आनंदयात्रा

Submitted by सुधाकर.. on 3 June, 2012 - 13:48

तुम्हाला गाणी ए॓कणं आवडत असेल व कोणी विच्यारले कि बाबा तुला गाणी का आवडतात? तर काय ऊत्तर द्याल? तुमचं माहीत नाही पण मी तर म्हणेन, मला गाणी आवडतात कारण मला
या जगाच्या पाठीवर कुठेच नसेल अशी ए॓क आनंदयात्रा करायला मिळते.
खरंच शब्द- ताल- आणि सूर या त्रिवेणीच्या संगमातून ऊसळणार्‍या लाटेवर आपलं मन स्वार होतं.आणि ए॓का
अनोख्या आनंदाच्या प्रवासाला निघतं.पण आवड म्हणून गाणी ए॓कणं आणि आवडीच्या गाण्यातून आनंदाचा प्रवास
करणं यात खूप मोठा फरक आहे.नाहीतरी आजच्या रिमिक्सच्या जमान्यात आवडीनं रोज बेंड-बाज्या ए॓कणारे
खूप असतात. त्याला गाणं ही तसच आशयगर्भ असावं लागत.
आजही मराठी-हिन्दीतील जूनी गाणी अनेकांना आवडतात. पण या गाण्यांच्या प्रेमापोटी देखील त्याच्या निर्माण
कर्त्यांचे चेहरे कुणाला आठवत नाहीत किंव्हा कुणाला तर माहीत ही नसतात.
'बाबुजी' सुधीर फडके,ग.दी. माडगुळकर आणि मंगेश पाडगावकर हे मराठीतील तिन आनंदयात्री. ज्यानी मराठी संगीताच्या राज्यात सुंदर स्वप्नांची आफाट नगरी ऊभी केली. ते आज DJ Remix च्या धिंगाण्यात हळुहळू कूठेतरी लोप पावताहेत.

" दिवस तुझे हे फुलायचे,
झोपाळ्या वाचुन झुलायचे"....झोपाळ्या वाss चुन झुलायचे..!"

खरंच मन पुन्हा फुलून येईल असा ऊंच झोका देणारं कोणी मिळेल आज?
DSC01031.jpg

....................क्रमांश

गुलमोहर: 
शब्दखुणा: