"सत्यमेव जयते" भाग ५ (Is Love A Crime?)

Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49

आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<इथल्या लोकांसाठी मी स्वत:ला किती बदललं(हे वास्तव आहे...खरच गुणी आहे ती) हे तुम्ही पाहताय..पण मला इथे काडीचीही किंमत नाहीय<>

हे काय स्वजातीय ठरवून केलेल्या लग्नांत होत नाही का?

माझ्या घरात नेमके उलटे आहे देवकाका......... माझ्या मावशीचे लग्न सारस्वत ब्राम्हणाशी झाले... मामाचे कोकणस्थ ब्राह्मणाच्या मुलीशी ... दुसर्या एका लांबच्या मावशीच्या मुलीचे बौध्दाशी. (हे सगळे अरेंज होते मामाचे सोडुन)....... इतकी वर्ष झालीत.. काहीच प्रोब्लेम नाही आला......... उलट आम्हाला इतर जातींचे व्यवहार इत्यादी कळाले.........तिघांचाही संसार सुखाचा आहे........
.
.
मी कोणता दृष्टीकोण ठेवु मग...............

कोणत्याही प्रकारचा विवाह असो...प्रेमविवाह अथवा ठरवून केलेला....त्यात मुलीलाच जास्तीत जास्त त्रास भोगावे लागतात...एका घरातून दुसर्‍या घरात....आंतरजातीय असल्यास..परजातीत....आंतरधर्मीय असल्यास...परधर्मात...वधू म्हणून जातांना जो काही त्रास भोगावा लागतो, ज्या स्थित्यंतरातून जावे लागते....ते सगळं स्त्रीलाच सहन करावे लागते..म्हणूनच मुलीच्या मातापित्यांना तिची विशेष काळजी असणे हेही नैसर्गिकच आहे.....

अगदी अगदी ! मला फक्त हेच म्हणायचं होतं की हा कार्यक्रम फक्त ऑनर किलींगवरच असता तर पटला असता. त्यात "कायद्याने मान्यता आहे म्हणून कुणीही कुणाशीही लग्न करावं" हा जो सुर मिसळला त्याने जरा गोंधळ झाला. Happy

हे काय स्वजातीय ठरवून केलेल्या लग्नांत होत नाही का?>>
असं कुठे म्हटलंय मी?
मयेकरजी, युक्तिवाद मीही करू शकतो...अगदी दोन्ही बाजूने. Proud
पण म्हणूनच आधी म्हटलंय...जे काही भोगावे लागते ते स्त्रीलाच....म्हणून आपल्या मुलीला त्रास होऊ नये/झालाच तर कमीत कमी व्हावा अशीच सद्भावना पालकांची असते आणि म्हणून ते जास्तीत जास्त काळजी घेऊन मुलीचे लग्न लावत असतात...हे मान्य करायला काय हरकत आहे?
बाकी लग्न हा देखिल एक जुगार आहे असं कुणीसं म्हटलंय हे बाकी खरंय. Happy
कधी,कसे दान पडेल काही सांगता येत नाही.

देवकाका, तुमचे विवेचन पटले. धन्यवाद. उद्या माझ्या मुलीचे लग्न करायचे झाले तर मी आपल्या समान आर्थिक किंवा सामाजिक पातळीवरच लग्न करण्याचा सल्ला देईन. ही कदाचित नव्या पद्धतीची वर्णव्यवस्था च असेल . Happy

लग्न लग्न काय घेऊन बसलात? या कार्यक्रमात तस स्पष्टपणे असंही सांगण्यात आलं की १८ वर्ष वयावरची कुठलीही मुलगी आणि २१ वर्ष वयावरचा कुठलाही मुलगा लग्न न करता पण एकत्र राहायला कायद्याने बंदी नाही. कशाला करताय लग्न? Proud

>>>. पण तरीही मुलीला ज्या वेगळ्या वातावरणात जाऊन रुजावं लागतं, तिला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं...हे पाहिलं की शक्यतो मुलीला आपल्यासारख्या पद्धती,संस्कार इत्यादि असणार्‍या घरात द्यावं असं मला वाटतं <<<
प्रमोद, वेगळ्या दृष्टीकोनातुन मान्डलेल्या विचारान्ना व त्यातिल कळकळीला अनुमोदन Happy मात्र.....

वर जे लिहील आहेत ना, ते विसरा आता. आधुनिक "हम दो हमारा/री एक" च्या फ्लॅट कल्चर मधे अन वाढत्या वृद्धाश्रमान्च्या अस्तित्वात कुठे असणारे ते रुजणे/कुटुम्ब/घर/पद्धती/संस्कार वगैरे? विसराहो ते.

अन तुमच्यासारखे मोजके असे काही बोलले तरी ते "अरण्यरूदनच" ठरणार! हवय कुणाला कसल बन्धन? कशाचच बन्धन नकोय, रीत नकोय, नितीनियम नकोहेत, नैतिकता/अनैतिकता वगैरे नकोय, अन त्या प्रत्येक "नकोला" कारण म्हणून ज्या असन्ख्यातील सबबी आहेत, त्यात हे हे सर्व मागास तरी आहे वा झूठ तरी आहे वा हे हव्वच्चे कशाला, तिकडे इजिप्त मधे नै का अस अस चालत, मग इकडेच का नको चालायला, अशा अनेक बयादी आहेत, जोडीला लैलामजनु /शिरिनफरहाद (साला यामधे बाजीराव मस्तानी कधी येत नाही नै? Wink ) टाईप उदाहरणे आहेत, प्रेमाचा बुजबुजाट दाखविणारे शिनेमे/मिडीया आहेच आहे, जोडीला व्यक्तिस्वातन्त्र्य आहे. तिकडे माबोवरच कोणसस विचारत आहे, अराजक आहे का-येऊ घातलय का, कस्ली कस्ली अराजके डोम्बलाची सान्गायची त्यान्ना? यान्ची सन्स्कृतीहीन व्यक्तिस्वातत्न्र्ये जेव्हा "बाह्य धर्म/वन्श/देश/विचार" यान्नी आक्रमित झाली कीच वाट बघत बसायची आहे का अराजकाच्या सम्पुर्णत्वाची? असो.
माझा कर्मफलाच्या सिद्धान्तावर जाम विश्वास आहे बोवा. Happy ज्याचेत्याचे ज्याच्यात्याच्या प्राप्त अक्कलेप्रमाणेचे कर्म अन त्याचे तदनुषन्गिक फल हे सुनिश्चित असतेच अस्ते. आपण का आपल्या डोक्याला ताप करुन घ्या? Proud

>>>> लग्न लग्न काय घेऊन बसलात? या कार्यक्रमात तस स्पष्टपणे असंही सांगण्यात आलं की १८ वर्ष वयावरची कुठलीही मुलगी आणि २१ वर्ष वयावरचा कुठलाही मुलगा लग्न न करता पण एकत्र राहायला कायद्याने बंदी नाही. कशाला करताय लग्न? <<<< Proud
असहे का? अहो हे तर काहीच नाही, तिकडे कुठे त्या अमेरिकेत की युरोपात म्हणे मुलगा+मुलगा वा मुलगी+मुलगी असे समलिन्गी (लग्न करुन वा न करता) एकत्र रहायला देखिल कायद्याने बन्दी नाही. लिव्ह इन रिलेशनशिप की कायसस म्हणतात बोवा त्याला.....! अन तुम्ही कुठले मागाऽऽस कल्चरचे मागास लोक, कस्ल्या पन्चायची कर्ता हो लग्नाच्या अन सन्स्कॄतीच्या तुम्ही? जग कुठल्या कुठ चाल्लय, चन्द्रावर पोचलय, टेस्टट्युबमधे बेबी तयार करतय, अन तुम्ही बसा आपले सगोत्र अन फित्र चघळत! Wink
बरोबर ना? Proud

बर, विषयान्तर म्हणुन नाही, पण आज "म्हणे" वटपोर्णिमा आहे! Wink
"वटपोर्णिमेचा उपास करावा की नाही, वडाला प्रदक्षिणा घालाव्या की नाही, वडालाच का घालाव्यात, स्त्रीयान्नीच का घालाव्यात, कुन्कुच का लावावे, नवर्‍याच्या एकट्याच्याच जीवाबद्दल प्रार्थना का करावी? मूळात स्त्रीनेच का म्हणून करावी? अशी प्रार्थना केल्याने किती नवरे वाचलेत याची काही आकडेवारी? काही सन्शोधन? प्रयोगशाळेत सिद्ध झालय का ते? की उगा आपल.... कुणाच्या तरी पोटाचि सोय? अस्लिकस्लि तुम्ची मागास भारतीय सन्स्क्रुती? " या सखोल प्रश्नान्च्या वर चर्चेकरताही एक धागा उघडावा का? की आधीच उघडलेला आहे? अमिरखानलाच यावरही बोलायला सान्गावे का त्याच्या कार्यक्रमात?

लिंबु आप्पा, सगोत्र म्हणजे नेमकं काय हेसांगाला?

१. आमचे गोत्र काश्यप आहे... ब्राह्मणाना गोत्र असते. मराठा, लिंगायत, महार, बौध्ह याना गोत्र असते का?

२. अगदी सख्ख्या नात्यात लग्न करु नये ही प्रथा आहे, ते मान्य आहे. पण समजा दोन चार पिढ्यात तरी नाते नाही, आणि तरीही गोत्र काश्यपच आहे, तर लग्न करावे की नको?

३. याबाबत धर्म किंवा विज्ञान नक्की काय सांगते?

देवकाका,

हा या धाग्याचा उतरीही/ विषय नाही तरीही,

माझ्या मते पहिल्यांदा जे वासरु कूंपण तोडते त्याला दोन चार लाठ्या बसणारच. असे त्रास सुरुवातीला काही लोकांना सोसावे लागणारच. पण आंतरजातीय विवाह इथ पर्यंत रुजायला हवेत कि लग्न करताना जात विचारणे बंद व्हावे.

रोटी आणि बेटी व्यवहाराला पर्याय नाही. हे सगळे झाल्या शिवाय जातीची तेढ कमी नाही होणार असे मला वाटते. सध्या पुण्या सरख्या ठिकाणी रोटि व्यवहार तर चालु झाले आहेतच पण लग्नांमधे अजुनही जात हा महत्वाचा मुद्दा आहेच.

***** (अ) शुद्धलेखनाबद्दल क्षमस्व.*****

>>> आपापल्या मुला-मुलींच्या भविष्याबद्दलचा उचित निर्णय घेतांना पालकांना कधी कधी कठोर व्हावे लागणे हे नैसर्गिक मानतो मी

>>> तारूण्याच्या नशेत भावनातिरेकाने बरेचदा चुकीचे निर्णय घेतले जातात/घेण्याची शक्यता असते...अशा वेळी वास्तवाचे भान करून देणे हे घरातल्यांचे कर्तव्यच असते....

>>> प्रेम वगैरे जे म्हटलं जातं..ते बर्‍याचदा उच्छृंखलपणा असतं...एकदा ते संपलं की मग वास्तवातले चटके सहन करण्याची त्या तरूणांची मानसिक तयारी नसते...म्हणूनच वडीलधारी मंडळी आपापल्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न करतात....मला तरी हे अनैसर्गिक वाटत नाही.

>>> कोणत्याही प्रकारचा विवाह असो...प्रेमविवाह अथवा ठरवून केलेला....त्यात मुलीलाच जास्तीत जास्त त्रास भोगावे लागतात...एका घरातून दुसर्‍या घरात....आंतरजातीय असल्यास..परजातीत....आंतरधर्मीय असल्यास...परधर्मात...वधू म्हणून जातांना जो काही त्रास भोगावा लागतो, ज्या स्थित्यंतरातून जावे लागते....ते सगळं स्त्रीलाच सहन करावे लागते..म्हणूनच मुलीच्या मातापित्यांना तिची विशेष काळजी असणे हेही नैसर्गिकच आहे.....

>>> तेव्हा वडीलधारे जे काही करतात ते सदहेतूनेच करत असतात हे मान्य करावेच लागेल.....नियमाला अपवाद असतोच त्याप्रमाणे काही स्वार्थी आई-बापही असतील....पण म्हणून सगळ्यांना एकाच तागडीत तोलले जाऊ नये.

>>> तरीही मुलीला ज्या वेगळ्या वातावरणात जाऊन रुजावं लागतं, तिला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं...हे पाहिलं की शक्यतो मुलीला आपल्यासारख्या पद्धती,संस्कार इत्यादि असणार्‍या घरात द्यावं असं मला वाटतं...तिथेही ती रूजेलच असं खात्रीने नाही सांगता येत..पण रुजण्याची शक्यता जास्त असू शकते इतकंच.

प्रमोद देव,

आपल्या प्रतिसादातील वरील वाक्ये पटली.

मी काही आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह जवळून पाहिले आहेत. एका केसमध्ये आईवडीलांनी मुलीच्या आंतरधर्मीय विवाहाला तीव्र विरोध करून आंतरधर्मीय विवाह न करता आर्थिक, शिक्षण, संस्कार इ. सर्व दृष्टीने तोलामोलाचे स्थळ मुलीला बघून देऊन कालांतराने मुलीचे वैवाहिक जीवन एकंदरीत खूपच व्यवस्थित झाल्याचे पाहिले आहे. या केसमधील मुलगी स्वतः एमएससी व नंतर पीएचडी करत होती. घरी ६ खोल्यांचा मोठा फ्लॅट होता. वडीलांचे उत्पन्न दरमहा किमान १ लाख रूपये होते. कसे ते माहित नाही पण ती एका परधर्मीय मुलाच्या प्रेमात पडली. तो मुलगा फर्निचरच्या दुकानात काम करत होता. शिक्षण १२ वी सुद्धा नव्हते. घरचे मोठे कुटुंब एका खोलीत राहत होते. पण आईवडील खंबीर राहल्याने हे लग्न टळले. हे लग्न यशस्वी झालेच नसते असे वाटते. अत्यंत उच्च आर्थिक परिस्थितीतून आलेली व उच्च शिक्षण घेतलेली मुलगी १२ वी नापास व खूपच सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या मुलाबरोबर ते सुद्धा धर्म बदलून फार काळ राहू शकली नसती. तिच्या बाबतीत आईवडीलांनी योग्य भूमिका घेतली असे माझे मत आहे.

दुसर्‍या २ केसमध्ये परधर्मीय तरूणाने काही अडचणीत मदत केल्याने भारावून जाऊन उपकारांच्या ओझ्याखाली धर्मबदल करून लग्न केल्यावर काही वर्षांनी मुलीने पश्चाताप केल्याची २ उदाहरणे माझ्या माहितीत आहेत. या दोन्ही केसमध्ये आईवडीलांनी विरोध केला नव्हता. पण तेव्हा विरोध करून लग्नाला परवानगी दिली नसती तर बरे झाले असते अशी भावना लग्नानंतर काही वर्षांनी त्या मुलींनी व्यक्त केली होती. या मुलींच्या बाबतीत आईवडीलांनी अयोग्य भूमिका घेतली असे माझे मत आहे. त्यांनी वेळीच विरोध करायला पाहिजे होता.

अजून २ केसमध्ये धर्मबदल करून लग्न करून मुलींचा संसार व्यवस्थित सुरू आहे. ही दोन्ही लग्ने दोघांच्या आईवडीलांच्या संमतीने झाली. या मुलींच्या बाबतीत दोन्ही बाजूच्या आईवडीलांनी योग्य भूमिका घेतली असे माझे मत आहे.

एकंदरीत तुमची खालील वाक्ये बरीचशी पटतात.

"आपापल्या मुला-मुलींच्या भविष्याबद्दलचा उचित निर्णय घेतांना पालकांना कधी कधी कठोर व्हावे लागणे हे नैसर्गिक मानतो मी . . . तारूण्याच्या नशेत भावनातिरेकाने बरेचदा चुकीचे निर्णय घेतले जातात/घेण्याची शक्यता असते, अशा वेळी वास्तवाचे भान करून देणे हे घरातल्यांचे कर्तव्यच असते . . . तेव्हा वडीलधारे जे काही करतात ते सदहेतूनेच करत असतात हे मान्य करावेच लागेल . . . शक्यतो मुलीला आपल्यासारख्या पद्धती,संस्कार इत्यादि असणार्‍या घरात द्यावं असं मला वाटतं . . . तिथेही ती रूजेलच असं खात्रीने नाही सांगता येत . . . पण रुजण्याची शक्यता जास्त असू शकते."

मी आंतरजातीय विवाहाविरुद्ध नाही...पण त्या बाजूचाही नाही...मिया-बिबी राजी तो क्या करेगा काजी?
पण तरीही मुलीला ज्या वेगळ्या वातावरणात जाऊन रुजावं लागतं, तिला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं...हे पाहिलं की शक्यतो मुलीला आपल्यासारख्या पद्धती,संस्कार इत्यादि असणार्‍या घरात द्यावं असं मला वाटतं...तिथेही ती रूजेलच असं खात्रीने नाही सांगता येत..पण रुजण्याची शक्यता जास्त असू शकते इतकंच.>>>>>>>
+१००००००

आणि

उद्या माझ्या मुलीचे लग्न करायचे झाले तर मी आपल्या समान आर्थिक किंवा सामाजिक पातळीवरच लग्न करण्याचा सल्ला देईन.>>>>>>>(If it was not a sarcastic comment)
+१०००००००

दोन अतिशय प्रामाणिक आणि व्यवहार्य विचार..

१८ वर्ष वयावरची कुठलीही मुलगी आणि २१ वर्ष वयावरचा कुठलाही मुलगा लग्न न करता पण एकत्र राहायला कायद्याने बंदी नाही. कशाला करताय लग्न? >> मंद्या पश्चातापाच्या अग्नित होरपळतोयस जणू.. Proud

>>पण आंतरजातीय विवाह इथ पर्यंत रुजायला हवेत कि लग्न करताना जात विचारणे बंद व्हावे.

Uhoh का रुजायला हवे? तुम्ही म्हणता म्हणून?

प्रमोद, मुलीचे वडील म्हणून आपली वाटणारी काळजी व त्यानुशंगाने असलेले संपूर्ण पोस्ट पटले. कुठलेही वडील हाच विचार करतील...
पण तरीही मुलीला ज्या वेगळ्या वातावरणात जाऊन रुजावं लागतं, तिला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं...हे पाहिलं की शक्यतो मुलीला आपल्यासारख्या पद्धती,संस्कार इत्यादि असणार्‍या घरात द्यावं असं मला वाटतं>>> बरोबर आहे... पण जर ती स्वतःच्या मर्जीने रूजू पाहत असेल तर... तिची मुळेच छाटून टाकावीत का? तुम्ही अर्थातच ऑनर किलींग मान्य नाही हे स्पष्ट पणे नमूद केलंय्!!! विवाह आंतरजातीय असो वा स्वजातीय,... प्रत्येक घरातील पद्धती थोड्याफार वेगळ्या असू शकतात... उदा काही ठिकाणी देखल्या देवा दंडवत तर दुसरीकडे फार सोवळंओवळं अर्थात हे पाहून ठरवून करता येतंच! पण ती मुलगी निभवून नेइन म्हणतेय तर मग आपण आईवडील या नात्याने त्यातील संभाव्य धोके पटवून देऊ शकतो. तरीही तिला जमणार असेल तर तिच्या त्या निर्णयाचे स्वागत करणे, तू स्वतःच्या मर्जीने लग्न करतेस, त्यातील छोट्याछोट्या कुरबूरी आता तुलाच सांभाळायला लागतील याचे भान देणे तसेच याउप्पर जर त्रास (मारझोड, छ्ळ) होत असल्यास तिला खंबीर पाठींबा देणे हे सध्याचे पालक करतातच. तुम्हीही करालच! पण आजच्या ऑनर किलिंग विषयाला धरून आता आम्हाला बिरादरीतून बाहेर करतील, तुझ्या मागच्या बहीणींचे लग्न कसे व्हायचे म्हणून मुलगी मेली समजून आयुष्यभर तिचे तोंड न बघणारेही आहेत्,.यापुढे जाऊन तिला मारूनच टाकणे म्हणजे...

