पहिला व शेवटचा सुपरस्टार - राजेश खन्ना

Submitted by बेफ़िकीर on 18 July, 2012 - 04:57

काहीतरीच वाटत आहे, काहीतरी काळजातून तुटल्यासारखे!

अमिताभ बच्चनने आयुष्य व्यापून टाकलेल्या काळात कोणा मोठ्या भावंडाने राजेश खन्ना जास्त आवडतो म्हणणे म्हणजे वादावादीलाच सुरुवात! मी आणि माझ्या वयाची भावंडे अमिताभ किती श्रेष्ठ ते सांगून राजेश खन्नाला नावे ठेवायचो.

नंतर समजले की शम्मीचा अस्त होताना आणि देव, दिलीप, राज हे त्रिकूटनिबर वाटू लागलेले असताना या माणसाने त्याकाळच्या भारतीयांसाठी असलेल्या एकमेव मनोरंजनाच्या साधनाला संजीवनी देऊन क्रांती घडवली.

त्याचे स्मितहास्य, मान हालवणे, इनोसन्ट चेहरा, बोलके डोळे, अत्यंत हॅन्डसम व्यक्तीमत्व!

त्यातच किशोर आर डी ची साथ आणि फ्रेश हिरॉईन्स आणि सुंदर लोकेशन्स!

त्याने अनुभवलेले फॅन्सचे प्रेम त्या आधी आणि नंतर आजवर कोणाच्याही वाट्याला आलेले नाही

मेरे सपनोंकी रानी या गाण्यात त्याचे दिसणे शर्मिलाकडे सुर्लक्ष करण्यास भाग पाडत आहे. काय काय लिहावे कळतच नाही. असे कधी होत नाही की कोणी महान व्यक्ती निधन पावल्यावर व्यक्तीगत पातळीवर दु:ख व्हावे. फक्त किशोर कुमार गेला तेव्हा असे झाले होते. नंतर आजच.

मित्रांनो, कृपया उदार मनाने राजेश खन्नाच्या तुम्हाला असतील त्या आठवणी लिहून धागा श्रीमंत करा, त्याचे फोटो टाका.. मला त्या 'दु:खद घटनेचा' धागा खरंच अपुरा वाटतोय राजेश खनासारख्या व्यक्तीसाठी... नाहीतर असा लेख लिहिला नसता.. एक जगजीत सिंग यांच्यासाठी लिहावासा वाटला होता..

=======

जिंदगीको बहोत प्यार हमने दिया
मौतसेभी मुहोब्बत निभायेंगे हम
रोते रोते जमानेमे आये मगर
हसते हसते जमानेसे जायेंगे हम

जायेंगे पर किधर
है किसे ये खबर
कोई समझा नही
कोई जाना नही

जिंदगी का सफर......

गुलमोहर: 

राजेश खन्नाचा शेवटचा चित्रपट कुठला होता ? मला शेवटचा "विजय" नावाचा बघितलेला आठवतोय.
मल्टी स्टारर होता. त्याच्या बरोबर हेमामालिनी, मौशुमी, अनिल कपूर, ऋषि कपूर, सोनम, मिनाक्षी शेषाद्री असे बरेच कलाकार होते.

काहीच लिहू शकत नाही. Sad

याच अभिनेत्याची जितकी चेष्टा केली तितकीच त्याच्या आनंद ला दाद ही दिलीय. खूप गरिबी असतानाची गोष्ट ! गणेशोत्सवात म्हणून आलेला हाथी मेरे साथी हा सिनेमा पाहीलेला तेव्हां एक वर्षाचा होतो. त्यातले हत्तीचे सीन्स आणि राजेश खन्ना लक्षात राहीले. अमिताभ युग अवतरलेलं असतानाही आयुष्यातला पहिला सिनेमा याच माणसाचा पाहीला. घरातले जुने सगळे मात्र आनंद सिनेमाबद्दल भरभरून बोलायचे म्हणून एकदा टीव्हीवर आवर्जून पाहीला आनंद. त्या वेळी लक्षात आलं या लोकांनी काय काय दर्जेदार अनुभवलंय ! त्या एका आनंद साठी नंतरच्या राजेश खन्नाला लोकांनी तितकंच प्रेम दिलंय ! आता मेलोड्रामाटीक वाटेल अशा अदांची तेव्हां देशाला भुरळ पडली होती. माझा काका डाय हार्ड फॅन होता राजेश खन्नाचा. त्याचा जमाना संपत आला होता तरी काकाच्या गप्पांमधून राजेश खन्ना माझ्या बालपणात कायम राहीलाय.

