नभनाट्ट्याचा थरार

Submitted by bnlele on 6 July, 2012 - 04:50

काल विश्वात शुक्र आणि सूर्यानी घडवला तो थरार प्रत्यक्ष बघायला मिळाला नाही.
नासानी केली भरपाई आणि टीव्हीवर दाखविलेल्या फिति बघता आल्या.
जगातल्या विभिन्न देशांमधे वेगवेगळ्या रंगाचा सूर्य दिसला- कुठे हिरवा तर कुठे लाल,
शेंदरी,धुरकट पांढरा, निळा,पिवळा असे अनेक रंग !
कुठे तो लाल-काळ्या चट्ट्यांनी वेढलेलाही दिसला, किंवा त्य्यावर काळे डाग दिसले.
भारतात मात्र काहीच जागी ढगांतून डोकावला- धुरकट आणि काळा डाग असलेला.
ती दृष्य बघताना विविध रंग आपल्याकडे दिसले नाहीत याची खंत होती-- पण ...
एका क्षणात, कां घडल असं याचा खुलासा पण चमकला.
प्रगत देशात हिरवा/पिवळा, सामाजिक-राजकीय अस्थैर्य असलेल्या देशात लाल-काळ्या वेष्टणात.
कुणा देशाला विश्वाच कुरण, कुणाला चैतन्न्याचा बहर असे भविष्याचे संमिश्र संकेत असावेत असे.
आपल्याकडे दिसला --निस्तेज-धुरकट आणि भ्रष्टाचाराचे काळेकुट्ट डाग !

गुलमोहर: