मला एका सामाजिक प्रश्नाला वाचा फोडायची आहे..
कित्येक वर्ष दगडूशेठ हलवाई गणपती, चिमण्या गणपती, नातूबाग अशा सारखी मंडळे त्यांच्या दिमाखदार लायटिंग साठी सुप्रसिध्द आहेत.. पण मला सांगा, हे लायटिंग आपण ३ मिनिटांच्या पेक्षा जास्त पाहू शकतो का? तिथल्या स्पीकर्स ने छातीत धडधडायला लागायच्या आत आणि त्या गलिच्छपणे नाचणार्यांच्या चेंगराचेंगरीत सापडायच्या आत आपण तिथून काढता पाय घेतो.. मग कशासाठी हा अपव्यय??
गेल्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात एवढं जोरदार भानि चालू होतं.. आजही कित्येक खेडेगावांमधे आठ आठ तास भानि चालू हे..पाणी आणायला उस्मानाबाद जवळच्या खेड्यात लोकांना १५-१५ कोस दूर जावं लागतंय.. शेतीला पाणी द्यायला पंपांना वीज नाही.. कर्जापोटी बळीराजाला स्वतःचा आणि पर्यायाने त्याच्यावर अवलंबून असणार्यांचा बळी देण्याशिवाय पर्याय उरला नाही.. वीजनिर्मितीसाठी किती प्रोसेसिंग व्हावं लागतं..किती मनुष्यबळ लागतं..किती अफाट पैसा पाण्यावर पाण्यासारखा खर्च होतो हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याची झळ आपल्याला पोचणार नाही...
अशा सगळ्या पार्श्वभूमीवर गणपतीमधे डोळे दिपवणारं झगमगीत लायटिंग्.. फालतू गाणी केकाटणारे स्पीकर्स.. या गोष्टीवरचा वीजेचा वापर आपण नियंत्रणात आणू नाही का शकत??
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सारखी वर्षानुवर्षे सामाजिक कार्य करण्यासाठी प्रसिध्द असणार्या मंडळांनी याबाबतीत पुढाकार घेऊन काही नवीन पायंडे पाडले तर त्यांना लोकाश्रय तर मिळेलच पण इतर मंडळेही या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करतील... तुम्हाला काय वाटतं??
गणेशोत्सव : काळानुसार कधी बदलणार आपण ???
Submitted by आशूडी on 12 September, 2008 - 04:06
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय
अतिशय जिवंत अन महत्वाचा मुद्दा... पण कदाचित अनुत्तरीत?
************************
अभिनन्दन
अभिनन्दन आशु,
अतिशय महत्वाचा प्रश्न चर्चेत आणला आहेस तु. मला वाटत आपण सगळ्यानिच (सामान्य लोकांनि) ह्या साठि आग्रह धरायला हवा. रोषणाइ, धांगडधिंगा अश्या अनावश्यक गोष्टिंवर पैसे घालवणार नसाल तरच वर्गणि देउन या उत्सवात सहभागि होवु अशि अट आपण घालायला हवि. अर्थात हे एकट्या दुकट्याच काम नाहिच. सर्वांच सहकार्य असल्याशिवाय हे प्रत्यक्षात येण अशक्य आहे.
चर्चा
चर्चा झाल्याशिवाय योग्य उत्तरापर्यंत कसे पोचणार आपण ?? आणि उत्तर द्या असे कुणालाच म्हणाय्चे नाहीये आपल्याला.. कारण आपण सगळेच हे अनुभवतो आहोत्..एकाच नावेतून प्रवास करणारे आपण... पण निदान जे चालू आहे ते तुम्हाला पटतंय का?? नाही तर, काही उपाय तुम्ही सुचवू शकता का? कोण जाणे, आपल्या माबो वर काही मंडळांचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या संपर्कात असणारे असतील तर आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत निदान पोचेल तरी.. एवढाच यामागचा शुध्द हेतू... चूभूद्याघ्या..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
आशु,तू
आशु,तू मांडलेला मुद्दा खरोखरच मह्त्वाचा आहे.. हा केवळ गणपतीपुरताच मर्यादित नाहीये.. नवरात्र,दसरा,दिवाळी या सगळ्या सणांनासुध्दा हा अपव्यय चालु असतो..
पण अगदी सूक्ष्म स्तरावर विचार केला तर केवळ या मंड्ळानी सुधारणा करून हा प्रॉब्लेम सुट्णार आहे का? ह्या लोकांनी तर पायंडे पाडायलाच हवेत पण वैयक्तीक जिवनात आपण किती महत्व देतो या गोष्टीला? घरी,ऑफिसमध्ये? किती छोटया छोट्या गोष्टींमध्ये आपण या उर्जेचा अपव्यय करतच असतो.. आपल्या लक्षातही येत नाही बर्याच वेळा आणि लक्षात आले तरी मी एकट्याने काळजी घेऊन अशी काय मोठी बचत होणार असा विचार करून `चाललय ते चालु देत' असा कॅज्युअल ऍप्रोच ठेवतो आपण. मग दुसर्यांना का दोष द्यावा?.. आपणच आपला पायंडा घालावा आधी.. प्रत्येक जण याकडे स्वतःची जबाबदारी म्हणुन पाहील आणि योग्य ती काळजी घेईल तेव्हाच यातून मार्ग काढता येईल असं मला वाटतं.
हं...बेसुर..ब
हं...बेसुर..बेताल वाजणारे टेपरेकॉर्डर्स...
गणपतीच्या मूर्तीच्या आकारमानाची चढाओढ..
चार-पाच वर्षांनी इथे देशात गणेशोत्सव साजरा करतीये खरंतर , आनंद वाटायला हवा मला. पण एवढ सगळं बाजारु रुप बघुन वाटल या पेक्षा तिकडे(बाहरेनला) आम्हि साजरा करत होतो तो गणेशोत्सव जास्त चांगला आहे यापेक्षा.
शांत आणि मंगलमय वातावरण असं फार थोड्या ठिकाणी पहायला मिळतंय सध्या.
अजून बरच काहि मुद्दे आहेत, वेळ मिळेल तस तस लिहिते इथे.
पण हा जो
पण हा जो प्रकर आहे त्याचा विचार फक्त गणेशोत्सव काळातच का? बाकीचे दिवस सुद्धा सर्वत्र वीजेची जी उधळपट्टी चालू असते ती कोण थांबवणार..
आणि ह्यातही मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र असा भेदभाव का? का मुंबई हे एक मेट्रो शहर आहे त्यामुळे त्याला वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय... असे का?
मुंबई मधील व्यापारी बाकी महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा विचार न करताच वीजेची उधळपट्टी चालूच ठेवणार असे का?
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
आशू कळीचा
आशू कळीचा मुद्दा उपस्थीत केला आहेस त्याबद्दल तुझे आभार...
लो. टिळकांना अपेक्षित असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची आज सर्वत्र प्रतारणा होत आहे.
यंदा मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग येथील एका मंडळाने एक विधायक काम केले आहे. आपल्याच वर्गंणीदार विभागातील शालेय मुलांना वह्या पुस्तकांचे वाटप केले व इतकेच नव्हे तर दोन विद्यार्थांनींचा एका वर्षाचा शालेय शिक्षणाचा खर्च उचलण्याचे काम हाती घेतले आहे. आणि हे सर्व गणपतीची मुर्ती, सजावट, रोषणाई आदींवर वायफळ खर्च न करता हे मंडळ यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत.
सुरवात तर झालीच आहे... आता पुढाकार घेण्याची पाळी आपली आहे...
गणपती बाप्पा मोरया!!!
आशू, खूप
आशू, खूप चांगला मुद्दा मांडला आहेस. मंडळ कितीही छोटं असो, गणपती बरोबर स्पीकर्स हे हवेतच असे फॅड आहे. दांडेकर पूलावर साधारण कसल्या प्रकारची वस्ती आहे हे आपणा सर्वांना माहीती आहे. तिथे ही स्पीकर्स साठी वारेमाप खर्च करतात लोक. जणू काही ते मंडळाच्या प्रतिष्ठेचं एक प्रतिकंच आहे..
आशू, खूप
आशू, खूप चांगला मुद्दा मांडला आहेस. पण सुरुवात आपल्यापासुनच व्हायला हवी. आपण सगळ्यांनी रोषणाई बघायला जाणं बंद केलं तर हळुहळु हे आपोआप थांबेल.
आशु, आपण
आशु,
आपण चांगला मुद्दा चर्चेला घेतला आहे. चढाओढ, आणि विशेषतः कर्कश्श आवाज वा इतर उपद्रवकारक गोष्टी यावर काही मर्यादा आवश्यक आहे.
पण मला असे वाटते की आयुष्यात आणि समाजातही प्रत्येक गोष्टीचे एक स्थान असते. तेंव्हा गणपतीची मुर्ती, सजावट, रोषणाई या फालतू गोष्टी आहेत असे म्हणून तो खर्च गरीबांसाठी करावा अशी भुमिकाही फार एकांगी वाटते. ही उपदेशाची कसोटी जी आपण सहज दुसर्यांना लावतो ती जर स्वतःलाच लावली तर असे लक्षात येते, की आपल्या अगदी बाजूलाच समाजात एवढे प्रश्न आहेत, दारिद्र्य आहे की जेमेतेम दोन वेळचे जेवण व अंग झाकायला आवश्यक तेवढे दोन चार कपडे एवढे सोडल्यास आपलाही प्रत्येक खर्च तुलनेत फालतूच आहे आणि तो गरिबांसाठी करता येईल. आपल्या घरच्या एसी, टीव्ही, फ्रीज, वॉटर हीटर, लिफ्ट साठी वापरली जाणारी वीज ही पण उधळपट्टीच आहे की...
गणपती उत्सवात बदल हवे आहेत हे खरे आहे, पण ते बदल हे अधिक सकारात्मक दृष्टीने करायला हवे आहेत. म्हणजे हा उत्सव अधिकाधिक आकर्षक, भव्य, मंगलमय, नवीन पिढीला आपल्या संस्कृती, समाज, धर्म, देशाची ओळख करून देणारा, त्याबद्दल उत्सुकता, ओढ निर्माण करणारा असा व्हावा असे काही बदल व्हायला हवेत असे वाटते. आजही अनेक मंडळे असा प्रयत्न करत असतात, दगडूशेठसारख्या भव्य देखाव्यातून दर वर्षी आपल्या प्राचीन वैभवशाली देवालयांचे इतके सुंदर दर्शन घडते, आणि ते बघायला अगदी खेड्यापाड्यातूनही आलेले लाखो जण पुण्यातच वैष्णोदेवीपासून ते कोणार्कपर्यंत देवालये बघून कसे हरखून जातात, हेही अनुभवण्यासारखे असते.
या
या उत्सवांचे विद्रूपीकरण अन विकृतीकरण यांना कडाडून अन संघटनात्मक पध्दतीने कडवा विरोध व्हायला हवा.
पण-
या उत्सवानिमित्त होणार्या उलाढालीत (सजावट, खाद्यपदार्थ, वस्तू, सेवा अन इतर बरेच काही) लाखो लोक / कुटूंबे त्यांचे पोट भरतात, त्यांचे संसार चालवतात.
त्याचीही चर्चा इथे व्हायला हवी असे वाटते.
जीएस,
जीएस, साजिरा, हिम्स, अनुमोदन!
शिवाय याच उत्सवाच्या निमित्ताने गावोगावची लेझिम ढोलताशान्ची पथके मिरवणूकीत सामिल होतात, सुक्ष्मात जाऊन विचार केल्यास, त्यान्ना मिळणारी "बिदागी" येवढ्यापुरताच विचार मर्यादित रहात नाही तर या निमित्ताने या "मर्दानी" "लढाऊ" खेळान्ची उपासना व जोपासना कुठेतरी होत रहाते आहे हे आश्वस्त करणारे वृत्त जाणवते
दहीहन्डीच्या बाबतीत देखिल हेच घडताना दिसते!
अर्थात उडदामाजी काळेगोरे या उक्तिप्रमाणे काही प्रमाणात वाईट प्रवृत्ती शिरतातच पण मग त्यान्ना हुसकावुन लावण्यासाठी आपण स्वतः त्या त्या ठिकाणी सामिल होणे अत्यावश्यक ठरते असा माझा तरी अनुभव आहे.
शिवाय, हे अवघड जागेचे दुखणे असल्याने, जीएस म्हणतो तसे "ते बदल हे अधिक सकारात्मक दृष्टीने करायला हवे आहेत". केवळ टीका वा उपहास वा तिरस्कार करून काहीही साध्य होणार नाही! तर जर आम्हाला काहीएक सुधारणा हवी तर आम्हीच त्यात सामिल होऊन हळूवारपणे ते बदलायचा प्रयत्न केला पाहीजे!
चु. भु. दे. घे.
...;
आपला, लिम्बुटिम्बु
जीएस,
जीएस, साजिरा, लिम्बुटिम्बु अनुमोदन !
<<यंदा मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग येथील एका मंडळाने एक विधायक काम केले आहे. आपल्याच वर्गंणीदार विभागातील शालेय मुलांना वह्या पुस्तकांचे वाटप केले व इतकेच नव्हे तर दोन विद्यार्थांनींचा एका वर्षाचा शालेय शिक्षणाचा खर्च उचलण्याचे काम हाती घेतले आहे. >>
यासारखी अनेक उदाहरणे असतील .....मीडिया ने अशा उपक्रमांना योग्य प्रसिध्दी दिली पाहिजे....आणि मंडळांनीसुध्दा आपण केलेल्या उपक्रमांची योग्य ती दखल घेतली जाईल यासाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही....
त्या त्या ठिकाणच्या (local) government ने थोडा पुढाकार घेतला पाहिजे असे वाटते....विसर्जन मिरवणुकांच्या वेळी ज्या मंडळांच्या मिरवणुकीत लेझीम अथवा इतर पारंपारिक नृत्यप्रकारांचा समावेश आहे त्यांना अग्रक्रम (मानाचे स्थान) देता येवू शकेल.... उत्कृष्ट मिरवणुकांसाठी आकर्षक बक्षिसे जाहीर करता येतील.... अशा उपायांनी गणेशोत्सवांच्या विधायकतेत निश्चितच भर पडेल....
आशु आणि
आशु आणि सर्व मायबोलीकरांना अनुमोदन,
आपण जो मुद्दा मांडलाय तो खूप चांगला आहे.
मला सर्वांचे म्हणणे पटते पण...
महत्त्वाचा मुद्दा हा कि या उत्सवांमधे श्रद्धा कीती असते... आणि मजा कीती?
ज्याला स्वतः मधेच देव आहे हे कळ्त नाही तो घरतल्या मूर्तिला नमस्कार करतो आणि ज्यला स्वतःच्या घरात देव आहे हे कळ्त नाही तो बाहेर जातो.
या उत्सवांमधे श्रद्धेपेक्षा उत्साहाला जास्त महत्त्व दीले जाते त्यामुळे हे प्रकार होणारच त्यात वावगं असं काहीच नाही.
दुसरा मुद्दा हा कि हे प्रकार फक्त गणेश चतुर्थी पुरते नसून ते जवळ्पास सर्व सणांमधे आणि भारतापुरते मर्यादित नसून सर्व देशांमधे आहेत. तुम्ही ख्रिस्मसचे उदाहरण घ्या.
महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाने धार्मिक कार्य / उत्सवांकरीता लागणार्या तात्पुरत्या विजेचे दर मुद्दामच कमी केलेले आहेत तेच जर जास्त (म्हणजे मॉलसाठी आहेत तेवढे) केले तरी बराच फरक पडेल. कमीत कमी वीज वीतरण कंपन्यांनातरी फायदा होईल आणि ते त्यातून जास्त वीज खरेदी करु शकतील.
आणि हिम्स....
मुम्बईचा भानीचा प्रश्न हा ईतर महाराष्ट्रापेक्षा वेगळा आहे कारण मुम्बई ही महाराष्ट्राचीच नाही तर भारताची आर्थिक राजधानी आहे. एकट्या मुम्बई शहरातून ७० ते ७५% कर देशाला दीला जातो त्यातून मुम्बईला काय मिळतं. कमीतकमी वीजतरी पुरेशी मीळावी अशी अपेक्षा मुम्बईकरांनी ठेऊ नये का?
असही मुम्बईतल्या वीवी कंपन्या खासगी असून त्या स्वतः वीजनिर्मिती करतात आणि मरावीमं वरचा भार कमीच करताहेत नाही का? त्या तिप्पट कीमतीने वीज पूरवठा करतात आणि जास्त वीज खरेदी करतात, यात उर्वरीत महाराष्ट्राचं काहीच नुकसान होत नाही.
सरते शेवटी असं सांगावस वाटतं की या उत्सवांमुळेच आपल्या संस्कृतीचे दर्शन घडंत असतं त्यामुळेच आपलं वेगळेपण जगाला कळत असतं. (हे आपलं मला वाट्तं हा... चुभुदेघे)
आशु
आशु गणेशोत्सव तर काळानुसार बदललेलाच आहे. पुर्वीच्या काळी कुठे लाईटिंग, स्पिकर्स नाच असायचे. आता विधायक कार्यक्रम जसे पुस्तक वाटने, रक्तदान, ईतर समाज कार्य, परिसंवाद या बरोबरच लाईटिंग, स्पिकर्स आणि नाच आले.