जन्म देण्याचे कर्तव्य केल्यावर त्यांनी आपल्या नियंत्रित मार्गाने जगले नाही तर त्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार या पालकांना कोणी दिला?

आंतर्जातीय विवाहात सर्व काही आल्बेल असेल अशा स्वप्नाळू दुनियेत मुलींनी जगणेही चुकीचेच!
सर्वच पद्धती भिन्न! त्या अंगवळणी पडेपर्यंत त्रास होणारच! काही मुली पटकन अ‍ॅडजस्ट करतात तर काही घरेही त्यांना मोठ्या प्रेमाने सामावून घेतात, काहीजणींना धडपडत राहावं लागतं सिद्ध करण्यासाठी! प्रवाहाविरूद्ध पोहोण्याचं ठरवलंच आहे तर मग यातूनही खंबीरपणे मार्ग काढावा. सर्वात महत्वाचं म्हणजे मागे कुणीसं कुठल्यातरी धाग्यावर लिहील्याप्रमाणे आपला खुंटा कितपत मजबूत आहे हे प्रत्येक मुलीने चाचपून पाहावं, ज्याच्या दावणीला बांधलं जाणार तो खोंटाच मुळात तकलादू असेल तर फिरून पुन्हा विचार करण्याची गरज आहे. असो तुमच्या पोस्टला अनुसरून थोडं विषयांतर झालं

मराठा, लिंगायत, महार, बौध्ह याना गोत्र असते का?>> डॉलर माझ्या माहीतीप्रमाणे मराठांमध्ये गोत्र आहे (मुंज नसते)

>>पण आंतरजातीय विवाह इथ पर्यंत रुजायला हवेत कि लग्न करताना जात विचारणे बंद व्हावे.

अतिशय चिथवणीखोर प्रतिसाद. का रुजायला हवे? तुम्ही म्हणता म्हणून?

यात चिथावणीखोर काय आहे?

>>> उद्या माझ्या मुलीचे लग्न करायचे झाले तर मी आपल्या समान आर्थिक किंवा सामाजिक पातळीवरच लग्न करण्याचा सल्ला देईन.>>>>>>>(If it was not a sarcastic comment)
+१०००००००

>> दोन अतिशय प्रामाणिक आणि व्यवहार्य विचार..

अनुमोदन. आर्थिक आणि सामाजिक पातळीबरोबर शैक्षणिक पातळी सुद्धा खूप विषम असू नये.

थोडक्यात काय तर मुलांना संभाव्य धोक्यांची जाणीव करून देऊ शकतो पण आपले निर्णय त्यांच्यावर लादू नयेत... नाहीतर ते ३ इडियटस मधल्या आर माधवन सारखं... आपका डिसीजन गलत होता तो लाईफटाईम आपको कोसता... इससे अच्छा यही ना की मै अपने आपको कोसू!!!

>>थोडक्यात काय तर मुलांना संभाव्य धोक्यांची जाणीव करून देऊ शकतो पण आपले निर्णय त्यांच्यावर लादू नयेत...

अनुमोदन

डॉलर, मी अवलोकनात असा अवतार असलेल्यांना उत्तर देत नाही Happy

वैयक्तिक

देश अ‍ॅ
नाव ड
स्त्री/पुरुष ---
सध्या मुक्काम (गाव/शहर) ङ

Rofl

स्वतःच्या खर्‍या आयडीने या. मग कदाचित बोलू.

