मला भेटलेल्या अफलातून व्यक्ती # २

Submitted by Mandar Katre on 31 May, 2012 - 11:27

मला भेटलेल्या अफलातून व्यक्ती # २
आमच्या गावाजवळचे छोटेसे शहर पाली , तसे फार मोठे नाही पण सुमारे ५००० लोकवस्तीचे .पण मुंबई-गोवा हायवे आणि रत्नागिरी-कोल्हापूर हायवे जंक्शन आणि त्यात आजूबाजूच्या सुमारे २५-३० गावांसाठी असलेला बुधवारचा आठवडा बाजार, कॉलेज आणि संध्याकाळच्या “तीर्थ यात्रे”करुंसाठी सुमारे ५० गावात एकमेव जागा .यामुळे पाली तसे सतत गजबजलेले असते .तर अश्या या पाली गावात डॉक्टर उमेश पेठकर नावाचे एक डॉक्टर आहेत .
पेठकर डॉक्टर मुळचे कराडचे .परंतु डॉक्टरकी हा धंदा नसून समाजसेवेचे एक साधन मानणाऱ्या पेठकर डॉक्टरांना कोकणातच रहावेसे वाटले .त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना लग्न ठरवताना ही खूप त्रास झाला कारण मुली कोकणात यायला तयार नसत ,पण तरीही जिद्दीने मी कोकणातच राहणार असे सांगून शेवटी एका डॉक्टर मुलीशीच लग्न केले
या डॉक्टरांची खासियत म्हणजे ते औषधे लिहून देत नाहीत ,तर स्वत:चं औषधे देतात .त्यांचे एका वेळचे बिल २५०/- ते ४००/- होते .पण त्यात खरोखरच ४५०/- रुपयाची औषधे असतात .ते स्वत:ची कन्सल्टिंग फी घेतच नाहीत .
याशिवाय त्यांची ४०० कलामांची आंब्याची बाग आहे .शेतकऱ्यांच्या जीवाभावाच्या प्रश्नावर ते चर्चा करतात , कोणचे अडलेले लग्न, कोणाचे मोठे आजारपण ,कोणाचा कोल्हापूरला एद्मिट केल्यशिवाय बरा न होणारा आजार ,कोणाचा जीवघेणा पण पेठकरांनी वाचवलेला आजार ,कोणाच तरी दुसऱ्या डॉक्टर नी हजारो रुपये खर्च सांगितलेले ऑपरेशन ,आणि मुख्य म्हणजे मूल न होणारी असंख्य जोडपी. पेठकर डॉक्टर कडे सतत रांग चालूच !

तर मंडळी असा हा कोकणाचा डॉक्टर ,खरोखर फक्त आपल्या “डॉक्टर”या भूमिकेच्या फार पुढे जावून रुग्णांशी एक जिव्हाळ्याचे ,आपुलकीचे नाते निर्माण करणारी व्यक्ती .हे पेठकर डॉक्टर माझ्या जिवलग मित्रांपैकी एक आहेत याचा मला खरोखर अभिमान वाटतो .....................................!

गुलमोहर: