वाडा

जुन्या वाड्यांच्या दारावरील
सायकलिंच्या ढिगासारखे
एकात एक गुंतून पडलेले विचार
घेउन बसलो आहे...

अर्गोनोमिक साहित्य
लिहिण्याच्या आजकालच्या विनंत्या
'मान द्या (नाहितर कापून घेइन)'
अशा जाड अक्षरानी पार वाकलेल्या

नवी कल्पना निसर्गतःच वस्त्रविरहीत
की बघितल्यावर विसरता विसरत नाही
शब्द विस्फारण्या साठी करेक्ट फोन्ट
अशावेळी कधीही सापडत नाही...

वापरलेल्या वस्तू विकणारे दुकान
डोक्यात उघडुन बसलो आहे
आजची जाहीरातः
' लाज वापरून झाली असेल तर आणुन द्या
टॅक्स मधे सुट किंवा लंगोटी तरी मिळवा '
हा कुणाचा तरी वापरलेला जोक; पुन्हा वापरला
तुम्ही वापरलेल हसण; पुन्हा वापरलत?

जुन्या वाड्याच्या अंगणासारख
कहीतरी असत सायकलीच्या ढिगा पल्याड
लंगडी घालणारे पाय आणले असतील
तर डाव रंगेल,
भाग्यात असेल तर समोरच्या काकुंचा
रियाजी ओरडाही मिळेल ...

पण त्या आधी वाडा कुठाय हे माहीती आहे का?


वाड्याच्या आठवणींनी गेले काही दिवस मलाही उगीच हळवं करुन सोडलंय. तेच तेच आठवत राहतं. अंगण, अंगणातून वर जाणारा जिना होता त्यावर गप्पा मारणं, वरच्या गॅलरीत उभं राहून अंगण आणि समोरच्या घरांच्या पत्र्यावर पडलेला पाचोळा दिसायचा ते... असलंच कायतरी.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
स्मित



हे काहीच्या काही मधे का आहे रे जया?
किती काळानी लिहिलंस..
आणि निराश तेही!!
कुठेय तुझा मॅडनेस?

मॉड, त्या तिकडे कविता मधे जो विषमज्वर घुसलाय त्याला काहीच्या काही मधे हलवा आणि ह्या अश्या कवितांना कविता भागात जाउदे.. विनंती
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home



बरीच आधी लिहिली होतीस की. बघायची राहिली.
एक क्षणभर कोरी पाटी झाली मनाची. मातकट वास येणार्‍या पेन्सिलीने आता तीवर वाड्याच्या भिंती काढल्या जातील असे वाटले..
नंतर सैरभैर झाल्यागत १०-१५ वेळा स्क्रोल-अप अन डाऊन करीत राहिलो..