दूरवरुनी ह्रदयात शिरुनी......

Submitted by nikhil_jv on 10 September, 2008 - 05:33

दूरवरुनी, ह्रदयात शिरुनी
प्रेम कोठे असते कोणी पाहिलेय का?
अथवा ह्रदयाचे ऐकुनी बोल
कोण्या तरुणीस प्रेम आपले वाहिलेय का?

हो! मी पाहिलेय, हो! मी वाहिलेय,
असते प्रेम ह्रदयाच्या ठोक्यात
कधी पानांत, कधी फुलांत
कधी असते वार्‍याच्या झोक्यात

म्हणजे कोण्या सुंदरीस पाहुन
ह्रदय आपले धडधडते
इशारा असतो तो
तिच्या मिलनासाठीच ते तडफडते

भुक नाही, तहान नाही
काय होते आपली दशा
एवढ्यात तिचे 'हो' म्हणणे
प्रफुल्लित करते आपली आशा

तिच्या सानिद्यात राहुन राहुन
जीवन आपले फुलु लागते
ती नसताना तिच्या आठवणीत
मन वार्‍यासोबत डोलु लागते

मिळतो मग जगण्याचा मार्ग खरा,
दुखाचा मग होतो अंत
पण या जगात प्रेमाचीच उणीव
ही मनाला लागुन राहते खंत

अशाप्रकारे प्रेमापासुन मिळणार्‍या
आनंदास तोड नाही
मिष्टान्न असले कितीही चविष्ट
तरी प्रेमापेक्षा गोड नाही

मस्त.

सही.

सही.

धन्यवाद कदरदानो कुछ गलतिया भी बताया करो.....

सानिद्यात असा लिहा- सान्निध्यात Happy

सही जा रहे हो भिडु.. लगे रहो... मस्तच.