पुष्कळांना सवय असते म्हणायची, "हे तर काहीच नाही". मग ती एखादी कलाकृती असो, किंवा जागा असो किंवा खाण्याचा पदार्थ असो. तुम्ही पहाताय, किंवा खाताय त्यापेक्षा मोठ्ठा किंवा जास्त चांगला अनुभव मी घेतला आहे असं सांगायच असतं का बढाया मारायची सवयच असते का आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायच असतं. प्रत्येकाच्या बाबतीत कारण वेगळ असतं किंवा काहींच्या बाबतीत तीनही कारणं असू शकतात.
एकदा आम्ही युरोप टूरला आमच्या एका मित्राबरोबर गेलो होतो. कशालाही छान म्हटलं की हा म्हणायचा, " ये तो कुछ नहीं, यु.एस.में तो इससे बढकर है |" दोनचारदा तेच तेच ऐकल्यावर शेवटी म्हटलं, " विनोद, तेरेको पता था की यु.एस. में इससे बढकर है तो आयाही क्यूं? स्वतः नाही एंजॉय करायच तर दुसर्याला तरी करून द्यावं न. पण एवढं म्हटल्यावर तो थांबला असता तर तो विनोद ( नावाच्या संदर्भात) कसला!
माझ्या एका मैत्रिणीला सवय होती . काही सांगताना ती म्हणायची, "You can't even imagine". एकदा स्वतःच्या श्रीमंत नातेवाईकाचं कौतुक सांगताना आम्हाला म्हणाली, " अगं इतके श्रीमंत आहेत न ते, त्यांचं एवढं मोठ्ठ घर, एवढा पैसा, You can't even imagine" . ग्रुपमध्ये तेंव्हा एक मिश्कील मैत्रीण होती. म्हणाली, "काय ग काय नाव त्यांच?" तिने नाव सांगितल्यावर ही म्हणाली, " हो ग ऐकलय नाव. टाटा, बिर्ला, आणि हे तुझे नातेवाईक". मला नाही वाटत तिच्या लक्षात आलं हिचं म्हणणं कारण तिची ती सवय अजून गेली नाही.
एका पार्टीमध्ये एकजण त्याला नुकताच आलेला अनुभव सांगत होता. तो ग्रोसरी स्टोअरमध्ये गेला असताना त्याने कसा गनपॉईंट होल्डअप झाला. तो कसा घाबरला आणि टिव्हवर पाहिल्यासारखा बेधडक जमिनीवर आडवा पडून राहिला वगैरे वगैरे. तर तेथे असलेले एक महाशय म्हणाले, "हे तर काहीच नाही, माझ्या कलीगने तर शूटआऊट अनुभवलय ग्रोसरी स्टोअरमध्ये". प्रत्येक अनुभवाला "तेरे उपर मेरी" असा किस्सा असलाच पाहिजे का? आणि असला तर " हे तर काहीच नाही" अशा शब्दाने सुरुवात केली पाहीजे का? खरं तर तसा उद्देश असतोच असं नाही पण एक सवय - लक्ष वेधून घ्यायची.
अजून एक मला बोचणारी गोष्ट म्हणजे, कोणाकडे जेवायला गेल्यावर त्या होस्ट आणि होस्टेसच्या समोर तिने केलेला पदार्थ अमूक एका रेस्टॉरंट्मध्ये काय मस्त मिळतो हे सांगणं. म्हणजे हे तर काहीच नाही, परवा हॉटेल दीपकमध्ये खाल्लेलं इतक छान होतं न! म्हणण्यासारखच. काही गोडबोले ( नावाने नाही) होस्टेसला खूष करायला म्हटले असते, " भाभीजी, छोले तो बिलकुल चाचादी हट्टी जैसे बने है| " तेवढाच त्या होस्टेसच्या कष्टाला सलाम.
कोणी खूप एक्सायटेडली आपल्याला सेलमध्ये कसं छान बारगेन मिळालं हे सांगत असलं की काहींना सवय असते लगेच म्हणायचं, " हे तर काहीच नाही, तू २५ डॉलर्संना घेतलस? मला तर तेच २० डॉलर्सला मिळालं" झालं! सांगणार्याच्या उत्साहावर विरजण आणि शिवाय पैसे थोडे जास्तच गेल्याची चूट्पूट.
आता नक्की आठवत नाही, मी पहिल्यांदाच यु. एस्. ला आल्यावर आम्ही कुठेतरी गेलो होतो समुद्र किनार्याच्या गावात. नवरा अगदी काय छान जागा आहे न म्हणत होता आणि मी म्हटल होतं, " आमच्या दिवेआगरची सर नाही ह्या जागेला". पुढे कित्येक दिवस तो एक विनोदाचा भाग बनला होता. " काय दिवेआगरपेक्षा नसेल पण तरी छान आहे की नाही किंवा दिवेआगरमध्येही असच असेल नाही?"
