Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 13 March, 2012 - 02:30
गायले भजनातुनी भारूड आहे
गझल ना जमली तयाचा सूड आहे
ही विधा कळणार ना सार्या जनांना
आपल्यावर तर तिचे गारुड आहे
पोतराजे 'ना' कवी हे मुक्तछंदी
फोडण्या स्वतःस हा आसूड आहे
गझल ही आहे कवीतेची कविता
ना कवीला भरविते हुडहूड आहे
मीर्,मोमिन्,जोंक ,गालिब्,भट्,इलाही
जाणण्या पाऊल हे दुडदूड आहे.
--डॉ. कैलास गायकवाड
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
ही विधा कळणार ना सार्या
ही विधा कळणार ना सार्या जनांना
आपल्यावर तर तिचे गारुड आहे>> व्व्वा
पोतराजे 'ना' कवी हे मुक्तछंदी
फोडण्या स्वतःस हा आसूड आहे
गझल ही आहे कवितेची कविता
ना कवीला भरवीते हुडहूड आहे
मीर्,मोमिन्,जोंक ,गालिब्,भट्,इलाही
जाणण्या पाउल हे दुडदूड आहे.
ठळक ठिकाणी काही र्हस्व दीर्घ वगैरे
टायमिंग भारीच
व्वाह वाह, सर!
व्वाह वाह, सर!
डॉक
डॉक __________________/\__________________
काय हो हे अचानक?
बेफी, र्हस्व दीर्घ न
बेफी, र्हस्व दीर्घ न पाळल्याबद्दल डॉकचा "नी"षेध करु नका
डॉक, तुस्सी ग्रेट
डॉक, तुस्सी ग्रेट हो.
सगळ्यांची दुखणी तुम्हाला कळावीत म्हणूनच विधात्याने तुम्हाला डबल डॉक्टर केले आहे ह्याची खात्री झाली.
मंदार गझलेत लिंगनिरपेक्षता
मंदार
गझलेत लिंगनिरपेक्षता असा धागा काढावा लागेल
एखाद-दुसरा पण अत्यंत थेट
एखाद-दुसरा पण अत्यंत थेट तरीही मार्मिक शेर आला असता तर पटलं असतं डॉक...
त्यासाठी अख्खी गझल लिहिणे म्हणजे एखाद्या रचनेचं उगाच महत्त्व वाढवल्याचा प्रकार आहे!
सॉरी. नाही आवडली.
अपवाद -
ही विधा कळणार ना सार्या जनांना
आपल्यावर तर तिचे गारुड आहे
नचिकेत, गंमतीचे एक्सटेन्शन
नचिकेत,
गंमतीचे एक्सटेन्शन असावे हे
गंमतीचे एक्सटेन्शन असावे
गंमतीचे एक्सटेन्शन असावे हे
ते मान्य आहे! पण 'गझल' असल्यामुळे इथे मी गंमतीत घेतलं नाही...
काकाक त असतं तर ते नसतं लिहिलं... आणि डॉकची रचना आहे म्हणून लिहिलं!
जाउद्या!
आपण का वेळ घालवतोय!
एखाद-दुसरा पण अत्यंत थेट
एखाद-दुसरा पण अत्यंत थेट तरीही मार्मिक शेर आला असता तर पटलं असतं डॉक...>> अनुमोदन! हे अगदी त्या काकाक चा राग म्हणून थाडकन टाकलेली गझल वाटली (हे तसे नसल्यास बरेच आहे म्हणा
)
पर खैर... !
आणि डॉकाका मला वाटलं तुम्ही खरेच ती काकाक मजेनेच घेतली कारण त्यात एखाद्याला दुखावण्यासाअठी म्हणून मुद्दाम केलेला कुठलाही प्रयत्न नव्हताच, आणि हे फार प्रामाणिकपणे नोंदवते आहे मी..
आणि गै नसावाच
गझल मस्तय पण या चर्चेचा जाम
गझल मस्तय पण या चर्चेचा जाम उबग आला आता....
मस्त रचना पोस्टा बुवा कुणीतरी.....:-)
-सुप्रिया.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/33412
खूप आवडली...व्वा !
खूप आवडली...व्वा !
डॉक.. कशाला सारखी सारखी ही
डॉक.. कशाला सारखी सारखी ही चर्चा...
मस्त तरही द्या आता.