टीव्हीवरच अमर प्रेम पाहीला तेव्हां सिनेमा संपल्यावर गळ्यात टोचणारा आवंढा आला होता, आणि राजेश खन्ना म्हणतो मेरे आंखो मे आंसू ? हो ही नही सकता.. आय हेट टीअर्स ! आणि जेव्हां त्याच्या हाताला अश्रूंचा उबदार स्पर्श होतो तेव्हांचा अभिनय !!! आता तीच अवस्था झालीये खरंच. आताच्या युवा पिढीच्या आणि राजेश खन्नाच्या पिढीमधला जोडणारा दुवा असलेली माझी पिढी देखील राजेश खन्नाला मिस करत असणार यात शंका नाही.

परमेश्वर या अभिनेत्यास दुसरा जन्म देवो...

जुन्या काळातील चित्रपटांमध्ये माझ्या आवडीचे त्रिकुट म्हणजे राजेश खन्ना - किशोर कुमार - आर.डी.बर्मन, तिघांनी मिळुन प्रेम,विरह, दु:ख, आनंद, मजा-मस्ती या सर्व मानवी भाव-भावना अक्षरश: पदडयावर जिवंत केल्या आहेत..... त्यात राजेश खन्ना म्हणजे माझा "All Time Favourite Hero" ..... ह्रितीक रोशन, शाहीद कपुर, इम्रान खान या हिरोंच्या जमान्यातील मी, मला राजेश खन्ना हिरो म्हणुन आवडतो असे सांगितले की माझ्या मैत्रिणी,बहिणी मला हसतात, पण शेवटी राजेश खन्ना तो राजेश खन्नाच...... Romantic हिरोंमध्ये तो सर्वांचा राजा शोभतो ....... आज माझ्या मैत्रिणींनी, बहिणींनी मला आवर्जुन फोन, मेल करून ही बातमी दिली......

अश्या देखण्या सुपरस्टारला माझी भावपुर्ण श्रद्धांजली........

rajesh khanna.jpg

अत्यंत दु:खद बातमी :अरेरे:... आदरांजली.

मला आनंद, दाग, कटी पतंग मधील त्यांच्या भुमिका, अभिनय भावला....

मी पहिल्यांदा आणि शेवटचेच जेव्हा काकाला बघीतले तेव्हा त्याची अवस्था खुपच दयनीय होती. कार्टररोडला माझे आण्णा ज्या पोलीस कंट्रोलला होते, त्या ऑफीसच्या शेजारीच राजेश खन्न्नाचा 'आशिर्वाद' बंगला होता. आण्णा मला एकदा ऑफीसला घेवुन गेले खास राजेश खन्ना दाखवायला म्हणून..
सकाळी ९.३० ची वेळ होती. बंगल्याच्या पोर्चमध्येच एका आरामखुर्चीत 'काका' बसलेला होता. हातात ग्लास आणि तोंडाने अतिशय अर्वाच्य अशी शिवीगाळ चालू होती...

आण्णांनी सांगितले हे नेहमीचे आहे. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी बाजुच्या घरांमधुन तक्रार येते आणि आम्हाला लाख लटपटी खटपटी करून त्याला शांत करावे लागते. पण चौकीत सगळ्यांना माहीत झालेले होते की हा दोष त्याच्या दारुडेपणाचा नाही तर खायला उठणार्‍या एकटेपणाचा आहे, त्यामुळे जमेल तसे सर्व जण त्याला समजुन घेत.

ज्या माणसाने सगळे तारुण्य चाहत्यांच्या गराड्यात आणि त्यांच्या आंधळ्या प्रेमाच्या वर्षावात घालवले त्याच्यासाठी तो एकटेपणा किती भयानक असेल?
अलविदा काका !! Sad

@ विशाल कुलकर्णी

तुम्ही दिलेल्या माहीतीवरुन राजेश खन्ना व अमिताभ या दोघांवर चित्रीत झालेले नमकहराम चित्रपटातील गाणे आठवले.............

