Submitted by बेफ़िकीर on 13 March, 2012 - 02:54
जरी जाणीव आहे की तसा शालेय आहे मी
जगाला झिंग यावी प्राशुनी ते पेय आहे मी
कशाला छंदमुक्तांना खुळी प्रोत्साहने देऊ
लयीने जन्मल्यापासून पुरता गेय आहे मी
जगाच्या कारभाराची जराही कल्पना नाही
स्वतःची वाट आहे मी स्वतःचे ध्येय आहे मी
हवेमध्ये तशी कित्येक पार्थांची विरे चर्चा
रुते मातीत ज्याचा शेर तो कौंतेय आहे मी
नको लावूस इतका जीव माझ्या 'बेफिकिर' जन्मा
तुझ्यापासून मृत्यूला कधीचा देय आहे मी
-'बेफिकीर'!
(डॉ, कैलास यांच्या आसूडवरून इच्छा झाल्यावर आधीच्या दोन शेरात तीन शेर वाढवून प्रकाशित केली, वाचकांचे आभार)
गुलमोहर:
शेअर करा
जगाच्या कारभाराची जराही
जगाच्या कारभाराची जराही कल्पना नाही
स्वतःची वाट आहे मी स्वतःचे ध्येय आहे मी
व्वाह!
स्वतःची वाट आहे मी स्वतःचे ध्येय आहे मी
सहीच!
कशाला छंदमुक्तांना खुळी
कशाला छंदमुक्तांना खुळी प्रोत्साहने देऊ
लयीने जन्मल्यापासून पुरता गे य आहे मी
दोन्ही अक्षरे एकत्र वाचावीत.
चांगली गझल. तीन आणि चार
चांगली गझल.
तीन आणि चार क्रमांकाचे शेर जास्त आवडले.
ज्ञानेशशी सहमत आहे
ज्ञानेशशी सहमत आहे
जगाच्या कारभाराची जराही
जगाच्या कारभाराची जराही कल्पना नाही
स्वतःची वाट आहे मी स्वतःचे ध्येय आहे मी
हवेमध्ये तशी कित्येक पार्थांची विरे चर्चा
रुते मातीत ज्याचा शेर तो कौंतेय आहे मी
नको लावूस इतका जीव माझ्या 'बेफिकिर' जन्मा
तुझ्यापासून मृत्यूला कधीचा देय आहे मी
व्वा व्वा
हवेमध्ये तशी कित्येक
हवेमध्ये तशी कित्येक पार्थांची विरे चर्चा
रुते मातीत ज्याचा शेर तो कौंतेय आहे मी
खूप आवडला हा शेर.
बाकीचे शेरही आवडले.
सुंदर!
सुंदर!
धारदार!
धारदार!
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
जगाच्या कारभाराची जराही
जगाच्या कारभाराची जराही कल्पना नाही
स्वतःची वाट आहे मी स्वतःचे ध्येय आहे मी..........व्वा
हवेमध्ये तशी कित्येक पार्थांची विरे चर्चा
रुते मातीत ज्याचा शेर तो कौंतेय आहे मी....क्या बात है!!!
सुंदर गझल.
खूप आवडली गझल... मक्ता शेर
खूप आवडली गझल...
मक्ता शेर खासच ....
गझल आवडली. पुढील शेर अधिक
गझल आवडली. पुढील शेर अधिक आवडला.
जगाच्या कारभाराची जराही कल्पना नाही
स्वतःची वाट आहे मी स्वतःचे ध्येय आहे मी
(No subject)
मस्त. कौंतेय, ध्येय आवडले.
मस्त. कौंतेय, ध्येय आवडले.
वाह वाह!! ___/\__
वाह वाह!! ___/\__
जगाच्या कारभाराची जराही
जगाच्या कारभाराची जराही कल्पना नाही
स्वतःची वाट आहे मी स्वतःचे ध्येय आहे मी >> खास...!!
धन्यवाद
धन्यवाद
हवेमध्ये तशी कित्येक
हवेमध्ये तशी कित्येक पार्थांची विरे चर्चा
रुते मातीत ज्याचा शेर तो कौंतेय आहे मी
>>>
व्वा !
चांगली गझल. आवडली.
चांगली गझल. आवडली.
अख्खी गझल तुफ्फान
अख्खी गझल तुफ्फान आवडली.......... पूर्वी वाचलेली तेंव्हाही आवडलेलीच होती
रुते मातीत ज्याचा शेर............... तो कौंतेय आहे मी>>>>>
यावरून काही ओळी आठवल्या (नेहमीप्रमांणे :))
काळोख उजळण्यासाठी जळतात जिवाने सगळे
जो वीज खुपसतो पोटी तो एकच जलधर उसळे ...........- ग्रेस
मातीतल्या गर्भात मी
माझी खुपसतो चंचला................-वैवकु
तसेच .............
लयीने जन्मल्यापासून पुरता गेय आहे मी>>>>>>>>>यावरून माझीच गेयता ही रचना आठवली..........(
क्षमस्व !!!....चुकून आठवली......... मुद्दामहून नव्हे. कृ गै न )
बेफिकीरजी! आपली गझल वाचली.
बेफिकीरजी! आपली गझल वाचली. आवडली. काफिये फारच सुंदर आहेत! तुमचे सानी मिसरे मला आवडले.
स्वत:ची वाट आहे मी! स्वत:चे ध्येय आहे मी!.......अतिशय सुंदर व उत्कट मिसरा.
मतला............दोन ओळीतील नाते अजून घट्ट करता यावे.
शेर नंबर२...छान आहे.
शेर नंबर३..........सानी मिसरा आवडला.
शेर नंबर४...... दोन ओळीतील नाते अजून घट्ट करता यावे.
शेर नंबर५........सुंदर आहे.
भूषणराव! तुमचे काफिये व रदीफ घेवून मी पाच शेर देत आहे. कसे वाटतात ते पहा. काही शेरात अर्थ पूर्ण बदलला आहे. निव्वळ खयाल म्हणून कसे वाटतात ते पहा. प्रत्येक शेरात दोन मिस-यातील नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मी लिहिलेले शेर खालील प्रमाणे...........
.................................................................................................
मला ठाऊक नाही की, कितीसा गेय आहे मी?
पिणा-याला चढावी धुंद, ऎसे पेय आहे मी!
जरी प्राध्यापकी करतो, पुरी पस्तीस वर्षे मी;
तरीही वाटते आहे....किती शालेय आहे मी!
कुणाशी का करू स्पर्धा? करू तुलना तरी का मी?
स्वत:ची वाट आहे मी! स्वत:चे ध्येय आहे मी!
हवेमध्येच चालवती किती ते तीर शेरांचे;
रुते हृदयात ज्याचा शेर, तो कौंतेय आहे मी!
जरासा थांब तू मृत्यू! जरा आटोपतो देणी!
मला जाणीव आहे की, तुलाही देय आहे मी!!
..........प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................
वा देवसर मस्त .........सगळेच
वा देवसर मस्त .........सगळेच शेर ज्ज्जाम आवडले
(पर्यायी शेर असेही करता येतात तर!!.....छान आईडिया दिलीत सर ;))
जगाच्या कारभाराची जराही
जगाच्या कारभाराची जराही कल्पना नाही
स्वतःची वाट आहे मी स्वतःचे ध्येय आहे मी
व्वाह! व्वाह!
कौंतेय, आवडले.
सतीश देवपूरकर, आपण केलेल्या
सतीश देवपूरकर,
आपण केलेल्या शेरांमध्ये असलेली विरामचिन्हे पाहून चिवड्यात चुरमुर्यांहून दाणे जास्त असे वाटत आहे
कळावे
गंभीर समीक्षक
जरी जाणीव आहे की तसा शालेय
जरी जाणीव आहे की तसा शालेय आहे मी>>>
आजवर कोणताही कवी इतका प्रामाणिक झालेला आमच्या पाहण्यात नाही. अभिनंदन कवी बेफिकीर. तुमच्यासारखे तुम्हीच. बालवाडीस योग्य असे लेखन करताना आपण स्वतःला शालेय असा वाढीव दर्जा देत आहात हे पाहून गल्लीत कुत्रेही सिंह होतात हे आम्हास पुन्हा पटले.
