स्वप्नातले गाव

Submitted by प्रकाश कर्णिक on 14 August, 2012 - 03:46

निरभ्र निळ्या आभाळाच्या छताखाली
तेथे वसले होते एक छान गाव
त्याला द्या तुम्ही कोणतेही नाव

होती जात गावामधून अरुंदशी वाट
घेत असे ती आढेवेढे आणि मधूनच पळे सुसाट

प्रत्येक वळणावर असे सुंदर एक फुलझाडांची बाग
कुंपण नसलेल्या घरांभोवती सतत तिची जाग

दूर आकाशाच्या किनारी दिसे अवाढव्य डोंगर
त्याच्यावरच्या देवळामध्ये नेहमी असे जागर

एका बाजूच्याशेतामध्ये उभे मोठे चिंचेचे झाड
चंद्र त्याच्या आडोशाने म्हणे माझे चित्र काढ

हि तर आहे नदी वाहती तिच्या काठी औदुंबर
त्याच्या आश्रयाला आहे अनेक पक्षांचे माहेरघर

उसाच्या मळ्यातून चालते आहे पांढ ऱ्या बैलांची जोडी
त्यांच्या गळ्यातील घुगरे वाजताहेत थोडी थोडी

हंबरण्याचा आवाज येतो दिवेलागणीच्या वेळी
पाहिले होते हे गाव असे वाटते कुण्या एकेकाळी

मला खात्री आहे तुम्हाला माहित आहे हे गाव
आठवले तर जरूर सांगा मला त्याचे नाव.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

उसाच्या मळ्यातून चालते आहे पांढ ऱ्या बैलांची जोडी
त्यांच्या गळ्यातील घुगरे वाजताहेत थोडी थोडी

<< आमचा उसाचा मळा आठवला , छान Happy

छान !

गावाकडच्या मळ्याच्या वाटेचे आल्हाददायक चित्रण. साधी-सुधी भाषा व तशीच प्रतीके यांनी गोडी वाढविली आहे.
'माझे चित्र काढ' म्हणणारा चंद्र, व उसाच्या मळ्यात चालणारी बैलजोडी रसिकाला निसर्गाच्या खेड्यात ओढून नेतात.

वा किती सुंदर शब्द चित्र रेखाटले आहे.
प्रत्येक मनात असाच एक सुंदर गाव असतोच, डोंगरांनी वेढलेला, हिरव्यागार शेतातुन चालणारी बैल जोडी असलेल असा सुंदर गाव.

प्रत्यक्षात मात्र असा ही असु शकतो....
https://meghvalli.blogspot.com/2024/03/blog-post_86.html?m=1

अजय सरदेसाई (मेघ)