निसर्गाच्या गप्पा (भाग ९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 June, 2012 - 14:36

निसर्गाच्या गप्पांच्या ९ व्या भागात सर्व निसर्गप्रेमींच स्वागत.

सध्या पावसाचे आगमन दाराशी येऊन ठेपल आहे. सृष्टी आता पाना-फुलांनी, गवतानी हिरवीगार, थंडगार होणार. डोंगर माथ्यावरून पावसाच्या धबधब्यांची तोरणे वाहणार. पशूपक्षी, जनावरांनाही आनंदी आनंद होणार. या आशयाचे छायाचित्र नि.ग. च्या ९ व्या भागासाठी मायबोलीकर निसर्ग प्रेमी जिप्सि याने दिले आहे.

महाभारतात भृगु आणि भारद्वाज ऋषी यांच्यातील वृक्षांविषयी झालेला संवाद. भॄगु ॠषी म्हणतात,
'पंचमहाभूतांनी व त्यांच्या गुणांनी सगळी सृष्टी व्यापलेली आहे.'
त्यावर भारद्वाज शंका घेऊन विचारतात,
"वृक्षाच्या ठिकाणी हे पंचमहाभूतं व त्यांचे गुण हे दिसून येत नाहीत. वृक्षांना दिसत नाही, ऐकू येत नाही. ते वास घेऊ शकत नाहीत. म्हणून वृक्ष-वनस्पती पंचभौतिक आहेत, असं कसं म्हणता येईल ?"
भारद्वाजांच्या या प्रश्नावर भृगूंनी उत्तर दिलं,
उष्णतेमुळं व फार थंडीमुळे ही वनस्पतींची पानं, फळं, फुलं, त्वचा ही ग्लान-म्लान होऊन जातात. म्ह्णून त्यांना स्पर्शज्ञान असलंच पाहिजे.
वादळी वार्‍यांचा गोंगाट इ विजेचा कडकडाट यांच्यामुळं झाडांची फळं इ फुलं भंगून जातात. त्यामुळं झाडांना कान असून, त्यांनी ती ऐकत असली पाहिजेत.
वेली वृक्षांना वेष्टीतात व सर्वत्र संचार करताना दिसतात. त्यांना दृष्टी असल्याशिवाय मार्ग कसा दिसेल ? म्हणून वृक्षांना दृष्टी असली पाहिजे.
सुगंधी वासाच्या द्रव्यांनी इ धुरांनी झाडं निरोगी होऊन त्यांना फुलांचा बहर येतो. म्हणून वृक्षांना घ्राणेंद्रिय अवश्य असलं पाहिजे.
आपल्या पायांनी वृक्ष पाणी पितात. त्यांना काही रोग झाल्यास इतर द्रवपदार्थ पिऊन ते व्याधींचा प्रतिकार करू शकतात. यावरून वृक्षांना रसनेंद्रिय असलं पाहिजे.
त्याचप्रमाणे वृक्ष जे पाणी व इतर द्रव ग्रहण करतात, ते पाणी किंवा ते द्रव अग्नी म्हणजे सूर्यप्रकाश व वायू यांच्या सहाय्यानं पचवून टाकतात. वृक्षांनी घेतलेला आहार असा पचल्यामुळे त्यांच्या ठिकाणी स्नेह म्हणजे तुकतुकीत कांती व वृध्दी किंवा वाढ ही दिसून येतात."
या सर्व गोष्टींवरून भृगू ऋषी असा निष्कर्ष काढतात : वृक्ष सुखदु:खं अनुभवतात. कापले असतानाही वाढतात, म्हणून वृक्षांमध्ये जीव आहे. ते अचेतन नाहीत अस स्पष्ट होतं.

एके ठिकाणि असं म्हटल आहे की, वन्य प्राणी हे सिध्द जीव आहेत. परंतु मानवाला योगक्रियेद्वारे प्रयत्नानं सिद्धी प्राप्त करुन घ्यावी लागते. म्हणून सुमारे नव्वद टक्के योगासनांची नावं ही पशुपक्षांच्या नावावरून घेतली आहेत. सिंहमुद्रा, मयूरासन, हंसासन, क्रौंचासन, भुजंगासन, मकरासन, कूर्मासन, म्त्स्यासन, शलभासन इत्यादी. ही नुसती आसनांचीच नावं नाहीत, तर त्याबरोबर त्या त्या पशुपक्ष्यांच्या आणि इतर जीवांच्या स्वाभाविक गुणधर्मांचाही त्यात विचार केलेला आहे.

(पाखरमाया - मारुती चितमपल्ली)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

अनुक्रमणीका:
पान १ -

प्रकाशचित्रे/ माहिती : कुमुद्/वॉटरलिलि, पेट्रीया, पावसातील झाडांची प्रकाशचित्रे.

माहिती :
"गीता प्रवचने" अध्याय १५, - आचार्य विनोबा भावे.
लोकसत्तातील लेखाची लिंक -http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227526:...

माहिती हत्तीचे खाणे, ताम्हणाच्या बिया रुजविण्याची माहीती

पान २
प्रकाशचित्र : पावसाची ओढ, पांढरे कांचन
लिंक - ३डी कार्ड कलाकृती - http://www.brooklyn5and10.com/Postcarden-A-Mini-Living-Garden-s/232.htm
माहिती : बिनफुलांचे गुलाबाचे झुडूप, हत्ती, गांधिलमाशी, माशी चावल्यावरचे उपाय

पान ३
प्रकाशचित्र/माहीती : कॅन्डल बुश, पायर
माहिती : प्र.के. घाणेकरांची कविता, हत्तीचे प्लॅस्टीक खाणे, बाभळी आणि गवत, विष्ठे मार्फत बिजरुजवणी, फ्लाय माशीचा डंख

पान ४
प्रकाशचित्र : बिनवासाची रातराणी,घोसाळे, छोटे गोल जाम, कमळ, उल्हास नदी
माहिती : भरत व्यास यांचे हिंदीतले काव्य, घोसाळ्याची जाळी- बॉडी स्क्रबर
लिंक - जांभुळ पिकल्या झाडाखाली - http://www.maayboli.com/node/35264#new
खोपा इनला इनला - http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%...

पान ५
प्रकाशचित्र : कमळ, वॉटरलिलि, साप
माहिती : मिठी, दहिसर, पोयसर नद्या, कमळ व वॉटरलिलि फरक
ज्ञाने., अ. १०, श्लोक ९, ओवी १२७., ओवी २४८, श्लो. ७, अ. १३, ज्ञाने.

पान ६
प्रकाशचित्र : पिवळी अबोली, पिवळा चाफा, रानफळ फालसा
लिंक - कुमुद्/कमळ - http://www.maayboli.com/node/35684#new

पान ७
प्रकशचित्र/माहिती - पिवळी अबोली, वेल्कम टू सेंट्रल अमेरिकन रेनफॉरेस्ट, लाल चाफा, जट्रोफा, इंडियन स्नेकवीड
लिंक - विडंबन - http://www.maayboli.com/node/35718?page=1#new

पान ८
प्रकाशचित्र - ऑर्कीड, पावडर पफ
गप्पा
पान ९
प्रकाशचित्र - ग्रे हाऊंड जातीचा कुत्रा
माहिती - ऑर्कीड

पान १०
प्रकाशचित्र - रातराणी, पंखरुपी सरडा
माहिती - शॅमेलिऑन (रंग बदलणारा सरडा), कर्नाटकच्या जन्गल ट्रेक मधील सरडा

पान ११
प्रकाशचित्र /माहिती - पांढरे तामण, जांभळे, सरडा, शॅमेलिऑन, रामराखी वेल-फळे, अळूचे झाड, वाढदिवस शुभेच्छा
माहिती/चर्चा - घरी मश्रूम बनविणे
लिंक - सरडा - http://www.maayboli.com/node/26325