लाईटिंग वा ईतर गोष्टींच्या अपव्यय होतो असे वाटने चुक आहे कारण आपण हे नेहमी नाही करत तर वर्षातील फार तर २० दिवस करतो. माणूस उत्स्वप्रिय प्राणि असल्यामूळे ह्या गोष्टी होनारच. ऊलट असे बघ की वर्षभरात बरेचदा आपण निराश असतो, तेव्हा अशा उत्सवांमुळे, त्यात होनार्या भव्य दिव्य लाईटिंग वा ईतर अपव्ययामूळे माणूस क्षणभर स्वतःला विसरुन तो देखावा बघतो. भले तो काळ तिनच मिनीट असो, पण ते तिन मिनीट भारावुन जाऊन जगल्या गेलेले असतात, त्या आनंदासमोर तो थोडासा अपव्यय झाला तर काय फरक पडतो.
गणेशमंडळ विधायक कार्य का करत नाहीत असे बर्याच जनांचे म्हणने असते. दरवेळी चार लोक जमले की विधायक कार्य करायला पाहीजे ही अपेक्षा चुक आहे. ईतर वेळीही आपण ते करु शकतो. मग हा उत्सव फक्त माणूस असन्याचा उत्सव म्हणून साजरा केला तर काय बिघडेल. आणि मोठी मंडळ (खास करुन पुण्यातील ) वर्षभर काहीतरी विधायक करतच असतात. गरिबी, रोगराई हे प्रश्न देश कितीही प्रगत झाला तरी राहनाराच कारण गरिबी हटायला सरकारची मदत नाही तर त्या गरिब व्यक्तीची ईच्छाशक्तीही लागते. फक्त त्यांना सुविधा देवुन हा प्रश्न सुटनारा नाही.
दारु पिउन मंडळासमोर नाचनार्या लोकांचा मी विरोध करेन पण न पिता नाचनारे हे त्यावेळापुरत्या समाधित असतात (मी ही त्यातलाच ऐक) असे वाटते.
गेल्या अनेक वर्षांपासुन चांगले देखावे वैगरेंसाठी लोकसत्ता स्पर्धा आयोजीत करते. काही देखावे (भरपुर पैसे खर्च करुन केलेले) अगदी वर्थ असतात. मला ९४ च्या नातु बागेचा देखावा अजुनही आठवतो. त्यात त्यांनी ९३च्या भुकंपाचा टेस्ट काही सेकंदाकरता दिली होती.
रोषनाई बघायला न जाने हा उपाय नाही. ( तसाही टिव्ही बंद केल्यावर केकता कपुरच्या सिरिअल्स थांबल्या नाहीत वा अमिताभ ने भिक्कार पिक्चर मध्ये काम करने सोडले नाही
) ही रोषनाई स्वतःला दोन मिनीट विसरन्यासाठी, त्या रोषनाईत ऐकरुप होन्यासाठी केली जाते हा विचार केला तर आपण पण "त्या"चे घटक होतो.
इथे भरभरून
इथे भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद! सगळ्यांना अनुमोदन ही
कारण प्रत्येकाच्या म्हणण्याला काही ठोस असे कारण आहे.. काही मुद्यांवर वैयक्तिक मतभेद होऊ ही शकतात.. पण एकूणच जे जे मुद्दे विचारात घेऊन ही चर्चा पुढे जातीये त्यातून आपल्याला नक्कीच काही उपाय सुचतील.. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे आभार!

विजेचा वापर, पैशाचा अपव्यय आपण स्वत:च टाळला पाहिजे >> एकदम मान्य! आणि हे आपण करत आहोत म्हणूनच बाहेर चाललेल्या उधळपट्टीची आपल्याला इतक्या प्रकर्षाने जाणीव होते आहे. बाहेर जाताना किंवा वापरात नसताना आपण विजेची बटणे, पाण्याचे नळ बंद ठेवतो, लिफ्ट चा वापर खाली येण्यासाठी किंवा २ मजले चढण्यासाठी करत नाही.. हे आणि असे अनेक छोटे छोटे उपाय आपण करतोच हे मी माझ्यासाठी तरी गृहीत धरलेले आहे.
अशा उत्सवांमधे प्रचंड जनशक्ती एक झालेली असते. तिला योग्य दिशा मिळाली तर ते सर्वांच्याच हिताचे आहे. मनोरंजन, करमणूक करू नका असे नाही म्हणायचंय.. पण ते करण्याचे अजून सरस मार्ग आहेत की! ढोल ताशांच्या आवजाचा जो एक कैफ चढतो त्याची सर कोंबडी पळाली किंवा मुंगडा ला येईल का??? मग ढोल ताशे वाजवून ऐकून करूया की साजरा उत्सव! अशा गोष्टींना प्राधान्य मिळालं तरच ही परंपरा टिकेल आणि उडदामाजी काळे निघून जातील..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा!
नमस्कार मल
नमस्कार
मला ह्या विषयावर अजुन काही वेगळ वाटत नाही ,कारण सगळ्यान्च्याच सन्दर्भात सगळच आले आहे.सार ईतकच की सुवर्णमध्य आपल्यालाच साधला पाहिजे व त्याची सुरुवात स्वताह पासुनच करुया.
आपल्या
आपल्या सर्वांना हे मुद्दे मान्य होतील, पण जे प्रत्यक्ष सगळा उपद्व्याप करतात, त्यांना पटत नाही. त्यांच्या मते कर्णकर्कश, बेसूर गाणी, धांगडधिंगा, नि पैशाचा वीजेचा जास्तीत जास्त अपव्यय म्हणजेच गणपति उत्सव.
गणपतीच काय, लग्नाला सुद्धा हेच प्रकार होतात. नि तेहि चांगले उच्चवर्णिय समजणारे, शिकलेले लोक करतात!
तेंव्हा कुणि कुणाला बोलावे?
आता अमेरिकेत बरे आहे. कितीहि वीज वापरा, पैसे खर्च करा, अपव्यय करा. आज ९ ट्रिलियनचे कर्ज आहे, उद्या १०, ११ ट्रिलियनचे होइल. कुणि परत मागितले तर एक अणूशस्त्र पाठवू त्यांच्या देशावर. तीहि खूप आहेत!
फक्त कर्णकर्कश गाणी नसतात एव्हढेच.
तुम्ही
तुम्ही आम्ही इथे चर्चा करुन फारसे काही साध्य होणार नाही... ४ दिवस हा बीबी गजबजेल... सगळे एकमेकांना अनुमोदन देतील आणि दुसरा विषय मिळाला की विसरुन जातील
माफ करा पण बहुतांशी हे असच होत...
ह्या सगळ्या उत्सवाच्या नावाखाली चालणार्या धुडगुसाला खरच आळा घालायचा असेल तर यात प्रसिध्दीमाध्यमांनी फार महत्वाची भुमिका बजावावी लागेल...
विधायक कामे करणार्यांना प्रसिद्धी देण्याबरोबरच मिरवणुकीच्या नावाखाली अशी हिडिस गाणी लावुन विकृत अंगविक्षेप करणार्यां मंडळांवर पद्धतशीर टीका केली पाहिजेल...
सर्व वर्तमानपत्रांनी आणि सामाजिक संस्थांनी सर्वात बेताल/असंस्क्रुत मंडळ अशी बक्षिस जाहिर केली पाहिजेत आणी गणेशोत्सवानंतर समारंभपुर्वक अशी बक्षिसे त्या त्या मंडळांच्या अध्यक्षांना जाहिर केली पाहिजेत...
जोपर्यंत जाहिर टीका आणि हेटाळणी होत नाही तोपर्यंत या लोकांना लाजा वाटणार नाहीत..
१-२ लोक बोलुन काही उपयोग नाही... संघटित आणि योजनापुर्वक मोहीम उघडली पाहिजेल...
हे असे व्हावे असे मला फार वाटते मग मी ते इथे लिहतो आणि माझ्या म्हणण्याला कोणकोण अनुमोदन देतय याची वाट पहात बसतो...
आणि २-४ अनुमोदने मिळाली की जसे काही माझे म्हणणे प्रत्यक्षात आले अश्या आनंदात सगळे विसरुन जातो!
नावाखाली
नावाखाली अशी हिडिस गाणी लावुन विकृत अंगविक्षेप करणार्यां मंडळांवर पद्धतशीर टीका केली पाहिजेल...
पण मग बरेच दिवस लपून बसा. जिवाला धोका पोचतो अशी काही टीका केली तर.
जोपर्यंत जाहिर टीका आणि हेटाळणी होत नाही तोपर्यंत या लोकांना लाजा वाटणार नाहीत..
झाली टीका तरी त्यांना लाजा वाटतच नाहीत!
हिडिस गाणी लावुन विकृत अंगविक्षेप
मग सिनेमात काय वेगळे असते? ते तर एकदम प्रसिद्ध होऊन, लोक मुद्दाम चार चारदा बघायला जातात. कोट्यवधी रुपये उधळतात त्यावर!
मायबोलीवर यांचा किती मोठा चाहता वर्ग आहे ते बघाच इतर बातमीफलकांवर जाऊन.
इथे हुसेनच्या चित्रांचे समर्थन करणारे लोक असतात! त्यामानाने गणपति उत्सव काहीच नाही!
आशु, हा
आशु, हा मुद्दा नेहमीच उत्सवांच्यावेळी डोके वर काढतो, थोडावेळ जागा राहतो आणि पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत झोपी जातो. हा मुद्दा समाज जागरुतीशी संबंधीत आहे. सामान्य माणसानेच स्वतःपासुन यासाठी सुरुवात केली पाहीजे. समाजाच्या छोट्या भागाने जरी सुरुवात केली तरी ती एक चांगली सुरुवात ठरु शकते. आणि हा मुद्दा फक्त गणेशोत्सवापुरताच नाही तर नवरात्री, दीवाळी, वगेरे आणि ईतर धर्मियांसाठीसुद्धा आहे. आणि लवकर बदल पाहीजेत तर कायदा बनवुन तो सर्व धर्मियांसाठी बंधनकारक करावा. पण आताच्या काळात वरील सर्व विचारांना बहुतांशी लोक वेड्याचा बाजार म्हणतील. म्हणुन हे सगळ आपण आपल्यापासुनच सुरु करावे जेणेकरुन थोडाफार का होईना बदलाला सुरुवात तरी होईल.
झक्की,
झक्की, तुमचा उपरोध मला कळतोय... तरीसुद्धा...
>>पण मग बरेच दिवस लपून बसा. जिवाला धोका पोचतो अशी काही टीका केली तर.>>
एकदम मान्य आणि म्हणुनच मी म्हणलो पध्दतशीर, योजनाबध्द आणि संघटित!
>>झाली टीका तरी त्यांना लाजा वाटतच नाहीत!>>
तुम्ही रस्त्य्यावर उभे राहुन एकट्याने शिव्या दिल्या तर नाहीच वाटणार त्यांना लाजा... जेंव्हा इज्जतीचा पंचनामा करणारे होर्डिंग लागतील गावभर आणि बातम्या छापतील तेंव्हा सरळ होतील... पुढच्या वर्षी बाहेर पडायचे असते त्यांना वर्गणी मागायला!
कितीही झाले तरी भरकटलेले सामान्य तरुण आहेत ते (निर्ढावलेल्या कातडीचे निर्लज्ज राजकारणी नव्हेत)
>>मग सिनेमात काय वेगळे असत>>
अहो सिनेमा आणि गणेशोत्सवासारखा पवित्र सोहळा यात काही फरक नाहिये का?
तुम्हाला नाचायचय ना ... हवे तेव्हढे अंगविक्षेप करुन नाचा... त्यासाठी आहेत ना डिस्को आणि पब... इथे तुमचे किळसवाणे गुणदर्शन कशाला?
सॉरी झक्की... काय आहे आज मला पण जास्त काम नाहिये हापिसात त्यामुळे...
काय आहे आज
काय आहे आज मला पण जास्त काम नाहिये हापिसात त्यामुळे...
वा वा कोणते हो तुमचे हपिस? पगार भरपूर देतात का? मला अशीच नोकरी हवी आहे. पगार भरपूर, काम कमी!
सिनेमा नि गणेशोत्सवासारखा पवित्र सोहळा यातील फरक आपल्यालाच जाणवतो, समजतो. बर्याच जणांना तो समजत नाही!
त्यासाठी आहेत ना डिस्को आणि पब...
तिथेहि नाचतो ना? तिथे नाचूनच प्रॅक्टिस करतो, गणेशोत्सवासाठी!
चांगला
चांगला मुद्दा!
हे थांबवायच असेल तर एकमेव उपाय म्हणजे चांगल काय हे करुन दाखवा. आणि त्यासाठी शिशु, किशोर वयीन मुलांवर संस्कार करा.
