गलगले निघाले

Submitted by साजिरा on 5 September, 2008 - 00:00

'चित्रपट कसा वाटला' इथले या चित्रपटविषयीचे लेखन व प्रतिक्रिया स्वतंत्र धागा बनवून इथे हलविल्या आहेत..
--
भरतचा 'गलगले निघाले' बघितला.
भरतच्याच 'सही रे सही' या नाटकाचे 'गलगले' हे स्वतःशीच बोलणारे पात्र हेच या सिनेमाचेही मुख्य पात्र. नाटकातले गलगले जितके खरे अन धमाल उडवणारे वाटले होते, तितकेच नाटकी या सिनेमातले गलगले वाटतात. एक दोन प्रसंग सोडले, तर मनापासून हसू कुठे येत नाही. इंनोसंट गलगले दाखविण्याचा प्रयत्न मोजक्या ठिकाणी यशस्वी झाला असला, तरी बर्‍याच ठिकाणी कंटाळ्वाणा, तर काही ठिकाणी हास्यास्पदही वाटतो..

भरत जाधव हळूहळू मोनोटोनस होत चालला आहे. तीच गोष्ट केदार शिंदेची.
केतकी थत्ते ही या सिनेमाची नायिका. (हे नाव लक्षात नव्हते, ते नंतर कळले. तिनेच चित्रपटाला अर्थसाह्य केले असावे म्हणून ती हिरॉइन असावी, अशी शंका घ्यायला पुरेपुर जागा आहे.) मोजक्या अशा काही फ्रेम्समधील अभिनय व मध्यंतरानंतरचे नृत्य सोडले तर तिने निराशाच केली आहे.

'दे धक्का' पासून सिद्धार्थ जाधव कडून अपेक्षा वाढल्या होत्या, पण इथे साफ निराशा. केदारनं त्याला व्हिलन बनवून हसं करून घेतलंय. तो 'कॉमेडी' करण्यासाठी व्हिलन बनवलाय असं शेवटपर्यंत वाटत राहातं.

रमेश देवांचा अंडरवल्डचा 'मल्हारराव' झोकात आहे. ही गुन्हेगार मंडळी आपापसात कोळी भाषा बोलतात, तेवढं एक नाविण्य..
पहिलं अन मध्यंतरानंतरचं अशी दोन गाणी अनूक्रमे श्रवणीय अन बघणीय आहेत.
बाकी भरतच्या चाहत्यांनी, इतर दुसरा कोणताच बघायचा राहिलेला नसणार्‍यांनी अन मराठी पिक्चरला 'मदत' करण्याच्या दृष्टीने बघण्याची औपचारिकता पार पाडायची असलेल्यांनी (उदा. मी) जरूर बघावा.. Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गलगले मधे केतकी थत्ते हिर्वीण आहे...
एकेकाळी चांगली दिसायची... परवा झी ऍवॉर्ड्स मधे पाहिलं... महिला (जयवर्धने नाही) दिसतेय....

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट

पण तिनेच चित्रपटाला अर्थसाह्य केले असावे म्हणून ती हिरॉइन असावी, अशी शंका घ्यायला पुरेपुर जागा आहे.>>>>>>>>>.
Lol

साजिरा बरोबर आहे. भरत आणि केदार शिन्दे मोनोटोनस होत चालले आहेत.
अरे तुच का तो "अगबाई अरेच्च्या" वाला केदार अस ओरडून विचारावस वाटल होत "जत्रा" पाहताना.
भरत जाधवच्या "सही रे सही" विषयी खुप ऐकल होत. "पछाडलेला" मध्ये तो चटचट भुमिका आणी टोन बदलुन बोलताना पाहुन मज्जा वाटली होती.
त्यावेळी मनात आल होत की ह्याला चित्रपटात का घेत नाहीत. आता वाटत ह्याला चित्रपटात का घेतात.

.............................................................
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband! Sad :p

मला तर वाटतं, भरत जाधव ला उगाचच डोक्यावर चढवून ठेवलंय.. असं काsssही विशेष करत नाही तो.. लक्ष्यानंतर आता कोण??? असं वाटत असतानाच त्याची मराठीत एंट्री झाली हे त्याचं सुदैव.. आणि आपलं.. !! प्रेक्षकांना जरा काही वेगळं आणि फालतू टाईमपास करणारं मिळालं की झाला लगेच उदो उदो सुरू. मग का नाही बरं श्वास मधल्या नलावडे, अश्विनला, किंवा डोंबिवली फास्ट वाल्या संदीप कुलकर्णीला अशी प्रसिध्दी मिळाली??? फालतू गोष्टी आयत्या मिळतात आणि गरजेच्या गोष्टी मिळवण्यासाठी घाम गाळावा लागतो तसंच आहे ना हे??
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नको दंड नको शिक्षा , शांत मंगलमय गणेशोत्सव हीच अपेक्षा! Happy

