नभी मेघ हिंडायचे बंद झाले

Submitted by कु. कमला सोनटक्के on 25 June, 2012 - 13:56

प्रेरणा : http://www.maayboli.com/node/35891

नभी मेघ हिंडायचे बंद झाले
नहाणे फुका आमचे बंद झाले

गजल येत नाही खयालात आता
मला काफिये व्हायचे बंद झाले

निवडणूक ती काल होऊन गेली
पुढारी घरी यायचे बंद झाले

घरी चालल्या आज पाटील बाई
विदेशी सहल जायचे बंद झाले

अयोध्या बुडाली व सेतू उडाला
'कमळ' राम बोलायचे बंद झाले

गुलमोहर: 

नहाणे फुका आमचे बंद झाले>>>

Lol

(तो तुम्ही गझलेच्या ओळीपुढे दिलेला पूर्णबिर्णविराम मी डिलीटला बरं प्रतिसादात) मस्त ओळ - नहाणे फुका आमचे बंद झाले.

घरी चालल्या आज पाटील बाई
विदेशी सहल जायचे बंद झाले

हा शेर विशेष आवडून घेण्यात आलेला आहे.

कु. क्रमशः दोनधक्के

उत्तम
अभिनन्दन

गजल येत नाही खयालात आता
मला काफिये व्हायचे बंद झाले............................वा वा

ओरीजनल अस्सल व अव्वल शेर !! वा वा

अयोध्या बुडाली व सेतू उडाला
'कमळ' राम बोलायचे बंद झाले

उडाला-बुडाली >>>>>मस्त वापर केलात
कमळाचा उल्लेखही चपखल जमला आहे ...........चप्पल मारल्यासारखी वाटली .गुड पन्च. जोर का मुक्का जोर से लगे .अगदी

सोनटक्केबाईंना धाग्यान्चा बराच अनूभव आहे. धागा धागा अखंड विणुया हे त्यांचे आवडते गाणे आहे. असो, विडंबन खूपच गंमतशीर आहे, चालीत म्हणता येईल. कमलाबाई हलकेच घ्या. Proud

.

वरिल काही नवनविन आयडींचे प्रतिसाद पाहून, मायबोली प्रशासकांच्या वि.पू. त 'साधना' यांनी दिलेला खालील संदेश आठवला.

sadhana.JPG

Rofl

काव्य म्हणुन चांगले असले (यमक, इ.) तरी शेवटी भाजपवर घसरण्याचे काही कारण नव्हते,
हे म्हणजे मुद्दाम कुरापत काढण्यासारखे आहे. सबब अशा विद्वेष पसरविणार्‍या काव्याचा तिव्र निषेध ! Angry

यात विद्वेषाचा संबंध आलाच कुठे? गरजेपुरते राम राम जपून नंतर त्यांचे रामजप करणे बंद झाले. इतकाच उल्लेख आहे.

तुम्हाला 'कमळ' शब्दाचा इतका त्रास होत असेल तर कमळ हा शब्द माझे नाव - कमल आहे असे समजून वाचा... याला मक्त्याचा शेर समजा हवे तर. Proud Biggrin Rofl

Biggrin

काव्य म्हणुन चांगले असले (यमक, इ.) तरी शेवटी भाजपवर घसरण्याचे काही कारण नव्हते,
हे म्हणजे मुद्दाम कुरापत काढण्यासारखे आहे. सबब अशा विद्वेष पसरविणार्‍या काव्याचा तिव्र निषेध !

>>>

रसिक वाचक महेश,

गझल , कविता, गद्य साहित्य, कला, चित्रकला, शिल्पकला, नाट्य / सिनेमा अशा प्रकारच्या क्षेत्रांमधील निर्मीतीकडे कलाकाराचे स्वातंत्र्य गृहीत धरून पाहणे अधिक योग्य ठरते. याचमुळे, कै. पु ल देशपांडे यांनी विनोबा भावे यांची केलेली थट्टा ही निखळ विनोदी ठरली.

कळावे

गंभीर समीक्षक

Pages