मधुची गाडी-एक खाद्यसेवा...!

Submitted by अत्रुप्त आत्मा on 18 July, 2012 - 05:07

ही गाडी आम्च्या एस.पी कॉलेज पोस्ट ऑफिसच्या जवळ आहे,,,हा झाला पत्ता सांगण्याच्या जनरितिचा भाग..पण मधुची गाडी हे एस.पी.पोश्ट हापिसचच एक अंग आहे,इतकी ही गाडी त्या पोश्टं नावच्या मानवी आघाडीत तिथे मिसळलेली असते.
अता विस/एक वर्ष होत आली ही गाडी इथे आहे. आणी पहिल्यापासुन ह्याच नावानी फेमस आहे,मधुची गाडी.

श्रमिक,भुकेले,टाइमपासी,खवैय्ये, असे नाना तर्‍हेचे लोक इथे येत असतात. मधुची गाडीही अगदी सक्काळी ७ ला रेड्डी असते....डेक्कनक्विन सारखी. हो...हे रोजचं टाइम आहे,चुकत नाही कधी. सकाळी सात ते दुपारी ३/४ वाजे पर्यंत...हे रोजचं गाडीचं टाइम. सुट्टी अशी इथे नाहीच. अहो खायच्या कामाला सुट्टी कशाला..? सातही वार खाण्याचे आणी तसाच इथला मेनुही.म्हणजे आंम्हा नेहमीच्यांना तो असा पाठ झालाय... बालगिताच्या बोलीवर...( बाकी जगात बालगिताच्या इतकी,समजायला आणी डोक्यात उतरायला सोप्पी बोली असताना,बाकिच्या विद्वान बोल्यांचा जन्मच कशाला झाला? हा आमचा प्रश्न...! )

सोमवार गुरवार शनिवार... साबुदाणाखिचडी इडलीसांबार
रविवार आणी बुधवार... भजी मिसळीवर शांम्पलची धार* (*रव्याच्या भाषेत,पहिल्या धारेचं शांम्पल Wink )
मंगळवार आणी शुक्रवार... मटार ऊसळ/ब्रेड बदाम शिर्‍याचा मार(म्हणजे या शिर्‍यात ''बदाम कुटून घातलाय...'' इति---मधुशेट...!)
हे येक नंबरी इडली सांबार.... विठ्ठल/रखुमाय सारखं एकजीव

ही मटार ऊसळ/पाव/ हाप-भजी Happy

सांबार....

तर्रीदार मटार ऊसळ

भजीत भजी गोल भजी...(मटार ऊसळीबरोबर लै कातिल लागतात)

आणी या सगळ्याच्या जोडीला,पोहे+सांबार+शेव+दही, भजी/हाप भजी+कट छ्छा!(हे चहाचं पुणेरी रूप आहे....''छ्छा.!''), हे रोजचे पाशिंजर असतातच.

इथले सगळे पदार्थ...म्हणजे आमच्या लेखी ए-१... पण तरी ए-१ म्हणायला नको.त्या मेल्या सँडविच वाल्या सगळ्यांनी या उपमेतलं वैशिष्ठ्य त्यांच्या कर्तबगारिनी ठ्ठार मारलय. व्यावहारिकपणेच वर्णन करायचं झालं तर मधुची गाडी हा काँटिटी/क्वालिटी या दोन व्यावसायिक मुल्यांचा संगम आहे. आणी आमच्या मते हेच इथलं वैशिष्ठ्य आहे. माझा इथला सगळ्यात अवडता पदार्थ म्हणजे इडली सांबारशेव... इथली इडली म्हणजे सांबाराशी जन्मोजन्मीचं नातं असलेली,पटकन त्यात मुरणारी अशी असते.आणी सांबारही त्यात शिरताना आपपरभाव करत नाही. हे इडली सांबार मेड फॉर इच अदर आहे अगदी. चव तर इतकी कातिल असते. की कधी कधी मी दोन/दोन प्लेट हाणुन...परत तेवढ्याच पार्सल सुद्धा घेतो... (उरलेला दिवस घरी निवांत असेल तर Wink )

अनुक्रमे....पहिला रव्या...--^--^--^-- आणी मधुशेट

पोश्ट हापिस-खातं Wink

ताजा गरम भज्जी पॉइंट

मस्त फिक्कट चविचा-छ्छा.!