आता हे ललित वाचून तुम्हीपण म्हणाल, " हे तर काहीच नाही". पण मी मानणार असते एकेकाला असं म्हणायची सवय.
आमच्याकडे कोकणात जन्म
आमच्याकडे कोकणात जन्म झालेल्या आत्या कंपनीला आहे असं म्हणायची सवय. महाबळेश्वर, माथेरानला वगैरे गेलं की आमचं कोकण कसं छान आहे त्या जागेपेक्षा हे सांगायची हौस. मनात हे विचारावंसं वाटतं की मग पैसे खर्च करुन आलात कशाला इथवर? गावी कोकणातच जायचं की.
>>> आमच्याकडे कोकणात जन्म
>>> आमच्याकडे कोकणात जन्म झालेल्या आत्या कंपनीला आहे असं म्हणायची सवय. महाबळेश्वर, माथेरानला वगैरे गेलं की आमचं कोकण कसं छान आहे त्या जागेपेक्षा हे सांगायची हौस.
मूळचे कोल्हापूरवासी असलेले इतर कोणत्याही गावात गेले तरी कोल्हापूरची अफाट स्तुती थांबवत नाहीत असा माझा अनुभव आहे.
आमच्याकडे कोकणात जन्म
आमच्याकडे कोकणात जन्म झालेल्या आत्या कंपनीला आहे असं म्हणायची सवय. <<<
का ना कोकणातले असल्याने अगदी चांगली कल्पना आहे या प्रकाराची. कोकणापेक्षा जगात बरं काही असूच शकत नाही यांच्यामते.
आर्चः अवती-भवती सतत घडणारी
आर्चः
अवती-भवती सतत घडणारी गोष्ट.. पण तू मांडेस्तोवर लक्षातच आली नाही. मस्त मांडलीयस! हसू आल कारण्...ह्या कॅटॅगरीत मोडणारी खूप ओळखीची माणस डोळ्यासमोर आली. समोर आहे ती गोष्ट पुरेपूर अनुभवायची, त्याची मजा लुटण्याएवजी उगाचच तुलनात्मक वाक्य टाकायची आजूबाजूच्या लोकांचा हीरेमोड करायचा..असते एकेकेला सवय! माझ्या मते स्वता: कडे लक्ष वेधून घ्यायचा हा एक बेकार मार्ग आहे .
आपल्या मायबोलीच्या रेसिपीच्या धाग्यावर गेलीस तर अशी गंमतशीर उदाहरण दिसतील. नवीन रेसिपी टाकणार्या मित्राच वा मैत्रिणीच प्रथम कौतुक करा, आभार माना! मग सांगा ना की ही रेसिपी पूर्वी टाकलेल्या अमक्या वा तमक्या रेसिपीशी मिळती-जुळती आहे. कडवट भाषेत "अशिच रेसिपी वा ह्याच्या पेक्षा सोप्पी रेसिपी अमुक्-तमुकने २००९ मध्ये टाकलेली आहे" अस सांगून डिसमीस करायच. What's the point? असो. तुझच वाक्य रिपीट करते...असते एकेकेला सवय!
ह्या मोठ्या उत्सुकतेने
ह्या मोठ्या उत्सुकतेने वाचायला आलो होतो...
पण हे तर काहीच नाही...माझ्या मित्राने अशाच अनुभवांवर इतका मस्त लेख
लिहीला होता ना...सारखा वाचावासा वाटायचा...
एकतर असे शेरे मारणारे किंवा
एकतर असे शेरे मारणारे किंवा भरमसाठ स्तुती करणारे.... नेमके मत देणारे फारच थोडे !!
हे तर काहीच नाही असं नाहीये
हे तर काहीच नाही असं नाहीये
(No subject)
मलाही कल्पुसारखेच
मलाही कल्पुसारखेच वाटते.......अवती-भवती सतत घडणारी गोष्ट.. पण तू मांडेस्तोवर लक्षातच आली नाही.......याबरोबरच कधी कधी आपल्याकडुनही असे होते का....यावर विचार करायला लागले...
