पेट्रा : "one of the 40 places you have to see before you die"....!!!

Submitted by Girish Kulkarni on 11 March, 2012 - 08:06

*************************************************
*************************************************

"पेट्रा" हे नाव मी आखातात ( मिडल ईस्ट) यायच्यापुर्वी फक्त "इंडीयाना जोन्स" सारख्या सिनेमातून पाहीलं-ऐकलं होतं. जॉर्डन , लगतचा अफ्रिका अन या सगळ्याचा पश्चिमेबरोबरच्या नातेसंबधाबद्दलचा इतिहास हा माझ्या खुप माहीतीचा विषय नव्हताही अपवाद फक्त "लॉरेंन्स ऑफ अरेबिया"या महान चित्रपटाचा ( यातला ओमर शेरीफचा रोल सगळ्यात प्रथम दिलीपकुमारला ऑफर झाला होता..नंतर ओमर शेरीफन त्याच सिनं केल...)- यातनं बरीच जुजबी माहीती डोक्यात गेलेली. नंतर वाचनात जे आलं ते पेट्राबद्दलची उत्सुकता वाढवणारच होतं. बीबीसीने तर "म्रुत्यु येण्यापुर्वी ज्या ४० जागा माणसानं पाह्यला हव्यात"-Petra was chosen by the BBC as one of "the 40 places you have to see before you die") - त्यात पेट्राला समाविष्ठ केलय. युनेस्कोने तर पेट्राला "one of the most precious cultural properties of man's cultural heritage" असा खिताब बहालही करुन टाकलाय !

योगायोगानं दुबईत आल्याबरोबर सगळ्यात पहील्यांदा जायला मिळालं ते पेट्रालाच.जॉर्डनला काही कामानिमीत्तानं जाणं झाल अन तेही अगदी "डेड सी"लाच! या डेड सी वरनं तीन तासाच्या अंतरावर पेट्रा लपलय ! जॉर्डनची राजधानी अम्मानहुन "डेड सी" साधारण दिड्-दोन तासाच्या अंतरावर. आम्ही दुबईहुन अम्मन - जॉर्डनला उतरलो अन अम्मान विमानतळावरुन सरळ डेड सी ला प्रयाण केलं. डेड सी - "मृत समुद्र"हे तसं एरव्ही अगदी रुक्ष वाटाव अस ठिकाण. पण येशूच्या रेफरंसमुळे ख्रिस्ती बांधवांकरतां अस्तिशय महत्वाच ठरलेल हे ठिकाण आहे. आम्ही उतरलो होतो ते हे तिथलं अतिशय सुंदर "मुव्ह अन पिक" हॉटेल.

IMG_0958.JPG

मला इथलं बरच काही आवडलय्...जेवण, अरेबीक पद्धतीच्या बसक्या बंगल्या... अन येस्स इथनं बघितलेला सुर्यास्त हा माझ्या आजपर्यतच्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मर्णीय देखावा !!!

IMG_0988.JPG

"डेड सी "ला येशू ख्रिस्त बापटाईज झाला यापलीकडे मला या जागेच्या धार्मिक महत्वाविषयी माहीती नाही. पण या एका गोष्टीमुळे ही जागा ख्रिश्चनांसाठी अतिशय महत्वाची मानली जाते. डेड सीला जिथे येशुला बापटाईज केलं होतं अस मानलं जातं त्या जागेचा हा फोटो... मी दैववादी नाही ... अन धार्मिक तर नाहीच नाही... पण हा असला सुर्यास्त कुणा नास्तीकालाही मोहवुन टाकणारा आहे..

IMG_0947.JPG

इथेच आमची दोन दिवसांची कॉन्फरंस होती ती आटोपल्यावर आमचा "पेट्रा" काबीज करायचा विचार पक्का झाला. बघता बघता सगळेच यायला तयार झाले ...त्यातल्या त्यात "गोरे" अगदी एका पायावर आघाडीला !

पेट्रा शोधुन काढल ते एका गोर्‍या साहेबानंच... एका स्विस प्रवाश्याला/भटक्याला हे १८१२ त सापडलं.. या चित्रात जो डोंगर दिसतोय त्यात पेट्रा दडलय हे कोणालाच खर वाटणार नाही !

IMG_1012.JPG

आता आम्ही या छुप्या शहरापर्यंत जवळजवळ पोहोच्लोच होतो.....

IMG_1013.JPG

या बसच्या रांगा बघुन तुम्हाला कल्पना येईल इथे काय रेलेचेल असेल्य त्याची ... हे बघितल्यावर अगदी पहीली गोष्ट मनाला चाटून गेली ती ही की... माझ्या देशात अजिंठा-वेरुळलाही असच महात्म्य नशिबी येवो !!!!

IMG_1014.JPGIMG_1016.JPG

इथे पोहोचल्यावर मग खरी सफर सुरु झाली....इथनं उतरुन सगळा पायी प्रवास... तसे गरज पडल्यास उंट /घोडे भाड्यानीपण मिळतात !