पुन्हा इथे काय आहे,की सांबार असो,मिसळीचं शांम्पल असो,किंवा मटार उसळीचा रस्सा असो... तो हवा तेवढा प्लेटमधे अधुन मधुन येऊन पडत असतो. शेवंही भगवंताची कृपा घडल्या सारखी मधुन मधुन पडत असते. आणी इडली सांबार असो,किंवा मटार उसळ असो,त्या शेवेमुळे असा काही चविचा फ्लेवर तयार होतो,की एखाद दिवस शेव नसली (असं कधी होतच नाही म्हणा..!) किंवा वेगळ्या प्रकारची आलेली असली,तर आवडता मास्तर जाऊन कंटाळवाण्या सरांच्या हातात ''वर्ग'' किंवा तास पडल्या सारखी आमची अवस्था होते... मधुन मधुन मधु शेटचं ते ''मिर्ची फ्री'' हे संगीत ऐकू यावं लागतं,तेंव्हा या साळं'ची मज्जा येते. त्या महान ढगलबाज रव्या'ची बोली हा मधुशेटच्या गाडीवरचा असाच एक टेसदार प्रकार आहे. म्हणायला हा माणुस मधुशेटचा हेल्पर असेल,पण आमच्या लेखी हे पात्र-परिचय झाल्याखेरीज न उलगडणार एक स्वतंत्र नाटक आहे. हा माणुस शांम्पल असो,उसळीचा रस्सा असो,सांबार असो...कुठल्याही द्रवं-रूपा बद्दल बोलायला लागला की मदिराक्ष शास्त्रात शिरतोच... म्हणजे संबार वगैरे देताना ''(90) नैंटी टाकू का..?'' अशी भाषा...! सांबार उसळीतला फ्लॉवर बटाटा येऊ द्यायचा असेल तर,,, ''लेग-पीस असू दे का..?'' अशी गिर्‍हाइकाची केलेली विचारणा+संभावना..! तर्री देताना...'' कॉटर का हाप..?'' अशी एकंदरीतच,नवख्या आणी अजाण गिर्‍हाइकाची माप काढायची पेशल पद्धत!...असं सगळं तिथे आजुबाजुनी आणी जोडि/जोडिनी चाल्लेलं असतं.
शांपल देऊ का...? मिर्ची फ्री एsss.... इति...मधुशेट....

नाईंटी टाकताना...रव्या... Wink

त्यात मधुशेटंही गिर्‍हाइकांची...कधी गिर्‍हाइकं त्यांची कळ काढत असतात. पोश्ट ऑफिस/एस.पी.कॉलेजातले शिपाई प्रोफेसर/ आजुबाजुच्या कार्यालय कचेर्‍यां मधली रोजची येणारी लोकं...काही महिला मंडळं इ. इ. सर्व इथे नेमानी येत असतात. शिवाय अगदी राजकीय क्षेत्रापासून ते सिने/नाट्य क्षेत्रातल्याही लोकांची मधुची गाडी हे फेवरिट ठिकाण आहे...

इथला कुठचाही पदार्थ घ्या...त्याचं पहिलं वैशिष्ठ्य म्हणजे त्याला असणारी पहिली चव मधुच्या गाडीची...मग ते आमचं अवडतं इडली सांबार असो,मटार उसळ असो,मिसळ असो,अथवा सगळ्या उपवासांना पुरुन उरणारी टेश्टी उपासाची मिसळ असो... इथले पदार्थ इथलेच...असे' दुसरीकडे मिळणार नाहीत. शेवटी या अश्या ठिकाणांचं थोडसं तीर्थक्षेत्रां सारखं असतं... जे तिथे आहे ते दुसरीकडे नाही,आणी दुसरीकडच्या सारखं इथे नाही...ते पहायला आणी शोधायला जाऊही नये. लॉर्ड्स'ला लॉर्ड्स सारखंच असू द्यावं,त्यात वानखेडेची मज्जा शोधायला जाऊ नये. आणी वानखेडेवर लॉर्ड्सची स्वप्न पाहू नये हेच खरं.
आंम्ही या श्टेडियमवरचे नेहमीचे हौशी प्लेयर आहोत,तुंम्हिही कधी आलात टिळक रोडला(पुणें येंथें Wink )..तर या इथे आणी खेळून जा एक/दोन डाव...!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

@आत्मा, तू इथे असल्याचे माहिती नव्हते.. >>> आत्मा सर्वसंचारी असतो. Wink

@अजूनही सचित्र ओळखी करुन दिल्यात तर आवडेल >>> ओक्के... मग हा अत्ताच टाकलेला ताजा धागा बघा... फुलांच्या रांगोळ्या http://www.maayboli.com/node/36516

सर्व आलेल्या....आणी येणार्‍या....वाचक/प्रतिसादकांचे आभार

चांगली ओळख.

एक दोन गोष्टी लिहाव्याश्या वाटल्या

<< कुठल्याही द्रवं-रूपा बद्दल बोलायला लागला की मदिराक्ष शास्त्रात शिरतोच... म्हणजे संबार वगैरे देताना ''(90) नैंटी टाकू का..?'' >>

मदिरा शास्त्र म्हणायचय का ? मदिराक्ष म्हणजे मद्यधुंद डोळे .

तसेच शिर्षकातला "सेवा" हा शब्द समजला नाही. 'सर्व्हीस देणे' ह्या अर्थी वापरला असेल तर ठीक. अन्यथा पैसे घेउन खाद्यपदार्थ देणे ही 'सेवा' कशी होउ शकेल ?

@मदिरा शास्त्र म्हणायचय का ? मदिराक्ष म्हणजे मद्यधुंद डोळे .>>> (मद्य)धुंद स्वभाव असणारा माणुस ठरवतो,ते शास्त्र...मदिराक्ष शास्त्र...असा अर्थ घ्यावा... Wink

@'सर्व्हीस देणे' ह्या अर्थी वापरला असेल तर ठीक >>> त्याच अर्थी वापरलाय... Happy

@अन्यथा पैसे घेउन खाद्यपदार्थ देणे ही 'सेवा' कशी होउ शकेल ?>>>> आपलं हे मत मधुच्या गाडिवर आलात तर,,,,आर-पार बदलुन जाईल,याची हमी देतो.

चुकिच्या वेळेला पाहिला हा धागा. पाहून भुक लागली. >>> नाही ग धागाच चुकीचा आहे. Sad
मी जेवुन मग पाहिलाय तरी भुक लागली Wink

अहाहाहाहा............. काय आठवण करून दिलीत. असंख्य वेळा मधुभाऊंकडे खाल्लेले आहे. कॉलेजचे दिवस आठवले एकदम....... Happy
बाकी तुमचा संचार माबोवरही असल्याचे विसरायला झाले होते. आता मात्र मधुकडे गेलो तरी लेखाची आठवण येणारच.
<<त्यात मधुशेटंही गिर्‍हाइकांची...कधी गिर्‍हाइकं त्यांची कळ काढत असतात >> या आठवणी तर फारच मजेदार. Happy

अतृप्त आत्मा Biggrin

त्या वेगवेगळ्या स्मायलीज, तिखटजाळ रस्सा आणि खाद्यसेवा हा तुमचा युएसपी बनला आहे इथला Wink
मायबोलीवर स्स्स्स्स स्वागत ( तोंडाला पाणी सुटलेलं असल्याने गडबड झाली )

आहाहा...

मस्तच गाडी, चटकदार पदार्थ आणि खुमासेदार वर्णन Happy

पुण्यात आल्यावर तुम्हाला कॉंटॅक्ट करायला पाहिजे... एखादे गटग मधुच्या गाडीवर नाही तर मामाची मिसळ खात करायला हवं आता Happy

@ एखादे गटग मधुच्या गाडीवर नाही तर मामाची मिसळ खात करायला हवं आता>>> जीं हाँ.! जरूर...

@त्या वेगवेगळ्या स्मायलीज, तिखटजाळ रस्सा आणि खाद्यसेवा हा तुमचा युएसपी बनला आहे इथला
मायबोलीवर स्स्स्स्स स्वागत >>>

अतृप्तं... सॉरी अत्रुप्त आत्म्या, तुला माझ्या (जेवणानंतरही) वखवखल्या जीव्हेकडून शाप आहे....

"असच लिहीत राहशील... फोटोंसोबत इथे पोस्टत राहशील."

(माफ करा... तुमच्याशी ओळख नसताना असली सणसणीत दाद निघून गेलीये तोंडून... आकाशवाणी परत घेता येत नाही)

@तुला माझ्या (जेवणानंतरही) वखवखल्या जीव्हेकडून शाप आहे....>>>

शाप स्विकारण्यात आलेला आहे

(माफ करा... तुमच्याशी ओळख नसताना असली सणसणीत दाद निघून गेलीये तोंडून... आकाशवाणी परत घेता येत नाही)>>>>>>>>>> हे लै बेस केलं बगा तुमी........... फुस्कुली सोडण्यापेक्षा...ट्टार्रर्र कन पादलेलं आपल्याला केंव्हाही आवाडतं....!

हे अतृप्त आत्म्या,

एका जुन्या श्लोकाचा आधार घेता, टार्रकन केलेल्या कृतीचा दर्जा ध्वनीहीन कृतीपेक्षा निम्नस्तरीय ठरतो. Biggrin

तेव्हा आपला दृष्टीकोन लवकरात लवकर सुधार बरे! Wink

आ.न.,
-गा.पै.

तेव्हा आपला दृष्टीकोन लवकरात लवकर सुधार बरे! >>> :-p

प्रत्येकवेळी दिलेलं उदाहरण,हे मुद्दा पटण्या/पोहोचण्या पुरत असतं, त्या मागचा व्यवहार दोंन्हीकडे समान पातळीवरचा असलाच पाहिजे,अशी काही उदाहरण देण्यामागची पूर्व अट नाही.

तेंव्हा आपणंही आपला दृष्टिकोन लवकरात लवकर वधारा बरें.! Wink

जाता जाता- आपण दिलेली लिंक मात्र मननीय आहे...आणी ती वाचनखुणवली गेली आहे.. धन्यवाद.

Pages