छान आहऑ
छान आहऑ वाट्चाल् कराय ला पाइह़जो बीज पॉरा ऊद्य ऊग वोल
कुठ्ल्याह
कुठ्ल्याहि सामाजिक प्रथा बहुसन्ख्य लोकान्च्या किन्वा दादागिरि करु शकणारयान्च्या जिवावर सुरु रहातात. या बाबतीत तर दोन्हि गोश्टिन्चा प्रभाव आहे. अशा चर्चा करणारे बहुमतात हि नसतात आणि दादागिरित हि. त्यामुळे चर्चा केल्याच्या मानसिक समाधाना पलिकडे यातून काय मिळणार?
changala prashna ahe. hya
changala prashna ahe. hya prashnavar kam karayla sarvanni ekatra yayla paheje. tya sathi pratham maybolikar ekvyala pahije.
satish rane
saiswami1@rediffmail.com
tya sathi pratham maybolikar
tya sathi pratham maybolikar ekvyala pahije.
--- मायबोलीकर एकत्रच/ एकच आहेत, विविधतेत एकता म्हणतात ना तशी.
खूप
खूप महत्वचा मुद्दा प्रकषात आनला आहे आपन.
खरे तर गनपति बाप्पा एवधेच म्हनायाला फार होते.
एवध्य गजराने आन्गात एक विज तयार होते
पन यान्ना सान्गेल कोन?
एवधे मोथाले ध्वानि भिन्न्ति उभ्या करने म्हनजेच मोथ मन्दल
आशि व्याक्या झालि आहे ना अत.
उडत उडत
उडत उडत कानावर आलेले..
व्हॅलेंटाईन डे सारख्या दिवसाला विरोध करुन त्याचे महत्व वाढविणारी भारतीय संस्क्रुती रक्षक मंडळी यंदा म्हणे व्हॅलेंटाईन डे ला लक्ष्य करण्याऐवजी गणेशोत्सव, नवरात्र इत्यादी मंगल उत्सवात जे धांगडधिंगा घालतात.. मंगल गाण्यांऐवजी दंगल गाणी लावतात.. सोमरस पिऊन मिरवणुकीत विक्रुत अंगविक्षेप करतात.. नवरात्रीला नऊ महिन्यात रुपांतरीत करतात.. अशा लोकांना प्रसाद देणार आहेत... (नंतर विचार बारगळला म्हणे.. कारण यातील बहुतांशी कार्यकर्ते यांचेच होते)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विद्युत रोषणाईकडे पैशाची उधळपट्टी म्हणुन न पाहता रोजगाराचे साधन म्हणुन पहा.. महाराष्ट्रात वीज कमी असेल तर ती गणेश मंडळांची नसुन वीज मंडळाची जबाददारी आहे... वस्तुंची मागणी जेव्हढी वाढत जाते.. तेव्हढी आर्थिक सुबत्ता वाढत जाते.. हे साधे अर्थशास्त्र आहे.. उत्सव साजरे करताना बर्याच गोष्टींवर खर्च होतो.. ते फक्त उधळपट्टी म्हणुन न बघता रोजगार निर्मितीचे आणि आर्थिक उलाढालीचे साधन म्हणुन बघा.. (अर्थात म्हणुन स्पीकरच्या भिंती उभ्या करुन चीनच्या भिंतीला आवाहन द्या असा अर्थ अपेक्षीत नाही..)
आणि रोषणाईसाठी एका मंडळाची संपुर्ण गणेशोत्सवात जेव्हढी वीज खर्च होत नसेल.. त्यापेक्षा कितीतरी अधिक तुम्ही लिफ्ट / हिटर / AC वापरल्याने होत असेल असा अंदाज आहे.. कधी लिफ्ट न वापरता जिने चढण्याचा विचार केला आहे का?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाने काही पायंडा पाडण्याची अपेक्षा करणे रास्त ठरणार नाही.. माझ्या माहिती प्रमाणे पुण्यातील मंडळात आपाअपसात बरच राजकारण चालते.. त्यामुळे दगडूशेठ http://www.dagdushethganpati.com/ वर फक्त Guidelines for Mandals आणि Code of Conduct देण्यापेक्षा जास्त कही करु शकेल याबाबत शंका वाटते..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नुसते उत्सवच नही.. तर एकुणच भारतीय समाजाची जी सामाजीक प्रगल्भता आहे.. ती खूप कमी झाल्याची चिन्हं आहेत (ट्रॅफीक सेन्स, रस्त्यावर थुंकणे, कचरा फेकणे इत्यादी).. कदाचीत देश जसा विकसीत होत जाईल.. तशी ही प्रगल्भता वाढत जाईल..
त्यामुळे गणेशोत्सव फक्त एक लक्षण आहे.. मूळ कारणे वेगळीच आहे.. त्यासाठी वरवर मलमपट्टी करुन चालणार नाही.. आधी मूळ कारणं शोधायला हवीत.. चुभुदेघे
Pages