शरीरात आत्मा असतो का?

Submitted by परमात्मा on 24 April, 2012 - 00:50

प्राणिमात्रांच्या शरीरात आत्मा असतो असे म्हणतात.असे मानले जाते कि प्राण्यांचा मृत्यु झाल्यानंतर आत्मा बाहेर पडतो. आत्मा ही संकल्पना अनेक धर्मांमध्ये, पंथांमध्ये आढळते. ईथे आत्मा म्हणजे भूत, मुंजा ,पिशाच्च वगैरे अभिप्रेत नाही.जाणिवांचे केंद्र असा अर्थ अभिप्रेत आहे. मनुष्याच्या जाणिवांचा उगम मेंदुत आहे असे मेडिकल सायन्स मानते. न्युरोसायन्स ही एक वैद्यकीय शाखा जाणिवांच्या अभ्यासासाठी आहे. जाणिवांचा उगम खरच मेँदुत आहे का? कि आत्मा हाच सजिवांना संचलित करत असतो? आत्म्याचे स्वरुप नक्की काय आहे? जर आत्म्याला डायमेनशन्स नसतील तर तो का मानावा?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अयशस्वी पुरुष अनेक स्त्रियांच्या मागे असतो
---- यातील किमांन एक तरी त्याला यशस्वी बनवण्यासाठी त्याच्या मागे ठाम पणे राहिल या अपेक्षेने (आशेने).

यातील किमांन एक तरी त्याला यशस्वी बनवण्यासाठी त्याच्या मागे ठाम पणे राहिल या अपेक्षेने (आशेने).>>>> तरीही निराशेची/अपेक्षाभंगाची शक्यता नाकारता येणार नाही कारण एकीला वाटेल दुसरी, अन दुसरीला वाटेल तिसरी ठाम राहील. Happy

आता मी सर्वोच्च स्थानी आहे. आता मी जगनियंता आहे Lol चला नमस्कार करा. नाहितर शाप मिळेल आणि पुढचे हजार जन्म किडा म्हणुन जगावे लागेल. Wink

वंध्यत्वाच्या धाग्यावरच्या तुमच्या पोष्टी तुम्ही संपादित केल्या म्हणे? तंतरली का? बरे केलेत संपादित केल्यात ते. मुळात अशी भाषा अशा महत्वाच्या धाग्यांवर नकोच.

बरे, तुमचे स्थलांतर येरवडा मनोरुग्णालयात करण्याची वेळ झाली आहे.

१००

मी काही संपादीत करत नाही ते काम चित्रगुप्ताचे असते Wink

येरवडा हॉस्पीटल >>
जळी स्थळी काष्ठी पाषाणी मीच आहे. कुठेही ठेवा. Lol

> कि आत्मा हाच सजिवांना संचलित करत असतो?
तसे असेल तर आत्म्याला संचलीत करण्याकरता मेटाआत्मा लागेल.

मुर्खांना भुत दिसते. महामुर्खांना आत्मा दिसतो..
आता तुम्हीच ठरवा तुम्ही कशात येतात Lol

Proud

योग :).

त्या लेखातच म्हटले आहे की त्या पार्टीकलने (खरच सापडला असेल तर) जितके प्रश्न सोडवले तितकेच नवीन प्रश्न उभे केले. तेंव्हा प्रवास संपला नाहीये Happy

हा सॉ कॉल्ड गॉड पार्टिकल म्हणजेच "आत्मतत्व" का? जाणकारांनी प्रकाश टाकावा..>>>>काय समजायचे ते समजा, डीएनए म्हणजे कुंडलीनी शक्ती आहे असे काहीजणांना वाटते ,समजायला काय जातयं. Proud

ग्रेट थिंकर, तुम्ही असे हिंदु तत्वज्ञानाला विरोध करता म्हणून तुम्ही, मी आणि जामोप्या एकच आहोत असे सर्वजण समजतात.

Proud

प्रत्येक निषेधार्ह कमेंटचा स्क्रीनशॉट घेऊन ADMINकडे तक्रार करावी हेच उत्तम. ईथल्या एका बहाद्दराने ईब्लिस यांचा धसका घेऊन विपु बंद करुन टाकली आहे ,कारण इब्लिस यांच्या पुराव्याने त्याची बोबडी वळाली होती.

आज पर्यंत आत्म्याबद्दल तपासणी म्हणून केलेले सर्व प्रयोग सपशेल फसलेले आहेत,यातच सर्व काहि आलं... ज्यांना या विषयावर अभ्यासपूर्ण मत हवं असेल,त्यांनी ज्योतिबा क्रिएशन्सनी प्रकाशित केलेली (२००४ साली पुण्यात झालेली प्रा.शाम मानव यांची ) व्याख्यानमालेची व्हिडिओ सि.डी.पहावी... आणी ४ वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं...डॉ.प्रदिप पाटील यांचं---मेंदूची अत्यंत सोप्या पद्धतीनी माहिती देणारं ''डोकं कसं चालतं'' हे पुस्तक वाचावं.... Happy

अत्रुप्त आत्मा,

>> आज पर्यंत आत्म्याबद्दल तपासणी म्हणून केलेले सर्व प्रयोग सपशेल फसलेले आहेत,

हे जरी खरं धरलं तरी पुनर्जन्माची कितीतरी प्रकरणं उघडकीस आलीयेत त्यांचं काय?

आ.न.,
-गा.पै.

हे जरी खरं धरलं तरी पुनर्जन्माची कितीतरी प्रकरणं उघडकीस आलीयेत त्यांचं काय?

आत्मा नसतोच. त्या केसेस एक्सेप्शनल आहेत. प्रत्येक नियमाला एक्सेप्शन असतात नै का?

गामा पैलवान हे गामा_पैलवान झाले, हाही पुनर्जन्मच मानायचा का?
>> आंबा, जामोप्या... -> शेळी -> ताई -> आंबा हा सिक्वेन्स ऑफ पुनर्जन्म, निदान तुमचा तरी विश्वास हवा होता. Proud

त्या केसेस एक्सेप्शनल आहेत. प्रत्येक नियमाला एक्सेप्शन असतात नै का? >> एक्स्प्लेन करता का थोडं?

ओ नानबा.
आंबा, जामोप्या... -> शेळी -> ताई -> आंबा हा सिक्वेन्स ऑफ पुनर्जन्म
ह्येच तर एक्सेप्शन हाये.
काय तुम्ही! इत्कं शिम्प्ल सम्जेना व्हय?

Pages