मस्त
मस्त
हो की गं आर्च. मजेशीरच असते
हो की गं आर्च. मजेशीरच असते ही सवय
पण सायो आणि नीरजा, तुम्ही म्हणताय तो प्रकार वेगळा आहे. एखाद्या जागेशी इतके बंध जुळलेले असतात की दुसरीकडे गेलात तरी मनात तुलना होत राहते उदा. परदेशात तुम्ही पहिल्यांदा जिथे राहायला जाता ते गाव तुमच्यासाठी स्पेशल असतं आणि मग दुसर्या गावात गेल्यावरही सारखं ते पहिलंच कसं चांगलं होतं अशा आठवणी येतात. युकेत आल्यावर पहिले काही दिवस माझ्या बोलण्यात सारखी अशी तुलना यायची. तर अमेरिकेत असताना ज्या मैत्रिणी आधी युकेत राहल्या होत्या ते इथे काहीच नाही युके कसं चांगलं असं ऐकवायच्या.
आर्च म्हणतेय ती कुरघोडी करायची वॄत्ती आहे.
इथे तसेच टेक्सासचे
इथे तसेच टेक्सासचे लोक.
टेक्सासमधले सगळे केव्हढे मोठे! तिथले डास चिमण्यांएव्हढे असतात! वगैरे.
ते एकदा कनेक्टिकट या पिटुकल्या राज्यात आले होते. त्यावर बोलताना म्हणाले 'काय हे तुमचे स्टेट, दोन तासात स्टेटच्या बाहेर! आमचे टेक्सास बघा, दिवसभर प्रवास केलात तरी टेक्सासमधेच रहाल.
त्याला उत्तर दिले, आमच्याकडेहि पूर्वी तसेच होते, पण आम्ही लवकरच जास्त वेगाने जाणार्या मोटारी विकत घेतल्या, नि चालवायला शिकलो. तुमच्याकडे तशा मोटारी आणल्या तरी चालवायला येतील का कुणाला?
भारतातून येणार्या बर्याच
भारतातून येणार्या बर्याच लोकांना गेल्या अनेक वर्षात भेटलो. दोन प्रकारचे लोक -
एका प्रकाराला अमेरिकेतल्या सगळ्याचेच कौतुक, अगदी बाथरूम सुद्धा कित्ती छान!
दुसरा प्रकार म्हणजे आमच्याकडे भारतातहि आहे हे सगळे!
म्हणजे न्यू यॉर्कमधल्या उंच इमारती पाहून, आमच्याकडेहि आहेत उंच इमारती. नायागारा पाहून, आमच्याकडेहि आहेत धबधबे, वगैरे.
आशुचँप कालचीच घडलेली गोष्ट.
आशुचँप
कालचीच घडलेली गोष्ट. कमलजीतकडची पार्टी. ग्रुपमध्ये बोलणं चाललं होतं.
एकजण म्हणाली, " इसके भटुरे अच्छे बने हैं| "
दुसरी लगेच, " ये तो कुछ नहीं मेरे इससे अच्छे बनते हैं लेकीन मैं मेरी रेसिपी शेअर नहीं करती!'
(No subject)
आर्च, मस्त आहे हा धागा
आर्च, मस्त आहे हा धागा
"हे तर काहीच नाही" चा एक भयाण
"हे तर काहीच नाही" चा एक भयाण किस्सा आहे...
ग्रूपमधल्या एका मित्राला या प्रकारची सवय आहे.......
एकदा गेट टूगेदरला आम्ही ३ मित्र बाजुला बसून एका मित्राच्या काकाच्या अचानक जाण्याबद्दल बोलत होतो.... लागलीच दुसर्या मित्राने अरे माझ्या आत्याचे मिस्टर पण ऐन चाळीशीत तडकाफडकी गेले असं सांगितलं....
तिथे न बसलेला चौथा मित्र ( हे तर काहीच नाही ची सवय असलेला) अचानक आम्हाला जॉईन झाला.... आणि शेवटच्या लाईन्स ऐकुन म्हणाला....
"हॅ अरे हे तर काहीच नाही...... माझा एक काका वयाच्या ३५ व्या वर्षी हार्ट अटॅक येऊन जागच्या जागी गेलाय
सगळे हैराण होऊन बघत होतो आम्ही......
आणि त्यानंतर आता गेली कित्येक वर्ष त्याला तो आला की "हॅ हे तर काहीच नाही" असं म्हणून त्याची खेचतो 
मस्त आणि योग्य लिहिलंय.
मस्त आणि योग्य लिहिलंय.
आर्च , नेहमी होत खरं अस
आर्च , नेहमी होत खरं अस आजुबाजुला. ते होस्टला वगैरे म्हणणं ,कमाल वाटली.
झक्की खर आहे.
पण खरच एकदा टेक्सास मध्ये गाडी चालवून बघाच. बाकी कुठलेही रस्ते बारके सुरके वाटायला लागतात. esp. ते मिड लेन प्रकरण (डावी कडे किंवा उजवीकडे वळण्यासाठी) माझ डोक फिरवत.