पान १२
प्रकाशचित्र्/माहीती - चाफा, पांढरा चाफा,बिब्बा, वॉटर हायसिंथ, सुर्यफुल

माहीती : बिब्बा

लिंक - बिब्बा - http://zerobugetfarming.blogspot.in/p/blog-page.html, http://medplants.blogspot.in/2012/03/semecarpus-anacardium-bhallataka.html

पान १३

प्रकाशचित्र : झेंडू, सुर्यफुल रचना, गुलाब
माहिती : अंगणात लावण्याची झाडे, वॉटर हायसिंथ सुर्यफुल रचना, पुस्तक - द सिक्रेट कोड
लिंक - सुर्यफुल गणित

पान १४
प्रकाशचित्र - ससा, व्हॅनिला वेल, ड्राईड फंगस/मश्रुम, एक्झोरा
माहिती - मश्रुम, ससा, आकाश-आभाळ, व्हॅनिला वेल

पान १५
प्रकाशचित्र - कमळ बी, चिंचेचे बोन्साय, जास्वंद, पेरू, आंब्याचा कोंब
माहिती - कमळाचे बी, बोन्साय
लिंक - बोन्साय - http://gardentia.net/gardening_notes09.htm

पान १६
प्रकाशचित्र - मोगरा, हिरवा चाफा, मदनबाण, आंब्याचे कोंब, कांचन, चिपळूण मधील इंद्रधनुष्य, चिमिन
माहिती - ऑरगॅनिक शेती, कांचन

पान १७
प्रकाशचित्र - डान्डेलीच्या जन्गलातले वारूळ, मेहेंदीची फुले, कनकचंपा/रामधनचंपा, चिमिन
महिती - कागडा, गुलाबी गुलबक्षी,
लिंक - http://tasbir.net/, रानफुले - http://www.maayboli.com/node/35001

पान १८
प्रकाशचित्र - महोगनीची फळं, गुलाब, धबधबे,
माहिती - अर्जुन,
लिंक - कासच्या पठाराबद्दल - http://epaper.esakal.com/Sakal/26Jun2012/Normal/PuneCity/page2.htm,

पान १९
प्रकाशचित्र -शेंदरी गुलाब, ऑस्ट्रेलियन बाभूळ, कवठी चाफा, शंकासुर
माहिती - ऑस्ट्रेलियन बाभूळ, वेडी बाभुळ, सुबाभुळ, गिरिपुष्पाच्या पानांचा खत म्हणून वापर, उजूच्या आजोबांची वारी, कविता

पान २०
प्रकाशचित्र - खजुरी/शिंदी, जंगली हळद, चमेली, निवडूंग (ब्रह्मकमळ), फुलपाखरू कोष, अनंतमुळ, पपईच्या बियांना मोड, फळाचे झाड
माहिती - खजुरी/शिंदी, अनंत, अनंतमुळ
लिंक - वेडी बाहुळ - http://www.maayboli.com/node/21956, http://www.esakal.com/esakal/20120702/4800563177643520492.htm, http://www.sendmyflower.com/flowers-species/brahma-kamal-beautiful-flowers/

पान २१
प्रकाशचित्र - गुलाब, सर्प गंधा, पिवळी फुले, डबल मोगरा, तोंडली
माहिती/गप्पा - पक्षांच नाट्य,
लिंक http://www.maayboli.com/node/36134

पान २२
प्रकाशचित्र - 'पॉक छॉय' भाजी, निळी फुले, देव चाफा
माहिती/गप्पा - सुबाभुळ, मासे, जुनी-नवी पिढी, पाकोळी आणि कावळा
लिंक चिवने - http://www.maayboli.com/node/17090

पान २३
प्रकाशचित्र - निर ब्राम्ही, पावशा, चातक,
माहिती - ब्राम्ही, नाईल नदी, विमान प्रवास वर्णने,
लिंक http://www.youtube.com/watch?v=BegWK3vGg7I

पान २४
प्रकाशचित्र - कांचन, मधुमालती,
माहिती -विमान प्रवास वर्णन, टोमॅटो लागवड,
लिंक ब्राह्मी - http://www.aayisrecipes.com/2009/04/01/brahmi/, http://www.maayboli.com/node/19512

