अबब!!! मायबोलीवरील लांबलचक पोष्टी!

Submitted by हर्ट on 18 April, 2012 - 04:29

अलिकडे मायबोलीवरील लांबलचक पोष्टींचे लिखाण वाढतच चालले आहे. लोकांना इतका वेळ आणि उत्साह कुठून येतो कळत नाही. लांबलचक पोष्टी लिहिणार्‍या बहुतेकांच्या पोष्टी वाचून वेळ वाया गेला असे वाटायला लागले कारण फारच थोडे जण लांबलचक लिहून महत्त्वाचे लिहितात. जी लोक नेहमी अशा पोष्टी लिहितात त्यांना हे कळत नाही का की ते इतरांचा आणि स्वतःचा किती वेळ नष्ट करत आहेत? एक पाच-दहा ओळीत आपले मत मांडता येत नाही का? जर इतके मोठमोठे उतारे मत आणि भावना व्यक्त करण्यासाठी जर इथे कुणी अभिप्राय म्हणून लिहित असेल तर ती व्यक्ती नक्की लेखक होण्यास पात्र आहे असे समजून त्यांनी मायबोलीवर साहित्य लिहावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> जी लोक नेहमी अशा पोष्टी लिहितात त्यांना हे कळत नाही का की ते इतरांचा आणि स्वतःचा किती वेळ नष्ट करत आहेत? <<<
ते लोक अन त्यान्च्या पोस्टी दाखव, लिन्का दे, म्हणजे मग प्रेमाने समजावुन सान्गता येईल, नै का? Wink

मायबोलीवरही एक आवरा नावाचे पान काढावे अन तिथे ह्या असल्या लेखांच्या लिन्क्स जतब करुन ठेवाव्यात म्हणतो Rofl

यात मायबोलीवरही मधील ही चा संदर्भ काय बुवा?

>>> फेसबुकवर आहे असे एक पान जिथे "आवरा" क्यॅटेगरीतले जोक्स येत असतात Happy

>>> आणि भांडू नये असे मायबोलीकरांना सांगणारा तू शूरवीरच म्हणायला हवा ! <<<< Lol
कुठ कोणं भान्डतय? तुम्च आपल कैतरीच हा दिनेशभौ !
बाकी या शूरवीर प्रश्नवीराचे रुपान्तर सुचनासुर्‍यात कसे काय झाले बोवा? Wink Proud

लिंबूभौ, या मजेमजेच्या धाग्यावरही माझा अनुल्लेख करताय याचा अर्थ तुमच्या मनात वीष (की विष) नक्कीच भरलेले आहे

(हघे)

शीर्षकही 'आवरा'च देऊ

>>> नको . परवाच " बेफीकीर" नावाची एक कविता आली होती त्यावर मी "आवरा Rofl " इतका छोटासा ( बी प्लीझ नोट द पॉईट) प्रतिसाद दिला होता ... तो ३ मिनिटात डीलीट झाला Proud

Uhoh

पुढील चर्चेआधी सर्कारी दारिद्र्यरेषेसारखी माबोवरची कल्पनादारिद्र्यरेषा स्पष्ट करावी. म्हणजे किती ओळींपुढची पोस्ट ही लांबलचक समजली जाईल याचे निकष कळाले तर बरे होईल Happy

१. पोस्ट वाचताना स्क्रोल करावे लागणे.
२. अर्धी पोस्ट वाचल्यावर पुन्हा वर जाऊन कोणी लिहीले आहे या शंकेचे निरसन करावे लागणे.
३. मधे झोप लागणे. जाग आल्यावर हे आपण काय वाचत होतो ते जाम न आठवणे.
४. नवीन पोस्ट आहे असे समजून शंभरएक ओळी वाचल्यानंतर ">>>>" हे सापडणे, म्हणजे आत्तापर्यंत महत्प्रयासाने वाचलेली पोस्ट ही आधीच्या दुसर्‍याच कोणाच्यातरी पोस्टीचा संदर्भ होता हे लक्षात येणे.
५. आख्खी पोस्ट वाचून झाल्यावर मग थोड्या वेळाने पुन्हा "१ नवीन" पाहून बघायला गेल्यावर तीच पोस्ट पुन्हा दिसणे. व या शंभर वाक्यांतून बदललेला शब्द किंवा अक्षर कोणते असावे असा प्रश्न पडणे.

हे माझ्या दृष्टीने असलेले निकष Happy

फारेण्डा !!! ;-०
स्वहस्ताक्षरात पोस्टी करायची सोय पाहिजे बॉ. म्हणजे हस्ताक्षरावरून स्वभाव, पेशा,
भविष्य तर सोडाच, लिंग पण ओळखता येईल.
वाचूनही, अक्षर लागले नाही, असेही म्हणता येईल.

नै ओ बेफिकीर, अनुल्लेख नैये करत. तो मक्ता वाडकर्‍यान्कडे अस्तो.
उदय, हो हो, माझ्यावर अन्याव नको व्हायला,
अन या बी ला लिहायला काय जातय? म्हणे मोठ्या पोस्टि, वेळ वाया जातो.... कैच्याकैच! Proud

बी.., तुमचे टोपण नाव जरी बी असले तरी तुम्ही बिग बी नक्कीच नाही. तुम्हाला जर का लांबलचक पोस्टी वाचायचे नसेल तर कृपया वाचू नका, पण उगाच लोकांना चावू नका. (सल्ला हा प्रेमाचा आहे). क.लो.अ.ही.वी.

अरे वा..आज सगळ्यांना भरपूर वेळ आणी उत्साह आहेसं दिसतोय्..इकडे पोस्टी टाकायला..
(इन्क्लुडिंग मी!! Happy )

बी, आता 'फॉर अ चेंज' तुला नक्की कोणत्या धाग्यावरच्या कुणाच्या पोस्ट बोचताहेत ते सांग पाहू,
कुण्णी कुण्णी भांडणार नाही!!!!

आगाऊ +१

म्हणजे किती ओळींपुढची पोस्ट ही लांबलचक समजली जाईल याचे निकष कळाले तर बरे होईल
----- या बाफ वर सर्वात लांबलचक पोस्टचा आतापर्यंतचा मान फारएण्ड यांना जातो.

या बाफ वर सर्वात लांबलचक पोस्टचा आतापर्यंतचा मान फारएण्ड यांना जातो.
>>

उदय, बी यांच्या मते दोष फारेन्ड यांना जातो, मान नव्हे

Pages