गृहीत

Submitted by कौतुक शिरोडकर on 26 September, 2012 - 08:05

येता जाता दिसणार्‍या
रस्त्यालगत,
खडकांच्या कुशीत बहरणार्‍या
झाडाझुडपांचा चिवटपणा
कितीही कौतुकास्पद असला तरी..
आवडीने घरात आणलेल्या
रोपट्यांच संगोपन मात्र
खतपाणी घालून, वेळ देऊन
निगुतीने करावचं लागतं.
..
.
आवडत्या नात्यांचही तेच.
त्यांनाही गृहीत धरता येत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !