धांय धांय वासेपूर - २ (Gangs of Wasseypur 2 - Review)

Submitted by रसप on 12 August, 2012 - 01:59

आपलं असंच आहे.. आपण क्रिकेटला शिव्या घालतो, 'फिक्सिंग आहे' म्हणतो; पण तरी तमाशा पूर्ण बघतो आणि नंतर जल्लोषही करतो अन लाखोल्याही वाहातो..! 'वासेपूर - १' फारसा 'पटला' नसतानाही 'वासेपूर - २' पाहिला कारण उपरोक्त ! असो.

Story starts from where it stopped last time....
सरदार खान (मनोज वाजपेयी) ला गोळ्या घालून शरीराची चाळण करून ठार मारलं आहे आणि आता सरदारचा मोठा मुलगा 'दानिश' बदल्याच्या भावनेने पेटून उठला आहे. बापाला गोळ्या घालणाऱ्या एकेकाला तो एकेक करून मारतोय.. पण बदला पूर्ण होण्याआधीच त्यालाही मारलं जातं. त्यापेक्षा लहान असलेला सरदार खानचा दुसरा मुलगा फैजल (नावाझुद्दिन सिद्दिकी) चरस-गांज्याच्या नशेडीत पूर्णपणे बुडला आहे. पण नवरा आणि मोठा मुलगा मेल्यावर आई फैजलला फैलावर घेते आणि त्याच्या पौरुषालाच आव्हान देते की, 'खून खोलता नहीं क्या तेरा?'.. फैजलला जाणवतं आणि बाप व भावाचा बदला पूर्ण करीन असं आश्वासन तो आईला देतो. अतिशय क्रूरपणे पहिल्या मारेकऱ्याला मारल्याने फैजलचा वासेपुरात दबदबा निर्माण होतो.. हळूहळू करत तो आपलं साम्राज्य बनवतो. 'लोखंड माफिया' बनतो.
इकडे फैजलच्या बापाचा आणि पर्यायाने फैजलचाही सर्वात मोठा शत्रू 'रमाधीर सिंह' (तीगमांषु धुलिया) फैजलशी तह करतो.
सरदार खानचे पाचही जिवंत मुलगे पहिलीची चार, दुसरीचा एक) रोज सकाळी उठल्यावर एका हातात टमरेल आणि दुसऱ्या हातात बंदुकच घेत असतात. वासेपूर - २ हा ह्या पाच भावांचा गुन्हेगारी प्रवास दाखवणारा सिनेमा आहे. काय-काय होतं, कसं-कसं होतं हे शब्दातीत आहे कारण बरंच काही होतं आणि कसंही होतं! संपूर्ण सिनेमा सी-सॉ किंवा रस्सीखेच सारखा एकदा इथे, एकदा तिथे... जात, नेत राहतो आणि अखेरीस माहित असलेल्या शेवटास पोहोचतो.

पहिला वासेपूर 'सरदार'मय होता आणि हा वासेपूर 'फैजल'मय आहे. सिनेमा संपल्यावर, 'अमुक-अमुक घडलं' ह्यापेक्षा काहीही बोध होत नाही. जे दाखवलं आहे ते भडक वास्तवदर्शी असलं तरी वास्तवदर्शनाचा जो एरव्ही होणारा परिणाम आहे, तो होत नाही.

पण सगळ्यात चांगली आणि वाखाणण्याजोगी बाब ही की, हा जरी 'भाग -२' असला तरी त्याला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. कुठेही - पहिल्या भागाचा संदर्भ एक-दोन ठिकाणी - येऊनसुद्धा सिनेमा 'प्रेक्षकाने पहिला भाग पाहिला आहे' असं मानून पुढे जातोय असं वाटत नाही.
दुसरी चांगली गोष्ट - नवाझुद्दिन सिद्दिकी. अतिसामान्य शरीरयष्टी असूनही एका बाहुबलीची भूमिका अप्रतिम निभावली आहे. कदाचित त्याच्या व्यक्तिरेखेच्या परिणामकारकतेत त्याच्या चरस-गांजा फुंकण्याचा बराच मोठा वाटा आहे. जरा त्याच्या हातात चिलीम दाखवली नसती तर तो त्या भूमिकेत शोभला नसताच, पण हालचालीतील चापल्य, निस्तेज डोळे आणि अचूक संवादफेक ह्या सगळ्याच्या जोरावर 'अभिनेता नवाझुद्दिन', 'बाहुबली फैजल'वर मात करतो आणि आपली छाप सोडतो.
एकंदरीत, एकदा पाहण्यासारखा हा वासेपूर एका अतिरंजित हिंसक प्रलंबित नाट्याचा एक अपेक्षित शेवट करतो.

रेटिंग - * * १/२

http://www.ranjeetparadkar.com/2012/08/gangs-of-wasseypur-2-review.html

review-of-gangs-of-wasseypur-2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे हा खान ना कहानीमधला..
चांगला अ‍ॅक्तर आहे. Happy
गॅन्ग्स टिव्हीवर आला की पाहिन...

जे दाखवलं आहे ते भडक वास्तवदर्शी असलं तरी वास्तवदर्शनाचा जो एरव्ही होणारा परिणाम आहे, तो होत नाही.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

+१०००००. हेच पार्ट वनच्या वेळी वाटलं होतं.

