आयपीएल - ५ (२०१२)

Submitted by स्वरुप on 30 March, 2012 - 06:34

आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.

मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....

हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे

संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा

संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल

संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर

संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड

संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे

संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो

संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अ‍ॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी

संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स

आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयपीएलच्या जाहिराती आवडल्यात.
प्रत्यक्ष आयपीएल मी कमी पाहतो. शेवटच्या काहि मॅचेस फक्त. Happy
ह्यावेळी फक्त पुण्यालाच सपोर्ट. Happy

>>पण जर तो खेळला तरच
म्हणजे?..... त्याला काय झालय न खेळायला?

आपापल्या शहराच्या संघाने केवळ खेळाडू म्हणून पण नाकारलेले द्रवीड आणि गांगुली जुन्या संघांच्या फ्रेंच्याइजींच्या नाकावर टिच्चून आज दुसर्‍या संघांचे कॅप्टन आहेत Happy
निम्मे बंगलोर आणि कोल्कता राजस्थान आणि पुण्याला सपोर्ट करणार!

आपला हुकमी एक्का "मुंबई इंडियन्स"

माझ्या सपोर्टसाठी सर्व संघानी बोली लावावी ! नाहींतर सगळ्या संघांच्या खेळाला आणि खेळाडूना मीं इथं बोल लावत बसणार !!! Wink

महागुरु,
चेन्नईला मुंबई आणि बंगलोरची टफ फाईट असेल!

>>नाकावर टिच्चून आज दुसर्‍या संघांचे कॅप्टन आहेत
खर म्हणजे गांगुली युवी नसल्यामुळे कॅप्टन आहे आणि द्रवीड वॉर्न रिटायर झाल्यामुळे!

द्रवीड खर म्हणजे मागची आयपीएल मस्त खेळला... एकदम बिनधास्त.... यावेळी कॅप्टन्सीमुळे कोषात गेला नाही म्हणजे मिळवलं

<< ह्यावेळी पण चेन्नई सुपरकिंग्स जिंकणार >> 'पुणे वॉरिअर्स'ला दुर्लक्षून चालणार नाही कारण 'माबो'वर तरी जोरदार पाठींबा असणार त्याना ! आणि, 'माबो'ने सपोर्ट केलेले सिनेमासुद्धा कशी यशस्वी घोडदौड करतात तें पाहिलंय आपण !! Wink

भाऊ,
माझ्यामते पुणे वॉरिअर्स बॉटम ३ मध्ये असेल

अंदाज:
टॉप३: चेन्नई, मुंबई, बंगलोर
नेक्स्ट३: कोलकत्ता, दिल्ली, राजस्थान
बॉटम३: पंजाब, पुणे, डेक्कन(हैद्राबाद)

<< माझ्यामते पुणे वॉरिअर्स बॉटम ३ मध्ये असेल >> स्वरुपजी, मी स्माईली टाकली अहे ती पहायची राहिली वाटतं तुमची !! Wink

मुंबईची टिम खूप balanced वाटतेय. They have done some smart buys in KKD, RP Singh'Levy, Prasad and Ojha. Effectively they have enough pool of capable domestic players to support 4 T-20 specialists. It will be interesting to see what transpires now with Bhajji leading the side.

IPL च्या performance वर टेस्ट टिम निवडण्याची आपली दिव्य परंपरा लक्षात घेता द्रविडच्या रिकाम्या स्थानासाठी नंबर लावण्याची संधी रोहित शर्माला आहे. रैना जर परत पेटून खेळला तर धोनीच्या support च्या जोरावर तोहि येउ शकतो. बाकी बद्रिनाथ, मनोज तिवारी, राहाणे, पुजारा ह्यांची वर्णी लागायची संधी कमी दिसते.

जर MI IPL जिंकले नि भज्जीने चांगली बॉलिंग केली तर भज्जी परत येणार का ? captain म्हणून Lol

>>Bhajji leading the side
म्हणजे?.... तेंडल्या आहे ना कॅप्टन?

म्हणजे?.... तेंडल्या आहे ना कॅप्टन? >> माबो वर TP करू नकोस, IPL च्या बातम्या ऐक Lol

सचिन captainship बाबत कमनशिबी आहे हेच खरे, भज्जीच्या captainship खाली champions league जिंकू असे भज्जीलासुद्दा वाटले नसेल

आपला सपोर्ट (दरवर्षीप्रमाणेच) मुंबईला. Proud

यंदा स्टेडियममधे मॅचेस बघणे मात्र मिस करेन. सगळ्यात मस्त अनुभव असायचा तो.

कित्येक माननीय पत्रकार प्रेस बॉक्समधे आम्हाला एक्स्पर्ट कमेंट्स ऐकवायचे. Happy

<< कित्येक माननीय पत्रकार प्रेस बॉक्समधे आम्हाला एक्स्पर्ट कमेंट्स ऐकवायचे. >> नंदिनीजी, एक्सपर्ट कॉमेंटस इथं मिळतील तशा जगात कुठेच नाही मिळणार तुम्हाला ! डरो मत, हम है ना !! Wink

पुण्याची तीम जिंकायलाच हवी.
थांबा "दादा"नाच फोन करतो. पुण्याकडे दोन "दादा" आहेत आता आमचीच टीम जिंकणार. Wink

>>पुण्याकडे दोन "दादा" आहेत Happy

च्यायला भज्जीच्या कॅप्टन्सीखाली चॅम्पियन्स लीग जिंकली म्हणून सचिन‍ऐवजी भज्जी कॅप्टन Sad
सचिनला कर्णधारपणाचे दडपण नकोय वगैरे सगळी सारवासारव वाटतीय!

<< सचिनला कर्णधारपणाचे दडपण नकोय वगैरे सगळी सारवासारव वाटतीय! >> स्वरुपजी, तसं नसावं. कांऊंटीचं कप्तानपद स्वतःला मिळावं हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून बॉयकॉटने पूर्वीं खूप वाद घातला होता व त्यातून खूप कडवटापणाही निर्माण झाला होता; वयाच्या उत्तरार्धातली मला बॉयकॉटची एक मुलाखत आठवते, ज्यात तो म्हणाला होता, " माझ्या आयुष्यातला तो एक मोठा मूर्खपणा होता; शेवटी, मी इंग्लंडमधल्या एका छोट्या कांऊंटीचा कप्तान होतो हेच संदर्भहीन होईल व मीं जागतिक दर्जाचा एक चांगला फलंदाज होतो हेच माझ्या आयुष्याचं सार उरेल !". मला वाटतं जें बॉयकॉटला इतक्या उशीरां समजलं, तें सचिनला खूपच आधीं उमगलं, इतकंच !!

Pages