सदस्याने तर मलाच मूर्ख हा शब्द वापरला होता तेव्हां कुणी आक्षेप घेतला नव्हता हे विशेष Proud

डॉक्टर....

"कोर्टात गाईडलाईन्स नाही तर कायदा गृहित धरला जातो,....."

~ नक्कीच. यात अमान्य करण्यासारखे काहीच नाही, त्यामुळे १००% सहमत.

एक शंका आहे. जर अ‍ॅडवान्स स्टेज मध्ये होती तर सी सेक्षन करता आला असता का? तिचा जीव वाचला असता कदाचित. कि त्यावरही काही निर्बंध आहेत?

मामी,

ती 'थ्रेटन्ड अ‍ॅबॉर्शन' ची केस होती. सीझर म्हणजे बाळंतपण हीच प्रक्रिया असते. म्हणजे, 'व्हायेबल फीटस' (स्वयंपूर्ण जीव म्हणून वेगळे जिवंत राहू शकेल इतपत विकसित बाळ) आईपासून वेगळे होण्याची / करण्याची क्रीया.
थ्रेटन्ड अ‍ॅबॉर्शन च्या उपचाराची तत्वे व बाळंतपणाची सर्वस्वी वेगळी आहेत.

दुसरे म्हणजे (जे मी वाचले त्याप्रमाणे), तिचा मृत्यू सेप्सिस मुळे झाला असे अहवालात आहे . अ‍ॅबोर्ट करण्यापेक्षा, अँटिबायोटिक्स लवकर सुरू केली नाहीत असा काहिसा आक्षेप आहे.

(पेशंटने सांगितले म्हणून अ‍ॅबोर्ट करणे, पेशंटने सांगितले म्हणून सिझर करणे, किंवा पेशंटने सांगितले म्हणून 'डाक्टर मला एक सुई मारून वर धाडून द्या. नाही सहन होत'... या व अशा गोष्टी उपचार करणारे डॉक्टर करीत नाहीत, व करूही नाहीत. अगदी असे सांगणारा रुग्ण स्वतः डॉक्टर असला तरी.)

भरत, सविता सेप्टिसेमियाने गेली अ‍ॅबॉर्शन न केल्यामुळे नाही असे तुम्ही दिलेल्या लिंकमधल्या बातम्या वाचून माझे मत बनलेय. त्यात एका लिंकमध्ये डॉ नी नंतर डेड फिटस रिमूव्ह केलं असंही म्हटलंय.
१७ विक्सच्या प्रेग्नन्सीत हार्टबिट चालू असताना भारतातही कुणी अ‍ॅबॉर्शनचा सल्ला दिला असता असे मला वाटत नाही.
वरती कुणितरी म्हटल्याप्रमाणे अँटिबायोटिक्सचा अयोग्य किंवा वेळेवर न झालेला वापर हे कारण असू शकते.
(हे मी अगदी स्वनुभवाने सांगत आहे)
मलातरी निदान याप्रसंगास प्रो अ‍ॅबोर्शन मंडळी कॅश करतायत असे वाटते.

Pages