पान २५
प्रकाशचित्र - दयाळ, सज्जन गड, बकुळ, कांडवेल,
माहिती/गप्पा - पाऊस वर्णन, कावळा आणि कोकीळा पिल्लू, पक्षी नर मादी,

पान २६
प्रकाशचित्र - गुलाब, रक्त चंदन, पपई, थायलॅण्ड मधे वापरले जाणारे हर्ब्स, गलांगल मासा, धरणाच्या भिंतीवर चालणारे प्राणी, कलमी कृष्णकमळ
माहिती -फोझन प्लॅनेट - अळीच्या खाण्याविषयी माहीती, टेरेस गार्डन, Caught in the Act- सिंह लढाई, रक्त चंदन, कोथिंबीर लागवड,

पान २७
प्रकाशचित्र - वड, पिंपळ बोन्साय, तांबट, निसर्ग दृष्य, पिवळा गुलाब
माहिती - इंडोनेशियन खाणे, बकर्‍या-गिधाडे, वारी

पान २८
प्रकाशचित्र - शतावरी, कारल्याची वेल, ताडावरील घरटी, लाल फुल
माहिती/गप्पा - पंढरपुर दर्शन, प्राण्यांचे जीवन, मानवी जीवनमान, तण आणि वेल
लिंक

पान २९
प्रकाशचित्र - मांजरी, नर्तकचे घरटे
माहिती - मांजर प्रेम, डॉस मधील फाईल्स, नर्तकचे घरटे
लिंक http://bookboon.com/

पान ३०
प्रकाशचित्र - अनंत, गुलाबी जास्वंद,
माहिती - शैवाल अन्न, अनंत आणि तगर कुळ, फुकुओकांचे पुस्तक, तगर व अनंताची नावे
लिंक http://www.foodfromnorthernlaos.com/2012/05/09/river_weed/ फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf, पांढरी फुले http://www.maayboli.com/node/36402#new, चर्चा - http://groups.yahoo.com/group/fukuoka_farming/

पान ३१
प्रकाशचित्र - गुलाब, कदंब, कोकीळ, कोकिळा, धनेश
माहिती/गप्पा - मुंबई परीसरात दिसणारे पक्षी, कोकीळ-कोकीळा, मोराच्या हालचाली

पान ३२
प्रकाशचित्र - वेगवेगळ्या पोझ मधील मोर,
माहिती - मोर, मोरांची चिंचोली

पान ३३
प्रकाशचित्र - हायड्रेंजीया
माहिती/गप्पा - गोगलगायींचा बंदोबस्त, ओरेक्स प्राण्याचं पाडस-सिंहीण, मोर, मुंग्याची संरक्षण प्रणाली
लिंक nisargayanmagazine@gmail.com, चिलट घालवणारे झाड - http://en.wikipedia.org/wiki/Forking_Larkspur]\

पान ३४
प्रकाशचित्र - भोपळा किंवा टरबुज वेल, सुवर्णपत्री फुले, ढग, गुलाबी कण्हेर, पुष्प गुच्छ.
माहिती - गाय
लिंक

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आईला घेऊन पंढरपुरला गेलो होतो. मला तिथे जाऊन काहीच वाटलं नाही

सेम हिअर, मंदिरात गेल्याचा फिल येईपर्यंत सगळेजण एवढी गर्दी करायला लागतात की वाटत नाही एका महत्वाच्या मंदिरात आपण आलोय जेथे जायला लाखो लोक वर्षभर आस लावुन बसलेले असतात. आम्हाला तर एका बडव्याचा इतका वाईट अनुभव आला की मला तरी परत तिथे जायची इच्छा नाही. मनातल्या मनात नामस्मरण करत घरात बसलेले बरे.

