केंव्हा?

केंव्हा?

बंडुची बंडी
बंडीची गुंडी
गुंडीचा दोरा
थोडासा पिवळा, थोडासा पांढरा
टोक धरून हाती, धावत सुटला ......

आकाशाचा किरमिजि तुकडा
मेंदीच्या पानांची वेलबुट्टी
बुचाच्या फुलांची वेणी
लांबलचक बांधून शेपटी
पतंग मनसोक्त उडवला .....

ढगांच्या काळजातली स्वप्ने
टपकली होऊन पागोळ्या
धुरकट तावदाने
फिस्कारल्या चारी ठाव रांगोळ्या
कोकणच्या राजाला अंबारीत बसवला ........

पुळणीवरची ओलीकच्च वाळू
पावलांचे खोल बसके ठसे
तिरतिरणारा पिट्टु खेकडा
नांगीला त्याच्या बांधून दोरा
खंवट मास्तरांच्या धोतरांत सोडला .......

खरच का घडलं होतं हे सारं?
केंव्हा?
काल? की कधीच नाही?

-बापू करन्दिकर.
०४ सप्टेंबर २००८.


स्मित छाने!



मस्त रे स्मित



खुप आवडली...



बापु, लहान झालो बघा.



सर्वाना धन्यवाद! कौतुक शिरोडकराना विशेषकरून. माझ्या एका मित्राने मला मेल पाठवून कविता आवडल्याच तर कळवलच पण एक प्रश्नहि विचारला, " ह्या कवितेतल्या चार कडव्यामधे काही विशेष सम्बन्ध आहे का?" कदाचित हाच प्रश्न आणखीहि कुणाला पडण्याची शक्यता आहे. म्हणून त्याला मी पाठवलेल उत्तर इथे टाकतोय.
'kemvha'
Glad U liked it.

We know that children have very fertile imagination and that they love to get lost in their own world, which is full of childish fancies or fantacies.

This was an attempt to portray some of those fantacies, which are related to everyday events & objects - nothing to do with demons, princes, magic-carpets or fairies. Just simple & clean fun!

Children get so intensely involved in their own fantacies that quite often, they almost come to believe that those are not just imaginary events but 'real' incidents, which actually happened.

At last [and alas] when they grow up and accidentally recall their own childhood fantacies, those fantacies seem like 'real' events because the memories are very vivid.

Why do we,adults lose this ability to imagine our own fanciful & funny ideas and get lost in them?

बापू करन्दिकर