मास्तुरे
.
कल्पु आणि विद्याक शी सहमत,
कल्पु आणि विद्याक शी सहमत, लेख वाचून पहिल्यांदा हाच विचार डोक्यात आला की आपणही नकळतपणे 'हॅ, हे तर काहीच नाही' असं बोलून जातो का? त्याचं प्रमाण किती आहे? ते तपासायला हवं.
कधी कधी आपण देतो ती उदाहरणं खरोखर योग्य असतात तेव्हा ठिक आहे. पण सतत असं म्हणण्याची सवय अयोग्यच आहे.
आर्च, मस्त ललित पण एक मात्र
आर्च, मस्त ललित
पण एक मात्र नक्की, जेव्हा एखाद्याच्या घरी जेवताना लोक दुसरीकडच्या जेवणाचे कौतुक करत असतात तेव्हा त्याचा अर्थ त्यांना ते खात असलेले अन्न अतिशय आवडलेले असते. त्यामुळे उलट यजमान व यजमानीण बाईम्नी खुष व्हावे
छान मुक्तक ! "हे तर काहीच
छान मुक्तक !
"हे तर काहीच नाही" ही एक नैसर्गिक अशी मानवीवृत्ती आहे. ती कळतनकळत 'जीन्स' मध्ये सामावली जाते, अगदी लहानपणापासून. याला काही एखाद्याचा 'गर्व' अथवा आपल्या गावची 'मिजास' न म्हणता त्या निमित्ताने 'हळवे' होणे असेही म्हणता येते. आपल्याजवळ जे आहे तेच सर्वोत्तम नसले तरी उत्तम आहे अशी मनाची एक भाबडी समजूत करून घेतली की नंतरचा मोफतचा मनस्ताप वाचतो.
कृष्णधवल दूरदर्शन ज्यांच्याकडे होते त्यानी शेजारच्या घरी नुकताच बाजारात आलेला चकचकीत रंगीत टीव्ही पाहिल्यावर "ख्ख्काय करायची ती रंगीत थोबाडे बघून ! हे काहीच नाही, त्यापेक्षा आमच्या ब्लॅक अॅण्ड व्हॉईटवर बघा मधुबाला किती मस्ताड दिसत्ये !" अशी सोयीस्कर समजूत करून घेत. "लाल्या म्हणजे फक्त डॉ.काशिनाथ घाणेकर, त्यांच्यापुढे रमेश भाटकर म्हणजे काहीच नाही," "पंताशिवाय लखोबा लोखंडेचं धनुष्य कुणी उचलायचा प्रयत्न करुच नये", "बेलवलकर सादर करावा तो डॉ.लागू यानीच, दत्ता भट बरे, पण बाकीच्यांचा काहीच नाही" अशी नित्यनेमाने येणारी उदाहरणे सहजपणे समोर येत असतात. त्यात मूळ भूमिकेशी तादात्म्य पावलेल्या कलाकारांचा तो एक प्रकारे गौरव असतो इतकेच. क्रिकेटमधील अशी खेळाडूंबाबत होणारी खिचातानी हा आणखीन् एक नित्याच्या सवयीचा भाग.
वर श्री.मास्तुरे कोल्हापूरवासीयांच्या 'गावची अफाट स्तुती' सवयीबद्दल म्हणतात ते काही अंशी खरे आहे. कारण ही स्तुती बर्याच वेळा जेवणाबद्दलची असते. पुण्यात शिक्षण व नोकरीनिमित्य आलेल्या (ली) व्यक्तीला सुरुवातीचे तिथल्या चवीचे दिवस अंगी मुरवायला कठीण जातेच जाते, त्याला कारण त्याच्या/तिच्या जिभेला असलेली "कोल्हापुरी झणझणीत" पणाची सवय. म्हणून 'सुजाता' मधील सुंदर शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेताना तो उदगारतोच, 'हे तर काहीच नाही, आमचा कोल्हापुरी खुळा रस्सादेखील याला लै भारी !" हे लै भारी सार्याच बाबतीत मग सवयीचा भाग बनून जातो.
बाकी वर आमची "कोल्हापुरी दक्षिणा" म्हणते ते योग्यच आहे की, सतत असं म्हणण्याची सवय अयोग्यच आहे.
