"दिखाई दिये यु, के बेखुद किया - गाण्याचा अर्थ

Submitted by mansmi18 on 14 August, 2012 - 11:09

नमस्कार,

नुकताच खय्याम यांच्या गाण्यांवर आधारीत "एसेन्स ऑफ गंधार" हा कार्यक्रम पाहिला. त्यात "दिखाई दिये यु, के बेखुद किया.." हे बाजार चित्रपटातील लताचे गाणे ऐकले. या गाण्याचा अर्थ लिहाल का?
मी नेटवर शोधले त्यात काहीनी अर्थ लिहिला आहे..पण इथल्या "दर्दी" लोकांकडुन ऐकायला आवडेल.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मनस्मी , बेफिकीर आणी सगळेच . Happy
एवढ्यांदा ऐकली होती , ऐकायला फार आवडायची पण अर्थ कायमच आपल्याला कर्ट्ली अ‍ॅम्ब्रोस बाऊन्सर राहीला होता Happy

>>अर्थ कायमच आपल्याला कर्ट्ली अ‍ॅम्ब्रोस बाऊन्सर राहीला होता

आणि त्याला मान झुकवून (आदबीने) डोक्यावरूनच काही वेळा जावू द्यावे.. शब्दशः चीरफाडीत वा स्लो मोशन मध्ये देखिल त्यातला "अनुभवलेला" थरार सांगता येत नसतो. कसे काही हूक्स, हुकलेले बघायलाही जास्ती मजा येते नाही का? Happy

धन्यवाद बेफिकिर, चांगला अनुवाद केलात.
एके काळि बाझारची गाणी रोज तासनतास ऐकली जायची, खासकरुन हि गझल. खुप चांगल्या आठवणींना उजाळा मिळाला.

Pages