संयम आणि मोह

Submitted by निंबुडा on 2 May, 2012 - 05:35

एकच कविता २ वेगवेगळ्या प्रकारे सूचली होती. बघा कोणती जास्त आवडते. दोन्हीतला मूळ आशय सारखाच असला तरी शेवटाकडे एक सूक्ष्मसा फरक आहे. बघा ओळखता येतोय का ते! शीर्षकावरून कदाचित क्लू मिळेल Happy

संयम की मोह?

छे! तुझ्या आठवणी फारच बुवा बदमाष...!
बंदिस्तच केलं मग मी त्यांना
काळाच्या दरवाजाआड....
वरतून घातलं संयमाचं कुलूप!
पण...
पण, चावी मोहाची आहे, त्याचं काय करू?
आता बघायचं कोण जिंकतं?
संयम...... की मोह?

-------------------------------------------------------------------

संयम आणि मोह

छे! तुझ्या आठवणी फारच बुवा बदमाष...!
बंदिस्तच केलं मग मी त्यांना
काळाच्या दरवाजाआड....
आणि मग घेतली संयमाची झूल पांघरून
पण काही चुकार आठवणी बधतच नाहीत
येतातच इवल्याश्या फटीतूनही
सरकत बाहेर...
मोह होतोच मग त्यांना कवटाळण्याचा
घेते मग थोडंसं गोंजारून त्यांना!
(अगदी थोडुसंच हं!)
मग मात्र देते जबरदस्तीने परत धाडून
फटीतूनच सावकाश...
पण तुझ्याच आठवणी त्या!
तुझ्याइतक्याच बदमाष!
फटीआडूनही मिश्किल डोळ्यांनी डोकावतच राहतात
मग मात्र पुन्हा घेते संयमाने पाठ फिरवून!
आता....
असाच चालू रहायचा हा खेळ निरंतर..
कधी संयमाची सरशी
तर कधी मोहाची जीत!
..
.
.
चालायचंच!

हीच कविता नंतर अष्टाक्षरीतही लिहून इथे टाकली आहे.

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित

गुलमोहर: 

सु रे ख !!

मला दोन्ही आवडल्या...
फरक असा वाटला:
१ल्या कवितेत संयम किंवा मोह या पैकी एकाचाच विजय होऊ शकतो.
२र्‍या कवितेत कधी संयम तर कधी मोह जिंकतो Happy

दोन्ही कविता सुपर.
ज्यांना रेसिपीज पाहून स्वतः पदार्थ बनवायला आवडतं त्यांच्यासाठी पहिली, तर ज्यांना तयार पदार्थ समोर हवे असतात त्यांच्यासाठी दुसरी कविता योग्य.

वरतून घातलं संयमाचं कुलूप!
पण...
पण, चावी मोहाची आहे,

क्या बात है! मस्तच.
कविता आवडली.

दोन्ही मस्तं.. Happy

घेते मग थोडंसं गोंजारून त्यांना!
(अगदी थोडुसंच हं!)>>>> थोडुसंच.. कस्ला गोड वाट्टोय हा शब्द.. Happy

मला उगाचच परिक्षेत १ ला नंबर आल्यासरखं वाटतय >>>
हा हा हा Biggrin

अशी परीक्षा जिला तुम्ही एकटेच बसला होतात. बाकी नुसते परीक्षाकेंद्रावर येऊन डोकावून गेलेत आणि प्रश्नपत्रिकेचे कौतुक करून गेलेत Biggrin