ती केतकी थत्ते आहे होय??'
अँकी, ती महिला नाही, महामहिला दिसते. कळस माहितीये? तिची एंट्री म्हणजे- कॉलेजात मैदानावर शॉर्ट घालून कबड्डी खेळताना. आत्ता बोला. (आता यासाठी तरी सिनेमा बघणार की नाही?? :p)
झकासा, 'जत्रा' हा सिनेमा 'गलगले निघाले' पेक्षा दसपटीने बरा आहे..!!
आशू, भरत जाधव खरंच गुणी कलाकार आहे. पण मराठी कलाकारांच्या हातात 'आपण स्वतःला कोणाकडे सोपवायचं' हे नसतं हे दुर्दैव. शिवाय त्याचं ते सारखं 'दातांच्या शुभ्र कळ्या दाखवणं' अती झालंय.
तो केदार ही आत्ता पर्यंत चांगला होता. त्याला काय चावलं कुणास ठाऊक?

आईग, जत्रा गलगले पेक्षा बरा म्हणजे गलगले न बघणच शहाणपणाच ठरेल. Happy

सही रे सही मी पण पाहिलय आणि निदान त्या दिवशीच्या प्रयोगात भरत जाधव चा गलगले अप्रतीम होता.. खरे तर त्याचे पुर्ण कामच त्या प्रयोगाला इतके जमले की मी तरी त्याला साष्टांग नमस्कार (मनात) केला. तेव्हापासुन मला भरत जाधव बद्दल आदरच वाटतो.. (मी त्याचे जास्त सिनेमे,नाटके पाहीली नाहीयेत). अजून जास्त- त्या दिवशी सकाळी माझी वहिनी माझ्या ८ वर्षाच्या भाच्याला घेऊन एका दूकानात गेली जिथे भरत जाधव खरेदीला येणार होता असे कळले (भाच्याचा आवडता कलाकार आहे ना Happy ) आणि भरत जाधव त्या दोघांशी पण (कुठले कोण असे न समजता) खूप चांगले, नम्रपणे बोलला म्हणे. असो.

मला असे वाटते की भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे हे दोघे ही फालतु चित्रपटात (तेही भरमसाठ संख्येने) काम करून स्वत:ला कंटाळवाणे करून ठेवत आहेत. हिंदी मध्ये गोविंदाचे जसे झाले तसे या दोघांचे होइल असे वाटते. एके काळी चित्रपट चालतात म्हणून गोविंदाने एकामागून एक एकसाची चित्रपटात काम करायला सुरूवात केली. मला वाटते, आंखे हिट झाल्यानंतर.... काही वर्षात लोक त्याला कंटाळले.

भरत आणि मकरंद यांनी चित्रपट निवडतानी थोडे चूझी व्हावे, असे वाटते.

अमीशी एकदम सहमत.... मी तर आतापासुनच ते दोघे आणि सोबत सिद्धार्थ असला की टाळतेच...

गलगले पण पाहावासा वाटत नाही. 'पछाडलेला' पाहुन भरतकडुन खुप अपेक्षा वाटलेल्या, पण पुढे निराशा झाली. जत्रा, यांचा काही..., छे वाटच लागली सगळी. त्यातल्या त्यात 'माझा नवरा, तुझी बायको' बरा होता. भरतचं कामही खुप आवडलं त्यातलं. थोडं गंभीर वळणाचं होतं.

पण बाकी सगळा आनंदच आहे.. त्याने स्वतःच हे समजुन घ्यायला पाहिजे.

खरं तर भरतच्या सर्व सिनेमांपेक्षा 'सही रे सही' नाटक चांगलं आहे. मराठी कलाकारांना चॉईसला वाव नसतो तसा, पण भरत चॉईस करू शकतो. (कसाही का असेना, पण आघाडीच्या कलाकारांत असल्यामूळे). ते त्याने करायला हवं.
पण कर्तव्य म्हणून मी सगळे मराठी (भरतचेच असं नाही, तर सगळे. स्वामी माझे दैवत- वगैरे सोडून!) सिनेमे बघतोच. Sad

ही केतकी थत्ते कोण? कोणत्या सिरियल मध्ये होती का ती? नाव ऐकल्यासारखे वाटते आहे.

ही केतकी थत्ते कोण?>>>>>
वादळवाट मधली श्रावणी (पहिली)

केतकी सध्या 'मंथन' नावाच्या मालिकेत शुभांगी गोखले यांच्या मुलीचं काम करते..

मनी...

ती नव्हे ही.... ही आभाळमाया मधली अक्षता (दुसरी का.. तिसरी?)

