हा लढा कसा लढु ?

Submitted by नितीनचंद्र on 22 October, 2012 - 01:37

मी एल.जी. प्रोड्क्टचा फ़ॅन आहे. माझ्याकडे एक एल.जी.टिव्ही, एक एल.सी.डी., एक फ़्रिझ, एक डिव्हिडी, एक डेस्क टॉप मॉनीटर इतक्या गोष्टी आहेत.

माझ्या फ़्रिझच्या डिप फ़्रिज़रचा ट्रान्परंट दरवाजा त्याच्या बिजागरीत तुटला. गेले दोन महिने फ़ॉलोअप करुन फ़्रिज़ वॉरटीमध्ये असताना हा सुट्टाभाग आता बनवत नाहीत असे तोंडी उत्तर मिळते.

यामुळे फ़्रिझ जास्त वेळ लोड होऊन कॊप्रेसरचे आयुष्य कमी होईल असे वाटते. कारण डिप फ़्रिझरला कॉप्रेसर ऑन/ऑफ़ करणारा थर्मॊस्टॅट बसवलेला असतो. या शिवाय कॉप्रेसर जास्त वेळ चालुन वीजेचे बील जास्त येत आहे.

माझा सर्व फ़ॉलोअप सुमारे १५ इमेल मध्ये आहे. मला नाईलाज झाल्यासच कंझ्युमर कोर्टात जायचे आहे.

ही लढाई कंझ्युमर कोर्टात न जाता कशी लढावी ?

कुणाचा काही अनुभव असल्यास कळवावे.

एल.जी.च्या मुख्य कंपनीकडे दाद कशी मागावी ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा एल जी चा कॉमन प्रॉब्लेम आहे..माझ्याही फ्रीझ ला हाच प्रॉब्लेम आला आणि हेच उत्तर मिळाले.. त्यांनी नंतर खूप कटकट केल्यावर एक दरवाजा आणुन बसवला आहे..पण तो नीट लागत नाही.. थोडेसे लिकेज आहेच

आंबा + १
नाहीतर एक्सचेंज ऑफर आहेतच चांगली किंमत देत असतील तर विकुन टाका ?
बिल तरी वाचेल

फ्रीजच्या आतला डीप फ्रीझरचा दरवाजा आहे का? की बाहेरचा सेपरेट आहे?
आतला असेल तर जास्त लोड घेऊ नका. काय फार फरक पडत नाही. अन वीज वापरात तर अजिबातच फरक पडत नाही.

फ्रीजच्या आतला डीप फ्रीझरचा दरवाजा आहे का? की बाहेरचा सेपरेट आहे?
मोठ्या दरवाज्याच्या आत एक प्लॅस्टीक्/फायबर चा ट्रान्स्परंट दरवाजा आहे/होता

आतला असेल तर जास्त लोड घेऊ नका. काय फार फरक पडत नाही. अन वीज वापरात तर अजिबातच फरक पडत नाही.
यावर तीन महिन्यांचे वीज बील पाहुन अभ्यास करतो आहे.

असे सुटे भाग बनवणे बंद केले तरी, स्टोअरमधे असतातच. त्यांच्या एखाद्या मोठ्या डिलरकडे पण असायला हवा. तात्पर्य ग्राहक मंचाकडे जाच. त्यापुर्वी स्थानिक दोन / तीन वर्तमान पत्रात पण अवश्य लिहा. अशा नकारात्मक प्रसिद्धीला सगळ्याच कंपन्या घाबरतात.

पूर्वी सकाळ पेपर मध्ये ग्राहक मंचाचे टेलिफोन नं वै. यायचे आणि त्यांचे ह्या संदर्भातले सदरही असायचे. तिथे ग्राहक त्यांच्या तक्रारी पब्लिश करत असत. आणि प्रकरण तडीस गेल्यावरचे चांगले अनुभव ही शेअर करत असत. दिनेशदा म्हणतात त्याप्रमाणे वर्तमान पत्रात लिहून आलेल्या नकारात्मक प्रसिद्धीला भिऊन कंपनीज चांगले रीस्पोन्स देण्याची शक्यता आहे.

डीटेल्स द्या.

१. बिल नं आणि तारीख
२. कोणाकडून घेतला ?
३. सर्वात जुना कंप्लेन्ट नंबर
४. तुम्हाला नक्की काय हवं आहे ?
५. मॉडेल

संपर्कातून फोन नं. कळवा. कायदेशीर असल्यास काम होईलच.

अमित
९८६७१३६९२०

माझ्याकडे २०-२५ वर्षे जुना गोदरेजचा फ्रीज होता. त्याच्या डीफ फ्रीझरचा प्लॅस्टिकचा आतील दरवाजा मोडला, तो काढून फेकून दिला. तसाच तो ३ वर्षे वापरत होतो. सुंदर चालत होता. गेल्या वर्षी तो फ्रीज विकला Wink चक्क ३ हजार रुपयांना.
या संपूर्ण काळात कुठेही वीजबिल जास्त आले वगैरे जाणवले नाही. शेवटी संपूर्ण खोक्याच्या आतील टेंपरेचर मेण्टेन करण्यासाठी जी लागेल ती वीज. मधल्या कप्प्यांचा फरक पडेल असे मला वाटत नाही.

पण असो. फ्रीज तुमचा आहे, तुम्ही धागा काढून विचारलेत म्हणून अनाहुत सल्ला दिला होता.

इब्लीस, धन्यवाद पण आजच्या कॉपिटीशनच्या युगात मुळात अनावश्यक सुट्टा भाग लावलाच जात नाही. त्या दरवाज्याचा काहिना काहितरी फंक्शनल उपयोग असणार यास्तव तो बदलुन मिळायला हवा असा माझा आग्रह आहे.

तुम्हाला या साइट्सचा उपयोग होतोय का ते पहा :
http://www.lg.com/in/support
http://www.complaintboard.in/complaints-reviews/lg-india-l16977.html

कस्टमर केअरला फोन केलात तेव्हा तक्रार क्रमांक मिळाला होता का?
मिळाला असल्यास तक्रारीचे निवारण कसे नोंदविले?

ग्राहक मंचाकडे जाण्यापूर्वी त्यांच्या रिजनल ऑफिसला लेखी पत्र लिहून सगळे प्रकरण कळवा व तक्रार-निवारण न झाल्यास ग्राहक मंचाकडे जाईन असे कळवा. कदाचित ही मात्रा लागू पडून ग्राहक मंचाकडे जावे लागणार नाही.

भरतजी धन्यवाद,

एल जी कडे तक्रार नोंदवुन झाली आहे. आता कंप्लेंट्बोर्डचा काही उपयोग होतो का ते पहातो.

http://www.consumergrievance.com/index.htm
मी ही साईट स्वतः वापरलेली नाही. फक्त एका चर्चेत वाचून बुकमार्क करून ठेवली होती. तुम्हाला उपयोगी पडतेय का बघा.

नव्याने सुचलेली इब्लिस आयडिया Wink

दसरा दिवाळी निमित्ताने त्या दुकानात गर्दी असेल बर्‍यापैकी. तिथे दररोज जाउन कट्कट करायची. मोठ्या आवाजात, की नवा फ्रीज घेतला अन दरवाजा मोडला, अन हे लोक सर्विस देत नाहियेत. हे स्पेसिफिकली त्या प्रकारचा फ्रीज पहाणार्‍या कष्टमरांसमोर.

कशी वाटली आयडीया? Lol

cnbc awaaj channelvar programe ahe paharedar navacha tyavar asech problem sodavalele dakhavtat...