'निरभ्र': लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री परिसंवाद विशेषांक प्रसिद्ध झाला

Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 March, 2012 - 00:52

davandi-finaltex.png

निरभ्र: लिंगनिरपेक्ष मैत्री ओळख परिसंवाद विशेषांक

जरूर वाचा. प्रतिक्रिया द्या आणि आपापले विचारही मांडा.
चर्चा व्हावी म्हणून प्रत्येक लेखाच्या खाली प्रतिक्रियांची सोय आहे.

विषय: 

हो बरोबर पराग. मायबोलीच्या मुख्यपृष्ठावरून निरभ्रच्या मुख्यपृष्ठावर जाता येतंय. पण नविन लेखनातून क्लिक केल्यावर या नोडवर येतंय. धन्यवाद.

नीरजा आणि इतर संपादक मंडळ, छान आहे अंक. रैना, अरुंधती, ललिता, आगाऊ ह्यांचे लेख तसेच नानबाने केलेला अनुवाद अधिक आवडले. त्या त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आहेच. Happy सुरेख संकल्पना आणि लेख. धन्यवाद.

मात्र जवळ जवळ प्रत्येक लेखामध्ये मुशोच्या चुका आहेत, मुशो केलेले असताना इतक्या ढोबळ चुका कशा ल़क्षात आल्या नाहीत, असे वाटून गेले.

अभिनंदन संपादक मंडळ आणि लेखकांचं .
अंक अजुन वाचला नाही , पण कव्हर पेज मलाही 'लिंग निरपेक्ष मैत्री' पेक्षा ' लिंग निरपेक्ष ओळख्/आयडेन्टिटी' म्हणून जास्तं योग्य वाटलं.

''निरभ्र'' शीर्षक एकदम चपखल आणि सुंदर>>> मला शीर्षकाचा आणि अंकाच्या विषयाचा संबंध कळला नाही. निरभ्र म्हणजे ढग नसलेलं, स्वच्छ आकाश ना?

अंकाच्या वर हा विशेषांक, दिवाळी अंक, मराठी गाणी आणि मायबोली असे चार टॅब्स आहेत. मायबोली टॅबवर क्लिक करून पुन्हा मायबोलीवर जाता येते असा शोध लागला.

मला प्रथमदर्शनी मुखपृष्ठ आवडले होते. पण काही फोटोंची निवड मला पटली नाही.
या फोटोत मला, पारंपारीक जेंडर बायस दिसतो.

दिनेशदाला अनुमोदन... Happy
मुखपृष्टात 'मैत्री' कुठेच दिसत नाही, 'लिंगनिर्पेक्ष मैत्री' तर लांबच.. Happy

असो, पण लेख मस्त आहेत. मी काही वाचलेत.

आगाऊ आणि रैनाचे लेख आवडले.
आगाऊच्या बर्‍याच वाक्यांना अगदी-अगदी म्हणावेसे वाटले.
पण अंक त्रोटक वाटला.
विषयाचा अंदाज न आल्याने लेख कमी आलेत असं वाटतंय.

अंकाच्या वर हा विशेषांक, दिवाळी अंक, मराठी गाणी आणि मायबोली असे चार टॅब्स आहेत. मायबोली टॅबवर क्लिक करून पुन्हा मायबोलीवर जाता येते असा शोध लागला >>>>>

मयेकर आणि सर्व वाचक,
त्या ठिकाणी 'नवीन लेखन' असा आणखीन एक टॅब अ‍ॅडमीनांनी घातला आहे. ज्यावर क्लिक करून तुम्हांला लेखांची यादी दिसू शकेल (मायबोलीवरील 'नवीन लेखन' सारखं). तिथे प्रत्येक लेखावर आलेल्या प्रतिक्रिया तसेच नवीन प्रतिक्रिया हे सगळं दिसू शकेल. लेखांवर होणारी चर्चा वाचण्यासाठी ह्या सोईचा उपयोग होऊ शकेल.

अंक वाचला. पण लेख फारसे आवडले नाहीत. लिंगनिरपेक्ष मैत्रीची फारच थोडी उदाहरणे लेखात दिसतात. त्याऐवजी तात्विक चर्चाच जास्त आहे. चर्चेऐवजी १-२ खरीखुरी उदाहरणे दिली असती, तर लेख जास्त जिवंत वाटले असते.

असो. हे माझे व्यक्तीगत मत आहे.

मास्तुरे, <<<<<<<<<<<<लिंगनिरपेक्ष मैत्रीची फारच थोडी उदाहरणे लेखात दिसतात. त्याऐवजी तात्विक चर्चाच जास्त आहे. चर्चेऐवजी १-२ खरीखुरी उदाहरणे दिली असती, तर लेख जास्त जिवंत वाटले असते>>>>>>>>>>>>>> याबद्दलः-
एखादा लेख लिहायला घेतल्यावर जर त्याला शब्दमर्यादा दिली असेल तर "कशावर फोकस करायचे" ते आधी ठरवावे लागते. त्यामुळे मी स्वतः तरी विषयाच्या "डेफिनिशन" वर अधिक भर दिला आहे. कारण हे नवेच प्रकरण काढलेले दिसले. त्यामुळे इलाज नव्हता.

Pages