तों.पा.सू. - 'मिठास' - लाजो

Submitted by लाजो on 28 September, 2012 - 10:42

|| जय श्री गणेश ||

bappa.JPG'मिठास'

असं म्हणतात की मिठाई खल्याने बोलण्या -,वागण्यातही एक मिठास येते Happy म्हणुन आम्ही खास मिठाईभरलं तबकच वाढुन आणलय तुम्हां करता... आपल्या आवडीची मिठाई उचला अन गट्टम करा Happy

श्री गणेशाच्या कृपेने 'मिठास' पुर्‍या माबोवर पसरू द्या Happy

Saban 08.JPGउपलब्ध मिठाई:

काजू कतली,
पिस्ता बर्फी,
रोझ फ्लेवर्ड बर्फी,
चॉकलेट मावा बर्फी,
तिरंगा बर्फी,
केशरी पेढे,
बासुंदी आणि
अंगुर मलाई

Saban 18.JPGSaban 14.JPGSaban 15.JPGSaban 16.JPGमिठाई बनवण्यासाठी वापरलेले जिन्नसः

Saban 01.JPG

हो, विविध प्रकारचे साबण Happy
यात अंघोळीचा साबण हा मुख्य जिन्नस आहे. त्यासोबत हॅंड वॉश लिक्वीड्स, कपडे धुण्याची पावडर वापरली आहे. रंगांसाठी क्रेयॉन्स आणि पोस्टर कलर्स वापरले आहेत. केशर बनलय केशरी धागा आणि त्यावर थोडा लाल रंग लावुन. वर्ख सिल्वर फॉईल चा आहे. साधे प्लॅस्टिक चे डब्बे, मुदाळं आणि स्टील ची ताटली मोल्ड्स म्हणून वापरली आहेत.

कृती:

साबण आधी किसुन घेतला. त्यात थोडे पाणी घालुन मावेमधे गरम केला. मोल्ड मधे घातला आणि मोल्ड फ्रिझर मधे टाकला. रंगित साबणासाठी किसलेले क्रेयॉन्स / पोस्टर कलर्स साबण मावेमधे घालण्याआधी किसलेल्या साबणात मिसळले.

Saban 02a.jpg

अश्याप्रकारे विविध मोल्ड्स बनवुन घेतले अणि मग त्याच्यावर सिल्वर फॉइल, क्रेयॉन्स चा चुरा वगैरे घालुन सजवले आहेत.

Saban 03a.jpgSaban 07.JPG

अंगुर मलाईकरता पांढर्‍या रंगाचा हॅंड वॉश आणि पांढरा रंग व पाणी मिसळुन दूध बनवले आहे आणि अंगुरी म्हणजे अंघोळीच्या साबणाचे गोळे आहेत Happy

बासुंदी बनवण्याकरता पिवळसर रंगाचे हॅंड वॉश वापरले आहे. दाटपणा येण्यासाठी त्यात वॉशिंग पावडर मिसळली आहे. सर्व नीट फेटुन घेतले आणि वाटीत ओतले. त्यावर दोर्‍याचे केशर आणि क्रेयॉन्स ची पिस्ता पावडर घातली आहे.

Saban 12a.jpg

यात वापरलेले सर्व जिन्नस साबण म्हणुन परत वापरता येतिल त्यामुळे नासाडी होणार नाही की फुकट जाणार नाहीत Happy आणि अडगळीत पडुनही रहाणार नाहित.... तेव्हा रियुज & रिफ्रेश Happy

Saban 10.JPG

तर मंडळी मिठाई खाऊन झाली की हात आणि भांडी धुण्याकरता साबणाची सोय केलेली आहे Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

लाजो, ते साबणाचे फोटो पाहिल्यावर पुन्हा एकदा दचकुन धाग्याचे नाव पाहिले आणि मग कळले कि हे खरे खाण्याचे पदार्थ नाहीत. ग्रेट.
साबण मावे मधे वितळेल हा विचार कसा काय केलास तु?
पहिलं मिठाईचं ताट एकदम खर्रेखुर्रे!

रच्याकने, पाहुणे घरी आले असतील तेव्हा हात आणि भांडी धुवायला हे साबण ठेऊ नकोस. घाबरतील बिचारे Light 1

बापरे__________/\__________
हे खरे नाही? कसा विश्वास ठेवायचा? बासुंदी, रसमालाई, बर्फ्या, पेढे, छे हे अगदी अशक्य सुंदर आहे. अगदी बाप्पासुद्धा फसेल Happy
हे अगदी सर्वोत्तम !
लाजोजी, मानलं ग बाई तुला Happy
जबरदस्त कलाकार, निर्माती आहेस तू Happy
माझा साष्टांग दंडवत स्विकारावा माते Happy

लाजोजी, आपके चरणकमल कहां हैं??? दंडवत घालना चाहती हुं. Happy
खरंच हे सगळे पदार्थ खरेच वाटतायेत. अप्रतिम कलाकृती!!!

अगं कसली भन्नाट आहेस तू
जबरीच बनलीये सगळी मिठाई... अंगूर मलईचा फोटो मी परत परत बघतेय खोटी अजिबात वाटत नाहीये.

१ नंबर!

लाजोताई, साष्टांग नमस्कार, तुमच्या चिकाटीला. एवढे कष्ट तर मी खरेखुरे खाण्याचे पदार्थ करण्याकरीता सुद्धा घेत नाही Happy

वॉव काय मस्त आहे.
बासुंदीवरचं केशर पिस्ता पावडर अप्रतीम. आणि चांदीच्या भांड्यांत ठेवून काढलेले फोटो ....! भारी भारी!

__/\__

महान !!! एकच लंबर !
लाजो तु खरच माबो ची मास्टर शेफ आहेस Happy ____/\____

तर मंडळी मिठाई खाऊन झाली की हात आणि भांडी धुण्याकरता साबणाची सोय केलेली आहे >>> नशीब आंघोळीची सोय नाही ते... नाहीतर अश्या मिठास ने मुंग्या यायच्या Lol

लाजो, खरंच अगदी साष्टांग नमस्कार! काय तुझी कलाकारी. अ..प्र्..ति..म...! साबणातुन मिठाई सुचणे म्हणजे आयडियाची कमाल आहे अगदी.

तोंपासु स्पर्धा असती तर बक्षिस तुलाच मिळालं असतं असं माझ्या लेकीने सांगायला सांगितलंय. Happy

Pages