IMG_1019.JPGIMG_1020.JPG

आता यानंतर जे काही बघायला मिळालं तो नि:संशय आतापर्यंतच्या माझ्या भटकंतीतला अतिशय सुंदर अनुभव ठरलाय अन म्हणुनच हा लेखन प्रपंच ....

IMG_1023.JPGIMG_1033.JPGIMG_1037.JPGIMG_1041.JPG

हे ख्रिस्तपुर्व सहाव्या शतकातलं शहर.... इथल्या अप्रतीम वास्तुरचनेमुळे अन इथल्या जलव्यवस्थापनाच्या पधतीसाठी जगभर प्रसिद्ध झालय ! खालच्या चित्रात तुन्ही नीट चित्राच्या कडेला बघितलत तर पाणी जाण्यासाठी एक नहर/नाली सारखा आकाराच बांधकाम दिसतय्...त्यातन पाणी सगळीकडे पोहोचवलं जाय्यच अस इथली लोकं सांगतात...

IMG_1063.JPGIMG_1044.JPGIMG_1047.JPGIMG_1048.JPGIMG_1052.JPG

या चित्रातले रस्ते बघा अजुनही तितकेच मजबून वाटाताहेत...

IMG_1059.JPGIMG_1060.JPGIMG_1066.JPG

इथे आपण एका सलग डोगराच्या सान्निध्यात चालत राहातोय असा भास सतत होत राहातो ...आजुबाजुला त्या गुहेसारख्या दिसणार्‍या जागा दिसत रहातात ...जी त्याकाळी घरं होती... पण या चित्रात जे दिसतय ते अलीबाबाच्या गुहेच्या दरवाज्यासारखं आहे.... श्वास रोखुन धरायला लावणारं आहे.... तुम्ही बघाच...

IMG_1067.JPG

तुम्ही या डोंगराच्या कपारीतून चालत असतात अन अचानक अस काही भव्य दिव्य एकदम समोर येईल अशी कुठलीही कलपना नसतांना आपण अचानक या रोमन चमत्कारासमोर येऊन उभे राहातो...

IMG_1069.JPGIMG_1072.JPG

इथनं मग सुरु होतो त्या मायावी जागेचा खरा अध्याय! इथनं पुढे जे बघायला मिळतं ते "अदभुत" या सदरात मोडणारच आहे !!!

IMG_1073.JPGIMG_1079.JPG

अधे-मधे थांबुन काफी-चहाची दुकानही आहेत... हॅव अ लुक ...

IMG_1086.JPG

हे इथलं त्या कालातलं स्टेडीयम... सगळ्याच रोमन ऐतिहासीक शहरात असली स्टेडीयम्स असतातच... मनोरंजनाची ती एकमेव सोय असावी ... इथेही ते आहेच...

IMG_1089.JPGIMG_1092.JPG

ही "अपार्टमेंटस" बघा... इथलं वास्तुशास्त्र खरच अनोखं असाव..

IMG_1093.JPGIMG_1097.JPGIMG_1100.JPGIMG_1101.JPGIMG_1103.JPGIMG_1108.JPG

पेट्राबद्दल लिहायसारखं खुप काही आहे पण पेट्राला काही ओळीत शब्दबद्ध करणारी अप्रतीम कविता आहे - "a rose-red city half as old as time" म्हणणारी... ही कविताही खुप मस्त आहे ... अतिशय आवडल्यामुळे इथे देतोय... अन त्याच बरोबर मीही थांबतोय.... वेळ मिळाला तर अम्मानचे काही फोटो अन वर्णन टाकीन पुन्हा... पण तोपर्यंत... यु एंजॉय मायबोली ...!!!

“ It seems no work of Man's creative hand,
by labour wrought as wavering fancy planned;

But from the rock as if by magic grown,
eternal, silent, beautiful, alone!

Not virgin-white like that old Doric shrine,
where erst Athena held her rites divine;

Not saintly-grey, like many a minster fane,
that crowns the hill and consecrates the plain;

But rose-red as if the blush of dawn,
that first beheld them were not yet withdrawn;

The hues of youth upon a brow of woe,
which Man deemed old two thousand years ago,

match me such marvel save in Eastern clime,
a rose-red city half as old as time. ”
( Newdigate Prize-winning poem by John William Burgon).

***************************************************
***************************************************

गुलमोहर: 

सुंदर.
खुप चित्रपटात हे दिसतं, पण इथे जायची वाटही इतकी सुंदर असेल,
असे वाटले नव्हते. आता फ्लाइट पकडून जावेसे वाटतेय.

खर्‍या अर्थाने एका जादुमय ठिकाणाची तितकीच जादुमय सफर तुम्ही आम्हाला घडवून आणल्याबद्दल गिरिजजी तुमचे मनःपूर्वक आभार.