अशोक पाटील
हॅ ते तर काहीच नाही .हयाला तर
हॅ ते तर काहीच नाही .हयाला तर अनुमोदनच पण ...अमकी गोष्ट मला जास्त स्वस्तात पडली, अशी सांगणारी एक मावशी परिचयाची आहे, तिला माझ्या आईपेक्षा स्वस्त टोमॅटो मिळाले असे सांगताना, माझी आई केव्हातरी तिला म्हटली होती, अगं तुला अमके रु. किलो मिळाले टमाटे म्हणजे ते सडके असणार
छान लिहीले आहे. मी अनुभवले
छान लिहीले आहे. मी अनुभवले आहे असले.
अश्विनीमामी | 29 February,
अश्विनीमामी | 29 February, 2012 - 11:47 नवीन
छान लिहीले आहे. मी अनुभवले आहे असले.>>
अश्विनीमामी, हे तर काहीच नाही, मी तर कितीतरी अनुभवले आहे असले
बेफी @ अशोक मामा - पण
बेफी
@ अशोक मामा - पण कोल्हापूरच्या लोकांना राजाभाऊची भेळ जगात भारी आहे असे वाटते, मी तर ओरडून सांगेन की मी सुंदर भेळ खाल्ली ती फक्त पुण्यातच.
त्यामुळे वरिल संवाद असा वाचाव
मी - पुण्यात मनिषाची भेळ अप्रतिम आहे... (म्हणजे इतर कुठेही अगदी बेक्कार भेळ मिळते असा त्याचा अर्थ होत नसूनही, पुढचा प्रतिसाद वाचा
कोल्हापूरकर - हॅ हे तर काहीच नाही, तु आमच्या राजाभाऊची भेळ खाऊन बघ, परत कधी पुण्याच्या भेळेकडं वळून बघणार नाहीस.
अहो दक्षिणा. यशःश्री लहानपणी
अहो दक्षिणा. यशःश्री लहानपणी सुट्टीत शेजारी राहायला यायची आणि आम्ही अनेक ठिकाणी नेलो जायचो. तेव्हा ती म्हणायची की एस पी च्या मैदाना पेक्षा शिवाजी मैदान कितीतरी मोठे आहे, इथल्या मिसळीपेक्षा तिथली मिसळ कितीतरी मस्त आहे.
आता तिच्याशी लग्न झाल्यापासून मी आपला म्हणतो.
"माझी बायको कोल्हापूरची आहे"
त्यावर तिला असे म्हणताच येत नाही 'ह्यॅ, हे तर काहीच नाही'
आर्च, अगदी अगदी नेमकं लिहिलं
आर्च, अगदी अगदी नेमकं लिहिलं आहेस.
आमच्या बिल्डिंगमधल्या एक काकू अशाच आहेत. मी नविन काही पदार्थ केला की लगेच "हे तर आम्हीपण करतो." (त्याना घडीच्या पोळ्या देखील करून माहित नाही. रोज टिप्पिकल साऊथ इंडियन जेवण असते. ज्या दिवशी फुलके करतील त्या दिवशी पाच पाचदा सांगतात. आज चपाती भाजी केली.
) वर परत "मला फुरसतच नसते सारखे काम आणि काम" हे माझ्याघरी येऊन दोन तास गप्पा मारताना पंचवीस वेळा सांगायचं.
आर्च,'अवती-भवती सतत घडणारी
आर्च,'अवती-भवती सतत घडणारी गोष्ट.. पण तू मांडेस्तोवर लक्षातच आलं नव्हतं,'" +१००

कल्पु..सहमत..
बेफी,दक्षी
आर्च ,तुझा शेवटचा पॅरा..
>>> आता तिच्याशी लग्न
>>> आता तिच्याशी लग्न झाल्यापासून मी आपला म्हणतो.
"माझी बायको कोल्हापूरची आहे"
त्यावर तिला असे म्हणताच येत नाही 'ह्यॅ, हे तर काहीच नाही'
>>> वर श्री.मास्तुरे कोल्हापूरवासीयांच्या 'गावची अफाट स्तुती' सवयीबद्दल म्हणतात ते काही अंशी खरे आहे. कारण ही स्तुती बर्याच वेळा जेवणाबद्दलची असते.
अहो, कोल्हापूरचे कौतुक निव्वळ जेवणाबद्दल नसते. जेवणाच्या बरोबरीने कोल्हापूरची हवा, रंकाळा, कोल्हापूरचं दूध (तिथे म्हणे म्हैस समोर उभी करून तुमच्या समोर अजिबात पाणी न घालता दूध काढून देतात), कोल्हापूरचं देवीचं देऊळ, कोल्हापूरी गूळ, कोल्हापूरची माणसं कशी अरे ला कारे म्हणतात, गुजरी, कोल्हापूरच्या प्रसिद्ध वहाणा इ. असंख्य गोष्टींची अफाट स्तुती चालते.
Pages