माझी आई म्हणाली आपण इंद्रायणी नदी बघायला जाऊ पण दुरुन बघतो तर तिचे पात्र म्हणजे पार कोरडे झाले होते. आम्हाला आमचा कॅमेरा आणि अन्य वस्तू मंदिराच्या आत नेण्यास अनुमती दिली नाही. तो कुठे ठेवायचा हा प्रश्न होता कारण त्यांची लॉकर वगैरेची काही सोय नाही. मग एका दुकानात ठेवला. देव देवळात आणि चित्त खेटरात अशी गत झाली होती. पंढरपुरच्या आजूबाजूचा सगळा परिसर इतका घाण आहे की आपण आजवर ज्या मंदिराचे नाव इतके ऐकले ते हेच ठिकाण ह्यावर विश्वास बसत नव्हता. जिकडेतिकडे कमालिचे गरीब लोक फिरत होते. त्यांच्या चेहर्‍यावरचे हावभाव इतके केविलवाणे होते की माझी दर्शन घेण्याची ईच्छाच मरुन गेली. मी आतमधे प्रवेश केला तेंव्हा भितींवरचे सुविचार वगैरे वाचून मला फार छान वाटले. सुविचारांमधली शक्ती तेंव्हा कळली. आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो तेंव्हा मन मुळीच प्रसन्न झालेले नव्हते. आई तर फार थकली होती पुणे ते पंढरपुरच्या आणि तोही हिवाळ्यातील प्रवासानी आम्ही गारठले होते. एके ठिकाणी भाकरी पिठल्याचे छान जेवण मिळाले. ते जेऊन आम्हे तृप्त झालो. वाटेत सोलापुर रोडवर आमची गाडी पंक्चर झाली. रात्र पडायला लागली होती. एक मुस्लिम बहिण तिथे चहा बनवत होती. तिची आवराआवर सुरु होती. तिने तिची रोजची कहाणी सांगितली. फार छान होती तिची मराठी भाषा. आईला तिने बसायला खुर्ची दिली. आमची गाडी नीट होईपर्यंत तिने चार पाच कप चहा आम्हाला करुन दिला. रात्रीच्या ८ वाजता गाडीवाला पंक्चर काढून परत आला. मी आईला म्हणाला आई कधीकधी आपले देवघर किती प्रसन्न आणि चैतन्यमय वाटते. घरातच मनाभावापासून पुजा करावी.

उजु, आजोबाना आम्हा सर्वांचा नमस्कार.

मला पंढरपूरला जाऊन बरीच वर्षे झाली. हिवाळ्याचेच दिवस होते. बडव्यांची ख्याती माहित असल्याने मी लांबूनच जाऊ लागलो तर बडव्याने मला जवळ ओढले. विठोबाच्या पायावर डोके ठेवायला लावले. देवाचा हार माझ्या गळ्यात घातला. एकंदर चांगला अनुभव होता. चंद्रभागेत पाणी नव्हतेच.
नामदेवाच्या पायरीचा मार्ग मात्र आता बंद झाला आहे.

वारकर्‍यांसाठी वारी हाच एक अनुभव असतो. वाटेतले अभंग, मित्रांची सोबत यातच ते रमतात. अनेकजण तर कळसाचे दर्शन घेऊन, माघारी फिरतात.

शांती, स्वच्छता आणि निसर्गरम्य परिसर यासाठी मला गोव्यातील देवळे आवडतात. नेहमीची मंगेशी, शांतादुर्गा अशी सोडली तर ब्रम्हकरमळी, म्हाळसा, सप्तकोटीश्वर, तामडी सुर्ला, तिरुपती, नागेश्वर, सा़खळी चे विठोबा आणि दत्तमंदिर अशी अनेक आडवाटेवरची देवळे आहेत तिथे.

उजू आजोबांना शि.सा. नमस्कार! मला एकदा नर्मदा परिक्रमा करायची आहे. पण आजोबा म्हणतात तसे ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात. Happy

दिनेश, महालसेच्या देवळात आता बर्‍यापैकी गर्दी असते, पण तरी मला ते आवडतेच Happy नागेशी मात्र अजून शांत आहे. बालाजीचे मंदिर कोकिलाबेन अंबानींनी बांधले आहे. ते पण सुंदर आहे.

मी मागील वर्षी गेले होते पंढरपुरला. पण आम्हाला माहीत नव्हते गेलो त्याच्या २ दिवसांनी कार्तिकी एकादशी होती. त्यामूळे तिथे खुप गर्दी होती. आम्ही रात्री पोहोचलो आणि तेंव्हाच फ्रेश होऊन दर्शनासाठी गेलो कारण सकाळी दुसरीकडे निघायचे होते. गेल्यावर तिथे खुपच गर्दि होती. जवळ जवळ ७ तासांची दर्शनाची रांग होती. इतका वेळ मुलांसकट थांबणे शक्य नव्हते म्हणून मुखदर्शन घेउन जायचेच आम्ही ठरवले. मुखदर्शन चांगले मिळाले. पण व्यवस्थित दर्शन घेण्यासाठी पुन्हा ऑड सिझनला येऊ हे मात्र मनाशी ठरवून तिथुन निघालो. मनातील भक्तीने मुखदर्शनही प्रसन्न वाटले. आता पाहू कधी योग योतो ते.

जागू, तांबटाचा फोटो मस्त. तुम्हाला पक्षी स्वःताहून पोझ देतात असे वाटते.

सर्वांचे फोटो आणि लेख छान.

शशांकजी,
कालचे ते धरणाचे फोटो पाहुन प्रतिक्रिया द्यायचेच विसरुन गेलो,प्रथम ते भन्नाट (स्पाउअडरमैनला देखील लाजवतील असे) फोटो डाऊनलोड केले,अटैच केले आणि मित्रांना पाठवुन दिले.
वाटलं एखादी भिंत चडुन गेला तरी माणसाच किती कौतुक होतं, स्पाउअडर मैन तर किती भाव खातो,म्हणुन तर या प्राण्यांच्या चिवटपणाला,संयमाला,धाडसाला सलामच केला पाहिजे.

या प्राण्यांच्या चिवटपणाला,संयमाला,धाडसाला सलामच केला पाहिजे. >>>>> हा त्यांच्या सर्व्हायवलचा प्रश्न आहे ना, नाहीतर त्यांना विनाकष्टाचे कोण खाऊ घालणार ??? (मनातल्या मनात - आपल्यासारखे....)
जंगलातील / निसर्गातील सर्व प्राणीमात्रांना प्रचंड जीवनसंघर्षाला सतत तोंड द्यावेच लागते - त्यात आहार हा मुख्य, मग स्वसंरक्षण, पिल्लांना जन्म व त्यांचे संरक्षण - कल्पनाच करवत नाही.... कसे हे सगळे ते मॅनेज करत असतील....

आदिमानवही याच दिव्यातून गेलेला असणार..... मग पुढे बुद्धिचातुर्याने जीवनात स्थैर्य आले असणार - पण तो मधला काळ - असाच प्रचंड जीवनसंघर्षाचा असणार.....

अजूनही अनेक रानटी टोळ्यातील माणसे वा आपले आदिवासी बांधव कष्टकरी असल्यामुळे जास्त काटक व या जीवनसंघर्षाला जास्त योग्य प्रकारे तोंड देऊ शकणारे असे वाटतात.......

आपण (शहरी लोक) फारच (नको इतके) आरामदायी/ विलासी/ चैनीचे* जीवन जगतोय असे वाटते..... (कृ कुणाचाही गै न ही विनंती) ... मीपण त्यात आलोच की.....

(*त्या स्माईली टाकायचाही मला कंटाळा आल्याने ज्याने त्याने त्या त्या ठिकाणी त्या समजून घ्याव्यात....)

आपण (शहरी लोक) फारच (नको इतके) आरामदायी/ विलासी/ चैनीचे* जीवन जगतोय असे वाटते.....>>>> एकदम कबूल.