"पेट्रा" चा उल्लेख मी 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' संदर्भात वाचन करीत असताना पाहिला होता. पुस्तकात अर्थातच हे मोहवून टाकणारे फोटो नव्हते [अर्थात "लॉरेन्स...." संदर्भात त्यावेळी फोटो दिलेच पाहिजे होते, असेही नसल्याने त्याबद्दल वाचताना काही खटकतही नव्हते] पण पुढे 'इंडियाना जोन्स सीरिज' च्या निमित्ताने पेट्राचे जे दर्शन झाले त्यावेळी मनाला खरेच वाटून गेले की एकदा तरी हा योग नशिबी यावाच. असो.

तुम्ही ज्या भारावल्या मनाने पेट्राचे वर्णन केलेले दिसते त्यावरून तुम्ही त्या जागेच्या किती प्रेमात पडला आहात हेही स्पष्ट उमजते. लकी गाय यू आर !

"स्पाय हंटर" की 'होली हंटर' या नावाने एक व्हिडिओ गेम या पिढीतील मुले खेळताना मी पाहिल्याचे स्मरते, त्या गेममध्ये पेट्राच्या वरील सर्व भागाचा सर्रास उपयोग केला असल्याचे जाणवते [अर्थात हे मी 'इंडियाना जोन्स....' चित्रपटवरून अंदाज बांधत आहे.]

असो. एका छान चित्रमालिकेचा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.

अशोक पाटील

किती सुंदर. ऐकलं होतं. पण आतापर्यंत इतकं जवळून दर्शन झालं नव्हतं. अजून फोटो चालले असते. Happy

नुकतंच ह्युमन प्लॅनेटच्या डेझर्टवरच्या एपिसोडमध्ये पेट्राबद्दल ऐकलं होतं. ते म्हणतात : Petra, in Jordan, was an ancient city which once had an aqueduct system, delivering 40 million litres of water a day, to 20,000 people.

झक्क्कास!! Happy

तुम्ही ज्या भारावल्या मनाने पेट्राचे वर्णन केलेले दिसते त्यावरून तुम्ही त्या जागेच्या किती प्रेमात पडला आहात हेही स्पष्ट उमजते.
+१

सही Happy

अफ़ाट अनुभव गिरीशदा Happy
मझा आला बघताना.... धन्यवाद !

<<एका जेम्स बाँड पटात पाहिल्या सारखं वाटतय पण कदाचित नसेलही.>> वैद्यबुवा, 'इंडीयाना जोन्स अँड द लास्ट क्रुसेड' मध्ये पाहीलीय ती पर्वतातील अजस्त्र घळ आणि त्या घळीत आपली वाट पाहणारं ते अदभुत Happy

अदभूतच आहे हे ! 'Petrifying' हा इंग्लीश शब्द 'पेट्रा' वरूनच आला असावा, असं वाटण्याइतपत !!
'लॉरेन्स ऑफ अरेबिया'पेक्षांही 'मॅकेनाज गोल्ड' व मायबोलीकरांच्या सांदण दरीच्या ट्रेकचे फोटो आठवले मला [ http://www.maayboli.com/node/23253 ].
धन्यवाद, गिरीशजी.

काय सुंदर जागा आहे! फार देखणे फोटो.

अपार्टमेंट्स बघून स्टार वॉर्समधल्या टॅटूईन्वरच्या अ‍ॅनाकिन स्कायवॉकरच्या घराची आठवण आली. Happy

वा! अद्वितीय आहे हे. आवडले. शिल्पशहर आणि फोटो दोन्हीही.

माणसाने घडलेले हे वाटतच नाही
कल्पनेच्या तरंगांवर कष्टांची कला ही

कुठल्याशा जादूने कातळात कोरली
चिरंतन, पवित्र, सुंदर, परात्पर ही

डोरिक देवळागत शुभ्रवर्ण नाही ही
पवित्र दैवी कार्ये नाहीत, परंपरा ही

संत-संगतीचा करडा रंग नाही जरा
पठाराच्या टेकडीवरला मुकुटच खरा

उषेच्या लाजण्याचा, गुलाबी हा रंग
कातळाने घेतला, का सोडेल तो संग

आर्जवी शिल्पावर यौवनाची आशा
हजारो वर्षांची जणू मानवी मनीषा

पौर्वात्य कलेत असे आश्चर्य दाखवा
कालार्ध वयाचे गुलाबी शहर दाखवा

जयपूर आहे.
मात्र ते बांधले आहे सवाई जयसिंहाने १७२७ ते १७३३ या केवळ सहा वर्षांत.

सगळ्या मित्रांचे मनःपुर्वक आभार !!!
अशोकजी : आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल खुप आभार !
मामी : जेव्हढे फोटो टाकले त्यातच दमलो खरेतर... फोटो+वृत्तांत हा बराच वेळखाऊ मामला आहे... अन्यथा फोटो बरेच आहेत...
भाऊ Happy
गोळेसाहेब : कवितेच्या मराठी भाषांतराबद्दल खुप आभार !

Pages