मला अजूनही एक कळलेलं नाही की रामधीर सिंहच्या वयाचा काय हिशोब लावलाय अनुराग कश्यपने??? Uhoh पठाणाच्या तीन पिढ्या जातात तरी हा धडधाकट आणि अ‍ॅक्टिव्ह Proud
सरदार खानच्या बापाच्या काळात तो खाण काँट्रॅक्टर असतो... त्यानंतर सरदार खान त्यानंतर फैजल.....

कश्यपने प्रमोशनच्या वेळी हा चित्रपट नक्की चालणार म्हणूनच अ‍ॅद्व्हर्टायझिंगवर आम्ही खूप खर्च केलाय असे सांगितलं..... आणि पार्ट वनला हवा तसा रिस्पाँस नाही मिळाला तेंव्हा एफेमवर मुलाखतीत "भारतीय प्रेक्षकांना सिनेमाच कळत नाही" अशी आगपाखडही केली.

पार्ट वन्च्या मानाने पार्ट २ जास्त प्रभावी वाटतोय. एकदा पाहून होईलच.

डेफिनेट जेव्हा काँट्रक्टर चा खुन करायला जातो तो ...आणि सुलतान चा खुन .......हे दोन प्रसंग छान घेतलेले आहेत...कुरघोडी कशी होते आणि खरोखर काही काम करताना सामान्यतः काय काय प्रोब्लेम येउ शकतात हे सहज दाखवलेले आहेत..डेफिनेट आणि परटेंडीकुलर चे काम करणार्या अभिनेत्यांनी मस्त काम केले आहे...

मला अजूनही एक कळलेलं नाही की रामधीर सिंहच्या वयाचा काय हिशोब लावलाय अनुराग कश्यपने >>>>>>>
२७ चा असताना त्याने सरदार खान च्या बापाला मारले...तेव्हा सरदार खान ९ वर्षाचा असेल..ह्या हिशोबाने जेव्हा सरदार खान ला मारतो तेव्हा सरदार खान ३७ - ३९ चा असेल त्याचा मुलगा शाळेत जाणारा होता म्हणजे १२-१३ वर्षाचा... फैजल जेव्हा रामधीर ला मारतो तेव्हा फैजल ३०-३२ चा आहे (हे वाक्य चित्रपटात आहे) म्हणजे रामधीन ६५ - ६८ चा असेल....Happy

सिनेमा संपल्यावर, 'अमुक-अमुक घडलं' ह्यापेक्षा काहीही बोध होत नाही. जे दाखवलं आहे ते भडक वास्तवदर्शी असलं तरी वास्तवदर्शनाचा जो एरव्ही होणारा परिणाम आहे, तो होत नाही.>>+१

चित्रपट पैसा वसूल माझ्यासाठी तरी. बाकी थेटरातल्या ८०% रिकाम्या
खुर्च्या पाहून का कुणास ठाऊक मला तरी फारच आनंद झाला!>>> माझ्याच एका अप्रकाशित लेखातून! Wink

उदयन,
.उदयन. | 13 August, 2012 - 18:01 नवीन

मला अजूनही एक कळलेलं नाही की रामधीर सिंहच्या वयाचा काय हिशोब लावलाय अनुराग कश्यपने >>>>>>>
२७ चा असताना त्याने सरदार खान च्या बापाला मारले...तेव्हा सरदार खान ९ वर्षाचा असेल..ह्या हिशोबाने जेव्हा सरदार खान ला मारतो तेव्हा सरदार खान ३७ - ३९ चा असेल त्याचा मुलगा शाळेत जाणारा होता म्हणजे १२-१३ वर्षाचा... फैजल जेव्हा रामधीर ला मारतो तेव्हा फैजल ३०-३२ चा आहे (हे वाक्य चित्रपटात आहे) म्हणजे रामधीन ६५ - ६८ चा असेल...

ही तुमची पोस्ट ते अतर्क्य लॉजिक अन अशक्य फिल्लम वाल्या धाग्यावर टाका. भारी आहे ते.

मला ह्या (नं १) चित्रपटात एक गोष्ट फारच अतर्क्य वाटली. ती म्हणजे मनोज वाजपेयी बापाचा बदला घेण्यासाठी टक्कल करतो पण अनेकदा संधी असतानाही तो रामाधीरचा गेम करत नाही. काय तर म्हणे त्याचा सर्वनाश करायचा. अरे बंधो, "आप मेला जग बुडाले". तो मेला की त्याचा सर्वनाश की! बदले की आग मे बेसिक मे ही राडा है! मग फैजलने तरी का मारावे. सोडून द्यावे.

चित्रपटला "गँग्स" हे नाव देण्याचे प्रयोजन अजिबातच झेपले नाही. हे गँग वॉर नसून साधे एक खानदान का दुसरे खानदानसे वैर टाईपका पिक्चर आहे.

"गँग्स ऑफ न्यु यॉर्क" वरून दिग्दर्शकाने आपल्या महान कल्पनाशक्तीचे प्रदर्शन केले आहे. पण त्या पिक्चरच्या नावाच्या तोडीचाही हा पिक्चर नाही. (पहिलाही नव्हताच) पण अर्थात पहिला बराच वाटला हे मात्र खरे.