Submitted by संकल्प द्रविड on 11 September, 2008 - 12:29
या वर्षी घरचा गणपती मी घरीच बनवला. इथे सिंगापुरात ऑर्चर्ड रोडावरच्या 'आर्टफ्रेंड' दुकानातून कुंभारकामाची माती घेऊन आलो. ही 'अर्दनवेअर क्ले' शाडू मातीसारखी असेल की नाही याबद्दल साशंकच होतो. पण घरी आणून माती हातात घेतल्यावर मात्र शंका फिटली. गणपतीआधीच्या वीकेंडाला मूर्ती घडवायला घेतली. शनिवारी ३-४ तास आणि रविवारी ६-७ तास बसून मूर्ती घडवली. घडवताना वेगवेगळ्या टप्प्यांवर मूर्तीचे फोटो घेतले. त्यातले काही:








गुलमोहर:
शेअर करा
अरे वा!
अरे वा! मस्तच. फायनल स्टेजपण दाखव न.
आर्च,
आर्च, वरचाच गणपती पूर्ण झालेला आहे.
आणि प्रतिष्ठापना झाल्यावरचा फोटो आहे बघ 'आमचा गणपती' बीबीवर.
खुपच
खुपच सुरेख.
आपल्या हाताने बनवलेला गणपती पुजताना एक वेगळेच समाधान मिळाले असेल ना?
अभिनंदन.
अरे वा! फ,
अरे वा! फ, छानच!
पण उदराचा आकार जरा गरगरीत हवा होता असं मला वाटलं.
खुप छान
खुप छान बनवलाय गणपती .
****************************
व्वा! हे
व्वा! हे स्टेजेसच्या फोटोन्च काम झकास झाल!

मूर्तिवरल्या केसान्च्या बुचड्यामुळे आणि सरळ सोन्डेमुळे मूर्ति, बाली/कम्बोडिया/इन्डोनेशिया वगैरे प्रान्तातली वाटत्ये!
जोक्स अपार्ट, सही बनलीये मूर्ति
...;
आपला, लिम्बुटिम्बु
खुपच छान
खुपच छान बनवला आहे .. तुम्हाला बाप्पाचे डोळे अचुक जमले आहेत त्यामुळे खुप छान दिसतोय बाप्पा..
****************************************
नको काम नको प्रतिक्षा (TP साठी) , सदा TP करु द्यावा हीच अपेक्षा!
फ,
फ, अप्रतिम...
डोळे फारच सुरेख.....:)
फ.. मूर्ती
फ.. मूर्ती मस्त झालिये..
फक्त तिकडे टाकलेल्या फोटोत एक जाणावलं.. डोळे थोडे उग्र झाल्यासारखे वाटतात..
बाप्पांचे डोळे generally शांत असतात... बाकी चुभुदेघे..
खरंच
खरंच अप्रतिम!
आत्ताच
आत्ताच प्रतिष्ठापना झालेल्या गणपतीचा फोटो बघितला .. केळीच्या पानांची आरास मस्तच ..
कौतुक कसं आणि किती करावं हेच कळत नाही ..
बाप्पाच्या डोळ्यांबद्दल adm शी सहमत ..
सुंदर! डोळे
सुंदर!
डोळे, केस, सोंड आणि पितांबर सुरेख जमलाय बाप्पा..
व्वा!!
व्वा!! अप्रतिम...
अरे
अरे व्वा......... खूपच सुबक झालाय रे गणपती !!
फ, खरचं
फ, खरचं तुझं कौतूक करावं तेवढ कमीचं आहे. पण एकदा तरी बोलवायचं ना घरी दर्शनाला इतकी छान प्राणप्रतिष्ठा केली म्हंटल्यावर
पुढल्या वर्षी असलास इथे तर निमंत्रण दे.
सुंदर! मी
सुंदर! मी हे मिस्लं होतं
अरे मी पण
अरे मी पण नव्हतं पाहीलं की हे.. सहीच.
~~~~~~~~~