पण जेव्हा सकाळी...? नाही नाही पहाटे उठल्यानंतर मध्यरात्री झोपे पर्यंत केलेली धावपळ पाहीली की वाटते की आपल्याला सुद्धा जीवनसंघर्ष टळला नाही. मुंबईत या धावपळीचे कारण म्हणजे लहान होत जाणारे शहर आणि वाढत जाणारी माणसे. माणसे, माणसे म्हणजे किती माणसे ? तर कुठल्याही उपनगरात गर्दीच्या ठिकाणी आपले दोन्ही हात रुंद करुन स्वतःभोवती गिरकी घालता येत नाही. धक्के देता-घेता आले तरच जगणे श़क्य आहे.

नाही नाही पहाटे उठल्यानंतर मध्यरात्री झोपे पर्यंत केलेली धावपळ पाहीली की वाटते की आपल्याला सुद्धा जीवनसंघर्ष टळला नाही. अगदी बरोबर मधु.

चैनीचे जीवन आहे की नाही माहीत नाही. पण धावपळ दगदग मात्र खुप होते. मधु म्हणते तसच अगदी सकाळी पाच ते रात्री १२.

फार मागे जाऊन मी विचार करत नाही आपले जीवन चैनीचे की आपल्या पुर्वजांचे! पण इतके मात्र नक्की की आपल्या ह्या पिढीपेक्षा आपल्या आधीच्या पिढीचे जीवन अधिक चांगले होते असे वाटते. त्यांनाही प्रश्न होते पण हे आपण जे स्ट्रेसफुल जीवन जगतो तो तणाव त्यांच्या जीवनात नव्हता. हा तणाव फार वाईट होत चालला आहे. सर्व काही आहे पण तणावामुळे माणूस दबल्या जात आहे. पुर्वीच्या लोकांना फुरसत मिळायची. हल्ली माणूस नुसता धाव धाव धावतो आहे. हल्लीच्या बायकांचे जीवन तर आणखीनच वाईट! घरी कामे, मुले आणि वर नोकरी. अगदी तारंबळ उडत असेल!

खूप दिवसांनी आले इथे. छान फोटो बघायला मिळाले. धरणाच्या भिंतीवरचे आयबेक्स मस्तच.
जागू, तोंडली मस्त.

कारल्याचा वेल वाढतोय. आजूबाजूला तण आलेत ते काढावे म्हटलं तर वेलाने गवताच्या पातीलाच आधार म्हणून पकडलंय. Happy मागे अळूचे पान दिसते आहे.

paate.jpg

शशांक,
ज्यावेळी माणूस अन्न शिजवून खायला शिकला, त्यावेळेपासून उत्क्रांती जास्त वेगाने झाली.
असे मी नाही, तर बीबीसी चा माहितीपट म्हणतोय. (डिड कुकिंग मेक अस ह्यूमन !)

लोला, तण काढावेच लागतील. वेलीला दुसरा आधार मिळेल, पण तण वेलीला पोषण मिळू देणार नाहीत.

उजु, आजोबाना आम्हा सर्वांचा नमस्कार. >>>> दिनेशदा +१

मागल्या रविवारी असेच भटकायला बाहेर पडलो ते थेट वसईत पोहोचलो. वसई किल्ल्याच्याजवळ ही हाउसिंग कॉलनी दिसली, तिचा फोटो :

माई गॉड मला ती पक्षांची हाऊसिंग कॉलनी दिसलीच नव्हती. मी आपले झाड पाहिले फक्त. फोटो अंधारलेला आहे म्हणून दिसली नसेल कदाचित. काय निसर्गदत्त देणगी आहे सुगरण पक्षांना घरटे विणण्याची खरचं! देवाची करणी आणि नारळात पाणी.

आहाहा..सुर्रेख कॉलनी..
जागु..कसलं फूल आहे हे?? खूप सुंदर रंग आहे.. खूप कॉमन आहे ना?? तू मॅग्नीफाय केल्यामुळे ओळखू येत नाहीये.. Happy

लोला, तण काढावेच लागतील. वेलीला दुसरा आधार मिळेल, पण तण वेलीला पोषण मिळू देणार नाहीत.