भरत जाधव बाबतित बोलायचं तर...

भरत नी आयुष्यात 'सही रे सही' केलं....
भरत नी आयुष्यभर 'सही रे सही'च केलं....

_______
फिल्लमबाजाच्या मनात थिएटर
आणि
खवैय्याच्या मनात रेस्टॉरंट

<<गलगले मधे केतकी थत्ते हिर्वीण आहे...

ओह! ती केतकी थत्ते आहे!!!? लहानपणी क्यूट दिसायची
एक मराठी सिरीयल लागायची त्यात ती होती

अरे भरत चे ऑल दी बेस्ट विसरलात का? तिथूनच तो पुढे आला खर्‍या अर्थाने... काय उच्च नाटक आहे..

    ================
    गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया !!

      कॉमेडीचा एक फॉर्म्यूला हिट झाला म्हणून तोच वापरून पिक्चर काढणं म्हणजे टू मच झालं. नाविन्य काही नाहीच मिळत का लेखकांना, निर्मात्यांना??? आणि 'झी टॉकिज' चे असे १५ पिक्चर दोन की चार वर्षात येणार आहेत, तेव्हा त्याची क्वालिटीही अशीच यथा-तथाच असणार...

      साजिरा,
      ती केतकी अर्थसाह्य करण्याइतकी मोठी नाहीये... पैशानेही आणि वयानेही.... त्यामुळे जो काही दोष असेल तो दिग्दर्शकाचा असेल.. मुळात तिला भरत जाधवसाठी हिरॉईन निवडण्याचं कारणच नाही कळलं... ती २६ वर्षांची आणि भरत चाळीशीचा... ती लहानपणी खुपच नाजूक होती, पण त्या डान्समध्ये नऊवारी साडीत खरंच महिला दिसते.... टीव्हीवर प्रोमोज पाहूनच हा पिक्चर कांटाळवाणा वाटतो.... कोणी फुकट तिकिट दिलं तरी मला बघावासा वाटणार नाही.

      केतकी अजूनही नाजूकच आहे Happy
      तिचा आता एक हिंदी चित्रपट येतोय.. त्यात खूप छान काम केलं आहे तिने..

      हि केतकी थत्ते, सुहिता थत्ते ( अवघाची संसार मधली अम्रुता सुभाष ची आई) ची मुलगी आहे बहुदा.

      केतकी आणि सुहिता थत्ते यांचा संबंध नाही.

      प्लीजच...
      केतकी सुहिताची मुलगी नाही
      आडनाव सेम असलं की प्रत्येक वेळेला नातं जोडलंच पाहिजे असं नाही हो!!
      -नी
      http://saaneedhapa.googlepages.com/home

      केतकी अजूनही नाजूकच आहे >>>>
      हो रे. कुठल्याशा सीरियलीत ई-मराठीवर दिसली.
      मग मी बायकोला बोल्लो बघ ही आधी कशी छान होती. आणि त्या गाण्यात बघ.
      त्यावर बायकोने मला सांगितले की ती अजुनही तशीच आहे. फक्त त्या गाण्यात तिची साडी तशी आहे.

      कुठली म्हणे ही सीरीअल...?

      आणि जर ती अजुनही नाजुक दिसत असेल तर गलगले निघाले बघायला पाहिजे...

      (डोळा मारणारा स्माइली)

      _______
      नमस्ते लंडन

      बेकारे ती सिरीयल.
      सुहिता नी राधिकासाठी बघितली एक दोन दिवस.
      अर्थात कुठल्या सिरीयल्स बेक्कार नसतात..
      -नी
      http://saaneedhapa.googlepages.com/home

      मला केतकी असलेल्या सीरिअल चं नाव हवं होतं....

      _______
      नमस्ते लंडन

      अंकूर,
      'मंथन' हे केतकी असलेल्या सिरीयलचं नाव आहे.

      केतकी थत्ते लहानपणी 'दूरदर्शन' वर संध्याकाळी साडे सातला लागणार्‍या 'बोलाची कढी अन बोलाचाच भात' या सीरीयल मधे होती. विनय आपटेची सीरीयल. त्यात प्रदीप वेलणकर तिचे वडील असतात आणि बहुतेक सुनील बर्वे भाऊ. त्यात ती खरंच गोड दिसायची.
      *~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~**~*~*~*~*~*~*~*
      आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा....
      Happy

      हितगूज दिवाळी अ.न्काच्या तारा.न्कित विभागात केतकी थत्ते चा जो फोटो आहे त्यातही ती गोड दिसते....

      _______
      स्वस्थ खा आणि मस्त रहा !

      मी गलगले पाहिला मला त्यात हिरोइन कोणती होती तेच समजलेले नाही.. Proud