जगाला झिंग यावी प्राशुनी ते पेय आहे मी>>>
एक विचित्र दृष्य आमच्या डोळ्यासमोर तरळले. कवी बेफिकीर यांच्या गझला फिल्टर्ड पाण्यात उकळत ठेवलेल्या असून रसिक वाचक एक एक चमचा पिऊन चव कशी आहे ते सांगत आहेत व निघून जाताना त्या वाचकांचे पाय लडखडत आहेत.
ज्या प्रमाणे मंगलाष्टके म्हंटली की लग्न होत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही दोन ओळी एकत्र आल्या की शेर होत नाही.
कशाला छंदमुक्तांना खुळी प्रोत्साहने देऊ
लयीने जन्मल्यापासून पुरता गेय आहे मी>>>
जन्मण्यात लय होती की काय?
प्रोत्साहन या शब्दालाही विशेषण असते हे आम्हाला कवी कणखर यांचा 'उदासवाणा कयास' वाचून पटवून घ्यावेच लागत आहे. अन्यथा प्रोत्साहन खुळे, शहाणे, बेरकी, हरामखोर असे काही असल्याचे ऐकिवात नव्हते.
जगाच्या कारभाराची जराही कल्पना नाही
स्वतःची वाट आहे मी स्वतःचे ध्येय आहे मी>>>
दुसरी ओळ बरी आहे. पण सध्या साखर, तांदुळाचे भाव किती हे तरी पाहून घ्या. पुढे कधीतरी घरही सांभाळावे लागेल याची नम्र जाणीव ठेवा.
हवेमध्ये तशी कित्येक पार्थांची विरे चर्चा
रुते मातीत ज्याचा शेर तो कौंतेय आहे मी>>>
घेतला काफिया की हाणला शेर! शेर मातीत रुतणे म्हणजे काय हो?
नको लावूस इतका जीव माझ्या 'बेफिकिर' जन्मा
तुझ्यापासून मृत्यूला कधीचा देय आहे मी>>>
हा खयाल बरा आहे. जन्माने 'जीव लावणे' हेही ठीकठाकच. पण तो जन्म 'बेफिकीर' का आहे म्हणे? बेफिकीर असला तर जीव कशाला लावत बसेल? की तखल्लूस पाहिजेच म्हणून काहीही कुठेही वळवायचे? म्हणजे एक्स्प्रेस हायवेवर रणगाडा न्यायचा आणि विमान जंगलातून फिरवायचे. लोक नावाला थोडे महत्व अॅटॅच करतात म्हणून काहीही छापायचे हे बरे नाही.
कळावे
गंभीर समीक्षक
समीक्षकजी इथे तर तेच तेच आयडी
समीक्षकजी
इथे तर तेच तेच आयडी घोळ घालताहेत. आता तुमची चीड कुठे जाईल सांगता येत नाही
सर्वांचा आभारी
सर्वांचा आभारी आहे
-'बेफिकीर'!
सर्वांचे आभार मानल्याबद्दल मी
सर्वांचे आभार मानल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
कशाला छंदमुक्तांना खुळी
कशाला छंदमुक्तांना खुळी प्रोत्साहने देऊ
लयीने जन्मल्यापासून पुरता गेय आहे मी
मार डाला .
जरासा थांब तू मृत्यू! जरा
जरासा थांब तू मृत्यू! जरा आटोपतो देणी!
मला जाणीव आहे की, तुलाही देय आहे मी!!
>>>
चांगला शेर आहे प्रोफेसर साहेब
अभिनंदन
Pages