माझ्या मते, सजातिय, वगैरे वगैरे असं सगळं पाहून सुद्धा विवाह केला तरिही व्हायचे ते प्रॉब्लेम्स येतातच. निव्वळ आंतरजातिय्/आंतर धर्मिय असा विवाह आहे म्हणून त्याला विरोध करायचे धोरण आपण टाळले पाहिजे. मानसिक रित्या त्या दोघांना (लग्न करू ईच्छिणार्‍यांना) लग्नाचा, रिलेशनशिपचा अर्थ कळला आहे का? एकमेकांना ते पूरक आहेत का? याचा विचार करून ते लग्न करून द्यावे. अशा लग्नांना विरोध करू नये.

डॉलर, मी अवलोकनात असा अवतार असलेल्यांना उत्तर देत नाही

तुमच्याकडून उत्तराची अपेक्षाही नाही.. तुमची उत्तरे कुत्र्याच्या छत्रीसारखी असतात.. कितव्या मिनिटाला तुम्ही ए डिट कराल, हे सांगता येत नाही.

माझे वाक्य हे उद्गारवाचक आहे.. आता यात काय चुकीचे आहे बुवा? या अर्थाने ते आहे... तो प्रश्न तुम्हाला विचारलेला नाही. उत्तर द्यायची तसदी घेऊ नयेच.

आपल्या मुलीला त्रास होऊ नये/झालाच तर कमीत कमी व्हावा अशीच सद्भावना पालकांची असते आणि म्हणून ते जास्तीत जास्त काळजी घेऊन मुलीचे लग्न लावत असतात...हे मान्य करायला काय हरकत आहे?<<

देवकाका,
सहमत.

मुळात जात हा विषयच एवढा का उचलून घेतला जातोय?
आर्थिक विषमता हेही एक कारण असतच
त्याबद्दल भाष्य का केलं जात नाहीये?
माझ्या मैत्रिणीचे आमच्या ग्रुपमधल्या एका मुलावर प्रेम होते. (दोघेही मराठाच) पण केवळ ते यांच्यापेक्षा गरिब म्हणुन तिच्या आई वडिलांनी घरुन लग्नाला परवानगी दिली नाही.
आता तिने पळून जाऊन लग्न करावं तर ते आमच्यापैकी कुणालाच पटत नाहिये.
मग आता पुढे काय?

सगोत्र विवाह निषिद्ध मानणे हे पुढच्या संततीच्यासाठी म्हणून असते. जेनेटिक्सही त्याला मान्यता देते पण गोत्र व्यवस्थेत एक मोठ्ठा फरक आहे तो म्हणजे गोत्र व्यवस्था फक्त पित्याच्या वंशाकडेच बघते (त्यामुळे आत्ये-मामे भावंडं सगोत्र होत नाहीत).
पण जेनेटिक्स हे पुरूषप्रधान नाही. ते दोन्हीकडून येणार्‍या गुणधर्मांनाही विचारात घेते आणि त्यामुळे समान जीन पूल असलेल्यांमधे होणार्‍या विवाहातून निपजणारी संततीमधे दोष असण्याची शक्यता जास्त मानली जाते.
पारशी समुदायामधे प्रत्येक पिढीत अर्धवट, गतिमंद संतती असतेच त्याचे कारण त्यांचा जीन पूल मर्यादित आहे असे म्हणले जाते.

पण आता गंमत अशी आहे की सगोत्र विवाहांना बंदी घालायची आणि जातीबाहेर जायलाही बंदी घालायची ही केवढी डबल ढोलकी आहे. त्यात परत पुरूषांसाठी इतर जातीतून स्त्रिया आणलेल्या चालतात पण स्त्रियांनी जातीबाहेर लग्ने केली की झोंबल्याच मिरच्या नाकाला हा टोळीकाळातला दुटप्पीपणा आहेच.

Pages