दिये जलते है, फुल खिलते है
बडी मुश्किल से यारो दुनिया मे दोस्त मिलते है.........

दौलत और जवानी एक दिन खो जाती है,
कुछ ना पुछो सारी दुनिया दुश्मन हो जाती है.
.......

हे शेवटी खरेच आहे......

काहीतरीच वाटत आहे, काहीतरी काळजातून तुटल्यासारखे!<<< ++१ Sad खुप वाईट वाटतय... असंच काहितेरी जगजीत सिंग आणि देव आनंद गेले तेव्हा वाटलं होतं Sad

राजेश खन्ना.... सुपरस्टार!!! भावपूर्ण श्रद्धांजली Sad

अशोकजी, मोकिमी पोस्टी आवडल्या.

भारती ताई, कविता अगदी चपखल!

काहीतरीच वाटत आहे, काहीतरी काळजातून तुटल्यासारखे! - १००% अनुमोदन.

Right now I'm totally grief stricken , cant think of writing anything!!! They should declare a three days of National Mourning...

अगदी अस्सेच मलाही वाटते आहे - डोळे ओलेच आहेत आज सबंध दिवस. त्याला फेन्सचे जेवढे प्रेम मिळाले त्याच्या शतांशाने तरी कोणाला मिळाले का हा प्रश्नच आहे माझ्या मनात. उत्तर बहुतेक नाही असेच आहे. जास्त लिहवत नाही.

अमी

राजेश खन्नाचे बरेच चित्रपट पाहिले दुरदर्शनच्या कृपेने..

माझे वडील त्याचे खुप जबरदस्त फॅन आहेत. त्यानी त्या काळात त्याचे सगळे चित्रपट पाहिलेत.

काकाला श्रद्धांजली.

एका महान अभिनेत्यास आदरांजली !
Sad
------------------------------------------------
गेले बरेच दिवस ती अशुभ, अभद्र बातमी हवेत होती. अखेर आज ती खरी ठरली. राजेश खन्ना युगाचा अंत मागेच झाला होता. आज या युगाचा जनकही काळाच्या पडद्याआड गेला.
थोडी वर्षे असेल पण इतकी अफाट लोकप्रियता दुसर्‍या कुठल्याही नटानं पाहिलेली नाही. अगदी अमिताभ बच्चननेही नाही. हे स्वत: अमिताभ कसं बोलून दाखवतो हे तो शेवटच्या दिवसांत वारंवार बोलून दाखवायचा. ते सुपरस्टारगिरीचे इतिहासजमा झालेले दिवस पुन्हा जगण्याचा त्याचा हा प्रयत्न केविलवाणा वाटायचा. वर्तमानाविषयी उत्साहाने व उमेदीनं बोलण्यासारखं त्याच्याकडे काही नव्हतं. भविष्याकडे नजर लावण्यासारखं तर त्याच्याकडे अगदीच काही नव्हतं. सक्तीने लादली गेलेली निवृत्ती ही स्वेच्छानिवृत्ती असल्याचा आव तो आणायचा. शिरीष कणेकर यांचा सामनातील लेख

विशाल Sad
त्याच्या एकाकीपणाबद्दल टाईम्समधेही वाचलं. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत त्याच्या कुटुंबियांना पुन्हा एकत्र आणण्याचं बरंचसं श्रेय अक्षयकुमारकडे जातं असं त्यात दिलं आहे.

काळजात खरंच खूप तुटल्यासारखं वाटत आहे. एखाद्या अभिनेत्यासाठी रडु यावं असं आयुष्यात
पहिल्यांदाच झालं. कालपासून काही सुचत नाहीये. तो किती आवडायचा हे शब्दात सांगू शकत नाही.
ह्या महान अभिनेत्याला अश्रूपूर्ण श्रध्दांजली.

विजयजी लेख वाचला, यातलं बरचसं त्यांनी एका न्यूज चॅनलवर सांगितलं काल.
राजेश खन्नाची स्वतःची अशी एक विशिष्ट जीवनपद्धती होती हे व्यवस्थित कळतंय त्या लेखावरून.

काळजात खरंच खूप तुटल्यासारखं वाटत आहे. एखाद्या अभिनेत्यासाठी रडु यावं असं आयुष्यात +१

मस्त लेख... माझ्याही डोळ्यात अश्रु आलेहोते हि बातमी ऐकुन
ह्या महान अभिनेत्याला अश्रूपूर्ण श्रध्दांजली.

एका महान अभिनेत्यास आदरांजली !

"आनंद मरा नही... आनंद मरते नही"

"बाबूमोशाय .....ज़िन्दगी और मौत ऊपरवाले के हाथ है जहांपनाह, उसे ना आप बदल सकते हैं और ना मैं | हम सब रंग मंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपरवाले की उंगलियों मे बन्धी है, कब कौन कैसे उठेगा...कोई नही बता सकता."

कस विचित्र आहे ना सगळ? ज्या अभिनेत्याने अनेक चित्रपटातून सर्वांची करमणूक केली. त्यांच्या जाण्याने आज सर्वजण हळहळतायत, पण ते असताना त्यांना मात्र भिषण एकटेपणाला सामोर जावं लागल. काय वाटलं असेल तेव्हा त्याना? Sad
काही दिवसापूर्वी वाचलेली, ए.के. हंगल यांच्याबद्दल वाचलेली बातमी आठवली. Sad
दिये जलते है, फुल खिलते है
बडी मुश्किल से यारो दुनिया मे दोस्त मिलते है.........

दौलत और जवानी एक दिन खो जाती है,
कुछ ना पुछो सारी दुनिया दुश्मन हो जाती है.......

दूर्दैवाने या ओळी किती सार्थ आहेत ना.

काहीतरीच वाटत आहे, काहीतरी काळजातून तुटल्यासारखे!>>>> या एका वाक्यात सगळं काही लिहिलय तुम्ही बेफी.
Sad

Salute to the Legend

विशाल ,ललिता -प्रीती त्याचा एकाकी पण बद्दल मी पण टीव्ही वरच ऐकले . त्याच्या एका घरगुती फ्रेंड नि सांगितलं त्याला क्यान्सर झाल्याच समजल्यावर आत्ता शेवटचे काही वर्ष त्याचे कुटुंबीय त्याच्या जवळ राहायला आले होते .( त्याच्या कुटुंबियांना एकत्र आणण्यात त्याचा जावई अक्षय कुमारचा हात होता) ते जर खूप आधी आले असते तर चित्र काही तरी वेगळं दिसलं होत. चाहत्यांच एवढं अफाट प्रेम मिळालेला हा सुपरस्टार एकाकी होता. त्याच्या एकाकी पणाने त्याचं अख्खं आयुष्य केवीलवाण करून टाकल Sad
ह्या महान अभिनेत्याला अश्रूपूर्ण श्रध्दांजली.

काहीतरीच वाटत आहे, काहीतरी काळजातून तुटल्यासारखे!>>>> अनुमोदन

दोनच दिवसापूवी आनन्द चिितपट पाहीला होता. खूप रडले होते तेव्हा. पिक्चरमधील शेवट इतक्या लवकर खरा होईल वाटले नव्ह्ते. खरच मनातल्या भावविश्वाचा प्राण निघून गेलाय Sad सगळ कस बेजान झालय Sad

अशा सुपरस्टार ला सलाम.

राजेश खन्नाचा शेवटचा चित्रपट कुठला होता ? मला शेवटचा "विजय" नावाचा बघितलेला आठवतोय.
>>> ऋषी कपूर दिग्दर्शित आ अब लौट चले.

काहीतरीच वाटत आहे, काहीतरी काळजातून तुटल्यासारखे!>>>> अनुमोदन
बातमी कळताच न्युज चॅनल्स बघितले. अतिशयोक्ति नाहि खरच काहीतरी काळजातून तुटल्यासारखे वाटले आणि डोळ्यात पाणी तरळल.
आनंद,बावरची माझ्या १४ वर्षीय पुतणिचे आवडते चित्रपट. यातुन त्याची अभिनय क्षमता कळते.

पहिल्या सुपरस्टारला सलाम.

Pages