Submitted by सचिन गोरे on 25 September, 2012 - 08:48
देव्हार्यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे
कालाधीन मला न हक्क कुठला की मी मरावे कसे
नौका आज इथे उद्या पलिकडे पर्वा कशाला हवी?
होकायंत्र असून ना समजले की मी तरावे कसे
केसांचा तव स्पर्श आज घडता आयुष्य हे संपले
नागांनी तुझियाकडून शिकणे त्यांनी डसावे कसे
ओठातील मधाळ हास्य टिपता माझा न मी राहिलो
कमळातील किड्यास हे न उमगे की मी सुटावे कसे
दगडांच्या चरणी कुजून मरणे प्राक्तन फुलांचे असे
झेंडूचा बाजार रोज भरता चाफे फुलावे कसे
काळाचे शार्दूलरूप दिसता भांबावला जीव हा
शेळीने कुरणात कोठल्यापण सांगा चरावे कसे
ssssssssssssssss शुभमंगल सावधान ssssssssssssss
लघु गुरु सांभाळले नसले तरी मात्रा बहुदा बरोबर असाव्यात. यती मात्र बरोबर आहेत असे वाटते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेलकम बॅक जामोप्या....
वेलकम बॅक जामोप्या....
केसांचा तव स्पर्श आज घडता
केसांचा तव स्पर्श आज घडता आयुष्य हे संपले
नागांनी तुझियाकडून शिकणे त्यांनी डसावे कसे<<< वा जामोप्या, एकदम रोमँटिक झालात की!
यती सांभाळलेले आहेत तुम्ही
वृत्तहाताळणीसाठी अभिनंदन!
(तुम्ही जामोप्या आहात हे माहीत नसल्याने काल एका गझलेखाली तुम्हाला उद्देशून काही लिहिले त्याबद्दल क्षमस्व)
बाकी खयालही छान आलेले आहेत. शेवटच्या शेरात लघु गुरू जरा बदललेले आहेत इतकेच.
पुढील शुभमंगलासाठी शुभेच्छा
-'बेफिकीर'!
धन्यवाद
धन्यवाद
वेलकम बॅक
वेलकम बॅक जामोप्या....
शेळीताईही आल्या आहेत सोबत हे पाहून जास्तच आनान्द झाला
शार्दूलविक्रिडितासाठी १०० पैकी १०० मार्क!!
खयालही मस्तचय्त नेहमीप्रमाणे !!
धन्स !!
(तुम्ही जामोप्या आहात हे माहीत नसल्याने काल एका गझलेखाली तुम्हाला उद्देशून काही लिहिले त्याबद्दल क्षमस्व)>>>>:P
>>>>>>>>>अहो विनम्रता !!! गान्धीगिरी करणारा मुन्नाभाई आठवला एकदम......... विनम्रतासे केह् रैला हू। कृ गै न!!
मला आणखी एक ओळ सुचली....
मला आणखी एक ओळ सुचली....
देव्हार्यात बसून तो ठरवतो की मी जगावे कसे
गाभार्यात लपून तो शिकवतो की मी लढावे कसे
दगडांच्या चरणी कुजून मरणे
दगडांच्या चरणी कुजून मरणे प्राक्तन फुलांचे असे
झेंडूचा बाजार रोज भरता चाफे फुलावे कसे
दगडांच्या चरणी कुजून मरणे
दगडांच्या चरणी कुजून मरणे प्राक्तन फुलांचे असे
झेंडूचा बाजार रोज भरता चाफे फुलावे कसे<<<
व्वा व्वा
च्यायला चांगलं सुचलंय तुम्हाला
झेंडुचा 'बाजार' <<< यात बाजार
झेंडुचा 'बाजार' <<< यात बाजार हे गागाल झाले आहे इतकेच
जामोप्या चाफ्याचा शेर लै
जामोप्या चाफ्याचा शेर लै भारीये
मला नेहमीप्रमाणे माझा एक शेर आठवलाच बघ .............
अष्टलांचा शौक माझ्या विठ्ठलाला
रंडका शिणगार माझा सोनाचाफी
धन्स फॉर पुनहःप्रत्यय का काय ते त्यासाठी !!
अष्टल म्हणजे काय?
अष्टल म्हणजे काय?
वाचून प्रचंड झोप आली. अत्यंत
वाचून प्रचंड झोप आली. अत्यंत कंटाळवाणी.
झोपलात तरी चालेल. मुशायरा
झोपलात तरी चालेल. मुशायरा कधीच संपला .
( जाताना तेवढी सतरंजी घडी घालून ठेवा. )
घेऊनच जातो सतरंजी मीच आणली
घेऊनच जातो सतरंजी मीच आणली होती घरुन तुम्ही काय देणार नाही माहित होते
सतरंजी ?????????? आम्ही
सतरंजी ?????????? आम्ही आख्खी गझलच दुसर्याच्या जमिनीवर करतो...
सतरंजीचं काय घेऊन बसलाय??
(No subject)
(No subject)