Happy

फुकुओकांचे पुस्तक वाचलेत तर त्यात नेमकी याच्याउलट माहिती सापडेल, मुळात सोबतचे गवत हे तण आहे हेच त्यांना मान्य नाही. निसर्गात सगळे एकमेकांच्या हातात हात घालुन एकमेकांना मदत करत वाढतात असे त्यांचे मत आहे. Happy

त्या कारल्याने किती प्रेमाने आणि विश्वासाने गवताचे बोट पकडलेय, आपण ते निर्दयपणे काढायचे नी कार्ल्याला सांगायचे की हे बोट नको, मी रोवलेले कुंपण पकड. Happy

साधना लागवडीच्या दृष्टीने त्याला तणच म्हणावे लागेल. म्हणजे आपल्या उपयोगीतेच्या दृष्टीने म्हणते मी. गवत वाढून ते आपल्या उपयोगात येणार नाही. शिवाय गवत कारल्याच्या मुळातील सकसपणा शोषून घेणार आणि कारल्याच्या वेलीला कमी पोषण मिळून कमी प्रतिची किंवा कमी कारली लागणार. नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीने वरील विचार अगदी परफेक्ट.

येस साधना, ऑरगॅनिक फार्मिंग जिंदाबाद !
जागू त्याला फूटबॉल लिली किंवा मे फ्लॉवर असे नाव आहे.

मामी, पुढच्या महिन्यात त्या किल्ल्याच्या परीसरात, अनेक फुलपाखरे दिसू लागतील आणि काही खास ऑर्किड्स पण !

दिनेश, मागे दिसणार्‍या पानांवरून ते मे फ्लॉवर वाटत नाहीये. शिवाय त्या केसरांच्या मागे जी पाकळ्यांसारखी रचना दिसतेय तशी रचना मे फ्लॉवरमध्ये नसते.

दिनेश, मागे दिसणार्‍या पानांवरून ते मे फ्लॉवर वाटत नाहीये. शिवाय त्या केसरांच्या मागे जी पाकळ्यांसारखी रचना दिसतेय तशी रचना मे फ्लॉवरमध्ये नसते. >>>> येस्स - माधव म्हणताहेत ते खरंय...... हे मे फ्लॉवर वाटत नाहीये....

नाही नाही दिनेशदा ते मे फ्लॉवर नाही. त्या फुलाचा आकार पावडर पफ च्या आकाराएवढा होता. मी क्लोजअप घेतल्याने तो मोठा दिसतोय.
हा अजुन एक फोटो.

साधना लागवडीच्या दृष्टीने त्याला तणच म्हणावे लागेल. म्हणजे आपल्या उपयोगीतेच्या दृष्टीने म्हणते मी. गवत वाढून ते आपल्या उपयोगात येणार नाही. शिवाय गवत कारल्याच्या मुळातील सकसपणा शोषून घेणार आणि कारल्याच्या वेलीला कमी पोषण मिळून कमी प्रतिची किंवा कमी कारली लागणार. नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टीने वरील विचार अगदी परफेक्ट.

गेली कित्येक वर्षे आपण असा विचार करतोय आणि आपल्याला तो खरा वाटतोय. पण प्रत्यक्षात असे नाहीय. ज्यांनी नैसर्गिक शेतीमध्ये आयुष्य घालवले त्यांना ब-याच वर्षांनी जो बोध झाला तो फुकुओकांनी आपल्या पुस्तकात लिहिलाय. त्यांच्या मते तण नसतेच. निसर्गात जे काही आहे त्या प्रत्येक घटकाचा उपयोग आहे. माणसाने फक्त स्वतःचा विचार करुन निसर्गाच्या प्लॅनिंगमध्ये फेरफार केलेत आणि आज तो ह्या ढवळाढवळीची जबरी किंमत मोजतोय.

कधी वेळ मिळाला तर त्यांचे पुस्तक वाच. माझ्याकडे आहे डाउनलोड केलेले. तुला पाठवते.

Pages